Home » भारतातील ‘या’ मोठ्या हल्ल्यांमधील जागतिक आरोपी अब्दुल रहमान मक्की कोण आहे?

भारतातील ‘या’ मोठ्या हल्ल्यांमधील जागतिक आरोपी अब्दुल रहमान मक्की कोण आहे?

by Team Gajawaja
0 comment
Abdul Rehman Makki
Share

आर्थिक तंगीचा सामना करत असलेल्या पाकिस्तानला एक मोठा झटका बसला आहे. कारण संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने पाकिस्तानातील दहशतवादी आणि लष्कर-ए-तैयबाचा डेप्युटी चीफ अब्दुल रहमान मक्की (Abdul Rehman Makki) याला जागतिक दहशतवादी घोषित केले आहे. भारताकडून गेल्या काही वर्षांपासून जागतिक दहशतवादी घोषित करण्यााची मागणी केली जात होती. या प्रकरणी अमेरिकेची सुद्धा मदत मिळाली. दरम्यान, चीन कडून याचा सातत्याने विरोध केला जात होता.

कोण आहे अब्दुल रहमान मक्की
अब्दुल रहमान मक्कीचे नाव 26/11 च्या मुंबईतील हल्ल्यामध्ये समोर आले होते. तो दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाचा डेप्युटी चीफ आहे. नात्याने तो हाफिज सईदचा भावजी लागतो. मक्कीवर भारतातील लाल किल्लासह ७ मोठ्या दहशतवादी हल्ल्यांचा आरोप आहे. दरम्यान, डिसेंबर २०२२ मध्ये UNSC च्या अध्यक्षता पार पाडत भारताने दहशतवादाचा समूळ नाश करण्याकडे जोर दिला होता. ऐवढेच नव्हे तर २८-२९ ऑक्टोंबर २०२२ रोजी मुंबई आणि दिल्लीती संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या काउंटर टेररिज्म कमेटीची बैठक झाली होती. या बैठकीत सुद्धा भारताने याप्रकरणी हा मुद्दा उचलून धरला होता.

चीनकडून सातत्याने विरोध
मक्कीला जागतिक दहशतवादी घोषित करण्यासाठी भारताने गेल्या काही काळापासून मागणी केली जात होती. UNSC मध्ये २०२० आणि जून २०२२ मध्ये प्रस्ताव आणला गेला होता. दरम्यान, दोन्ही वेळेस चीनने यावर विरोध दर्शवण्याचा पुरेपुर प्रयत्न केला होता. त्यानंतर पुन्हा युएनने सिक्युरिटी काउंसिल कमेटीच्या प्रस्तावानुसार मक्कीला (Abdul Rehman Makki) १२६७ आयएलआयएल आमि अल कायदा प्रतिबंध समिती अंतर्गत ग्लोबल टेररिस्ट घोषित केले. UNSC च्या प्रस्तावानुसार, मक्की आता धनाचा वापर करु शकत नाही.तो हत्यारे खरेदी करु शकत नाही आणि अधिकार क्षेत्राच्या बाहेर प्रवास ही करु शकत नाही.

हे देखील वाचा- बिहार मधील मजूर कामगाराचा मुलगा जो राष्ट्राध्यक्ष झाला…जाणून घ्या चंद्रिका प्रसाद यांच्याबद्दल अधिक

कोणत्या हल्ल्यांमध्ये मक्कीचा समावेश होता
-१-२२ डिसेंबर २००० रोजी लाल किल्ल्यावर हल्ला केला होता. लष्कर-ए-तैयबाच्या ६ दहशतवाद्यांनी लाल किल्ल्यावर घुसून सुरक्षाबलावर गोळीबार केला होता. या हल्ल्यात सैन्याचे दोन जवान यांच्यासह तीन लोकांचा मृत्यू झाला होता.
-१ जानेवारी २००८ लष्कराच्या ५ दहशतवाद्यांनी रामपुरच्या सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला केला होता. यामध्ये ७ सीआरपीएफ जवान आणि एका रिक्षा चालकाचा मृत्यू झाला होता.
-लष्कराने २६/११ ला मुंबईत हल्ला केला होता. या हल्ल्यात परदेशी नागरिकांसह १७५ लोकांचा मृत्यू झाला होता.
-१२-१३ फेब्रुवारी २०१८ मध्ये श्रीनगरच्या करण नगरमध्ये सीआरपीएफ कॅम्प मध्ये लष्कराचा आत्मघाती हल्लेखोर घुसला होता. या दरम्यान, एक जवान शहीद झाला होता. तर एक पोलीस ही जखमी झाला होता.
-३० मे २०१८ रोजी बारामूलात लष्कराच्या तीन दहशतवाद्यांनी तीन नागरिकांची हत्या केली होती.
-१४ जून २०१८ रोजी लष्कराच्या दहशतवाज्यांनी राइजिंग कश्मीरचे एडिटर सुजात बुखारी आणि दोन सिक्युरीटी गार्डवर गोळीबार करत त्यांची हत्या केली होती.
-जम्मू-कश्मीर मधील बंदीपोरा मध्ये लष्करच्या दहशतवाद्यांनी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता. यामध्ये चार जवान शहीद झाले होते. दरम्यान, भारतीय सैन्याने जवानांनी या घुसखोरीला नाकाम केले होते.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.