ईराणने आपल्या माजी अधिकारी अलीरेजा अकबरी (Alireza Akbari) यांना नुकतीच फाशीची शिक्षा दिली आहे. अकबरी ईराणचे डेप्युटी डिफेंस मिनिस्टर राहिले होते. तर ईराणमध्ये उदारवादी राजकरणातील एक प्रमुख चेहरा होते. त्यांनी ईराण न्यूक्लीयर डीलच्या सुरुवातीला महत्वाची भुमिका निभावली होती. ईराणने अकबरी यांना ब्रिटेनसाठी गुप्तहेरपणा केल्याच्या आरोपात फाशीची शिक्षा सुनावली होती. ईराणने अकबरींवर संवेदनशील डेटा पोहचवणे आणि भ्रष्टाचाराचा आरोप लावण्यात आला होता.
अलीरेजा यांच्या फाशीची शिक्षेसंदर्भात ब्रिटेन आणि ईराणमध्ये वाद झाले. ईराणला अलीरेजा यांना काहीही झाले तरीही फाशी देऊ पाहत होता. पण ब्रिटेन त्यांचा बचाव करत होता. परंतु ईराणने ब्रिटेनचे काहीही ऐकले नाही आणि आपल्या माजी अधिकारी आणि डेप्युटी डिफेंस मिनिस्टर यांना फाशी दिली. अशातच जाणून घेऊयात कोण होते अलीरेज अकबरी?
-अलीरेज अकबरी यांच्याकडे ईराण आणि ब्रिटेन अशा दोन्ही देशांचे नागरिकत्व होते. तर मोहम्मद खातमी यांच्या कार्यकाळात (१९९७-२००५) मध्ये ईराणचे डेप्युटी डिफेंस मिनिस्टर सुद्धा होते.
-ईराणने अलीरेजा अकबरी यांना ब्रिटेनची गुप्तहेरगिरी केल्याच्या आरोपाखाली वर्ष २०१९ मध्ये अटक करण्यात आली होती. त्यानंतर अकबरी ईराणच्या तुरुंगात बंद होते.
-दरम्यान, अकबरी यांनी ईराणच्या त्या आरोपांना फेटाळून लावले होते. फाशीपूर्वी अकबरी यांनी एका व्हिडिओ मेसेजमध्ये म्हटले होते की, त्यांच्याकडून बळजबरीने गुन्हा कबूल करुन घेतला.
-अकबरी यांनी असे म्हटले होते की, जवळजवळ १० महिन्यांपर्यंत त्यांना टॉर्चर करण्यात आले होते. १ कॅमेऱ्यांमध्ये त्यांचा जबाब नोंदवला गेला. त्यांना ड्रग्ज दिले गेले, जीवेमारण्याच्या धमक्या दिल्या.
-ईराणचे टॉप डिप्लोमॅटच्या विरोधावर अलीरेज ईराणला गेले. तेथे पोहचल्यानंतर त्यांना कळले की, त्यांच्यावर गुप्तहेरगिरी केल्याचा आरोप लावण्यात आला आहे. नॅशनल सिक्युरिटी काउंसिलचे टॉप अधिकारी अली शामखानी यांना अलीरेज यांच्यावर गु्प्त माहिती सांगितल्याचा आरोप लावला गेला.
-अलीरेजा (Alireza Akbari) यांनी ईराणने लावलेले आरोप हे चुकीचे असल्याचा दावा केला होता. त्यांनी आपल्या शिक्षेच्या विरोधात सुप्रीम कोर्टात अपील केले होते. मात्र कोर्टाने त्यांचे अपील फेटाळून लावले.
-अलीरेजा यांचा आरोप इस्लामिक कोडचे उल्लंघन करण्यासंबंधित आणि विदेशात सूचनेच्या हस्तांतरणाच्या माध्यमातून देशाअंतर्गत आणि बाहेरच्या सुरक्षिततेबद्दल कार्य करण्याचा समावेश आहे.
-काही दिवसांपूर्वी अलीरेजा यांच्या पत्नीला अखेरचे भेटण्यासाठी बोलावण्यात आले होते. या दरम्यान, ब्रिटेनला वाटत होते की, त्यांना फाशी देऊ नये. पण ईराणने त्यांना जे करायचे होते तेच केले.
हे देखील वाचा- सर्वाधिक मोठे पेट्रोल रिटेलर, ज्यांची पंतप्रधानांनी मागितली माफी?
-ब्रिटेनच्या विदेश सचिव जेम्स क्वेवरली यांनी ट्विट करत असे म्हटले होते की, अलीरेजा यांची शिक्षा बर्बर शासनाद्वारे राजकरणाशी प्रेरित आहे. ती मानवी आयुष्याची पूर्णपणे अवहलेना केल्यासारखी आहे.
-ब्रिटेन परराष्ट्र कार्यालयाचे प्रवक्ते यांनी तत्काळ काउंसिलर एक्सेसचा विरोध केला होता. मात्र ईराणच्या सरकारने त्यांच्या दोन्ही देशातील नागरिकत्वासाठी मान्यता दिली नव्हती.