Home » कोण आहे मनी लॉन्ड्रिंग प्रकरणातील फरार आरोपी संजय भंडारी?

कोण आहे मनी लॉन्ड्रिंग प्रकरणातील फरार आरोपी संजय भंडारी?

by Team Gajawaja
0 comment
Sanjay Bhandari
Share

भारताकडून फरार आरोपी म्हणून घोषित करण्यात आलेल्या हत्यारांचा डीलर आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणातील आरोपी संजय भंडारी (Sanjay Bhandari) याला लवकरच ब्रिटेन मधून भारतात आणले जाऊ शकते. ब्रिटेनच्या कोर्टानंतर आता तेथील सरकारने ही संजय भंडारीच्या प्रत्यार्पणासाठी परवानगी दिली आहे. आता त्याच्याजवळ कोर्ट आमि ब्रिटेनच्या गृह सचिव सुएला ब्रेवरमॅनच्या आदेशाविरोधात अपील करण्यासाठी अवघ्या काही दिवसांचा कालवधी उरला आहे. जर त्याने हायकोर्टात अपील केली नाही तर त्याला भारतात पाठवले जाणार आहे. भारत सरकार गेल्या दीर्घ काळापासून संजय भंडारी याच्या भारत वापसीसाठी प्रयत्न करत आहे. यापूर्वी गेल्या वर्षात नोव्हेंर मध्ये वेस्टमिंस्टर कोर्टाने सुद्धा त्याच्या भारत प्रत्यार्पणासाठी मंजूरी दिली आहे. त्यानंतर भारत सरकार सातत्याने ब्रिटने सरकारला संजयच्या प्रत्यार्पणासाठी अपील करत होता.

कोण आहे संजय भंडारी
संजय भंडारी लंडन मधील एक व्यावसायिक आहे. यापूर्वी तो भारतात आलिशान गाड्या आयात करायच्या आणि प्रसिद्ध व्यक्तींना तो विक्री करायचा. याच दरम्यान, त्याचे संबंध राजकीय मंडळींशी झाली आणि तो हत्यांरांच्या दलालीत उतरला. त्यासाठी त्याने एक कंपनी सुद्धा तयार केली. या कंपनीचे नाव ऑफसेट इंडिया सलुशंस असे ठेवले गेले. त्याचसोबत ही कंपनी प्रत्येक आर्म्स शो मध्ये सुद्धा भाग घ्यायची. २०१६ मध्ये त्याचा बद्दलचा मुद्दा उचलून धरला गेला जेव्हा सीबीआय, आयकर आणि ईडी हवाला व्यावसायिकांच्या विरोधात कारवाई करत होती. याच दरम्यान, संजय भंडारी याचे नाव ही समोर आले. तेव्हा त्यांच्यावर सख्ती केली असता त्यावेळीच त्याने भारतातून पळ काढला होता. त्यानंतर भारत सरकारने त्याला फरार आरोपी घोषित केले.

काय आहे आरोप?
हत्यारांच्या करारात दलालीचा आरोपी संजय भंडारीवर (Sanjay Bhandari) मनी लॉन्ड्रिंगचा आरोप आहे. त्याच्यावर ब्लॅक मनी कर अधिनियम २०१५ आणि आयकर अधिनियम १९६१ च्या अंतर्गत चोरीचा सुद्धा आरोप आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, भंडारीने जो टॅक्स रिटर्न जमा केला होता त्यामध्ये परदेशातील संपत्ती आणि विदेशातील उत्पन्नाला लपवले होते. मात्र त्याला भारताच्या स्थानिक व्यक्तीच्या रुपात सर्व जागतिक संपत्ती आणि आयकरचे पेमेंट करायचे होते. खासकरुन असे की, २०१६ मध्ये भंडारी फरार होण्यापूर्वी त्याच्या विरोधात लूकआउट नोटीस जारी केली होती. तपासादरम्यान, त्याच्या घरातून संरक्षण मंत्रालयाचे काही गोपनीय कागदपत्र सुद्धा मिळाले होते.

पिलाटस एअरक्राफ्ट प्रकरणी समोर आले होते नाव
CBI ने स्विर्त्झलँन्डची कंपनी पिलायटस एअरक्राफ्ट प्रकरणी सुद्धा संरक्षण मंत्रालय, भारतीय वायुसेनेच्या अज्ञात अधिकाऱ्यांसोबत संजय भंडारीला (Sanjay Bhandari) सुद्धा आरोपी बनवले होते. हा करार २००९ मध्ये झाला होता. अशा प्रकारचे ७५ ट्रेनर विमानांची पूर्तता केली जाणार होती. सीबीआयने आरोपी लावला होता की, पिलाटसने ऑफसेट इंडिया सॉल्युशन प्रा. लिमिटेडचे निर्देशक संजय भंडारी आणि विमल सरीनसह षड्यंत्र रचले होते. प्रकरणात संरक्षणमंत्रालयासंबंधित अधिकाऱ्यांची ओळख सांगितली गेली नव्हती. संजय भंडारीचे रॉबर्ट वाड्राशी सुद्धा संबंध असल्याचे समोर आले होते. त्यावेळी तपासात असा आरोप लावला गेला की, भंडारीच्या मोबाईलमधून रॉबर्ट वाड्रांची कंपनी ब्लू ब्रिज ट्रेडिंग प्राइव्हेट लिमिटेडच्या क्रमांकावर काही वेळा कॉल ही केले गेले. या व्यतिरिक्त असा आरोप लावला गेला की, संजय भंडारीनेच रॉबर्ट वाड्रांच्या लंडन सिंग घराच्या इंटिरियरचा खर्च ही उचलला होता.

हे देखील वाचा- भारतातील ‘या’ मोठ्या हल्ल्यांमधील जागतिक आरोपी अब्दुल रहमान मक्की कोण आहे?

२०२० मध्ये झाली होती अटक
२०१६ मध्ये भारतातून पळ काढत ब्रिटेनला गेलेला संजय भंडारी याच्या समस्या २०२० मध्ये वाढण्यास सुरुवात झाली होती. खरंतर २०२० पर्यंत भारताने काही वेळा संजय भंडारीच्या प्रत्यार्पणासाठी ब्रिटेनला अपील केले होते. २०२० मध्ये ब्रिटेनचे तत्कालीन गृह सचि प्रीति पटेल यांनी यासाठी परवानगी दिली. त्यानंतर त्याच वर्षात जुलैमध्ये प्रत्यार्पण वॉरंटवर त्याला अटक करण्यात आली होती. त्यानंतर हे प्रकरण वेस्टमिंस्टर कोर्टात चालू होता, ज्यामध्ये गेल्या वर्षात नोव्हेंबर मध्ये प्रत्यार्पणासाठी मंजूरी दिली. आता ब्रिटेनचे गृह सचिव सुएला ब्रेवरमॅनच्या सुद्धा प्रत्यार्पणासाठी आदेश दिला आहे. संजय भंडारीजवळ १२ जानेवारीपासून केवळ १४ दिवसांचा कालावधी बचावला आहे. जर त्याने हायकोर्टात अपील केले तर त्याच्या प्रत्यार्पणाचे प्रकरण अधिक ताणले जाऊ शकते. अन्यथा त्याला भारतात आणण्याची कारवाई सुरु केली जाईल.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.