Home » सर्वाधिक मोठे पेट्रोल रिटेलर, ज्यांची पंतप्रधानांनी मागितली माफी?

सर्वाधिक मोठे पेट्रोल रिटेलर, ज्यांची पंतप्रधानांनी मागितली माफी?

by Team Gajawaja
0 comment
Darshan Dhaliwal
Share

NRI उद्योगपती दर्शन सिंह धालीवाल (Darshan Dhaliwal) यांनी दावा केला आहे की, पीएम नरेंद्र मोदी यांनी १५० लोकांच्या समोर त्यांची मागितली होती. हे तेच दर्शन धालीवाल आहे, ज्यांना ऑक्टोंबर २०२१ मध्ये शेतकरी आंदोलनादरम्यान विमानतळावरुनच अमेरिकेत पाठवण्यात आले होते. दर्शन धालीवाल वयाच्या २१ व्या वर्षातच युएसला गेले आणि आज ते सर्वाधिक मोठे पेट्रोल रिटेलर आहेत. धालीवाल यांच्याजवळ ३५० पेक्षा अधिक गॅस स्टेशन सुद्धा आहेत. मध्य प्रदेशातील इंदौरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या १७व्या प्रवासी भारतीय दिवस संम्मेलनात राष्ट्रपती द्रौपदी मूर्म यांनी त्यांचा सन्मान केला. त्यानंतरच्या बातचीत मध्ये त्यांनी दावा केला की, मोदींनी एप्रिल २०२२ मध्ये माफी मागितली होती आणि बोलवल्याबद्दल आभार ही मानले होते.

कोण आहेत दर्शन धालीवाल?
दर्शन सिंह धालीवाल मूळ रुपात पंजाब मधील पटियाला रखरा गावातील आहेत. ते १९७२ मध्ये वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षीच अमेरिकेत गेले. त्यांनी मॅकेनिकल इंजिनिअरिंगचा अभ्यास केला आणि त्यानंतर चार वर्षापर्यंत वेयर हाउस मध्ये काम केले. तेथे राहून त्यांनी व्यावसाय करण्यास सुरुवात केली. दर्शन सिंह धालीवाल यांनी शेती संबंधित व्यवसायापासून सुरुवात केली आणि हळूहळू अमेरिकेत पेट्रोल पंपाच्या चेनचे मालक झाले. ते अमेरिकेतील शिकागो मध्ये राहतात.

युएसमधील सर्वाधिक मोठे पेट्रोल रिटेलर
दर्शन धालीवाल (Darshan Dhaliwal) युएसमधील सर्वाधिक मोठे पेट्रोल रिटेलर आहेत. सध्या त्यांचे ११ राज्यांमध्ये जवळजवळ एक हजारांपेक्षा अधिक पेट्रोल पंप आहेत. एका वेयर हाउसमध्ये सामान्य नोकरी करणारे धालीवाल यांनी आयुष्यात खुप मोठे यश मिळवले आहे. आता ते रियल स्टेशन आणि कंस्ट्रशनचा व्यवसाय ही करतात. धालीवाल यांच्यासह त्यांचा मुलगा जसपाल सिंह आणि लहान भाऊ चरनजीत सिंह हे सुद्धा व्यवसायात त्यांना मदत करतात.

हे देखील वाचा- कश्मीरी पंडित इकबाल यांनी मुस्लिमांसाठी नव्या राष्ट्राची का मागणी केली होती?

पीएम मोदी यांच्या माफीचा दावा का?
प्रवासी संम्मेलनात सन्मान मिळाल्यानंतर दर्शन सिंह धालीवाल यांनी दावा केला की, २०२२ मध्ये एप्रिल महिन्यात जेव्हा पीएम मोदी एक शीख प्रतिनिधिमंडळालाल आपल्या निवासस्थानी भेटले होते तेव्हा जगभरातील शिख समाजातील प्रतिनिधिंमध्ये त्यांना ही बोलावण्यात आले होचे. दर्शन सिंह यांनी असे सांगितले की, याच भेटीदरम्यान, पीएम यांनी म्हटले होते शीख समाजाने दुसऱ्या देशांसोबत भारताचे संबंध अधिक मजबूत करण्यास महत्वाची भुमिका बजावली आहे. दर्शन सिंह धालीवाल यांनी दावा केला आहे की, पीएम मोदी यांनी १५० लोकांच्या समोर मला विमानतळावरुन अमेरिकेला परत पाठवल्याबद्दल माफी मागितली होती. तसेच त्यांनी असे म्हटले होते की, मोठी चूक झाली, जी तुम्हाला परत पाठवले. तुमचे मोठेपण आहे की, तुम्ही आमच्या सांगण्यावरुन परत आलात.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.