जगात विविध जाती-धर्मांचे लोक राहतात. त्यांच्या परंपरा, बोलण्याची पद्धत ही वेगळी असते. मात्र काही समाजात अशा परंपरा असतात त्या थोड्या विचित्रच असतात. त्यांच्यावर विश्वास ठेवणे हे मुश्किल होते. पण तरीही त्या परंपरा पिढ्या न् पिढ्या पुढे चालत राहतता. त्या विविध ठिकाणांवरील परंपरा या तुम्हाला विचार करण्यास ही काही वेळा भाग पाडतात. असे म्हटले जाते की, मृत्यूनंतर स्मशानभूमीच सर्वाधिक सुखाचे ठिकाण आहे. मात्र तुम्हाला जर सांगितले की, कबरीमध्ये दफन करण्यात आलेल्या मृतदेहांना शांती नाही आणि त्यांना तेथे ठेवण्यासाठी भाडं भरावं लागत तर तुम्ही काय कराल? अशातच जगातील एका ठिकाणी जेथे मृत शवांना ठेवण्यासाठी चक्क भाडं द्यावे लागते. असे न केल्यास पुरलेला मृतदेह बाहेर काढला जातो. अशी ही परंपरा ऐकण्यास थोडी विचित्रच आहे पण त्याचे पालन केले जाते. (Guatemala Cemetery)
स्मशानभूमीत शव ठेवायचे असेल तर भाडे भरा
आपल्या सौंदर्यासाठी प्रसिद्ध असलेले मध्य अमेरिकन देश ग्वाटेमाला मध्ये ही परंपरा किंवा त्याला नियम म्हणूयात त्याचे पालन तर केलेच जाते. येथील स्मशानभूमीत मृतदेह पुरल्यानंतर प्रत्येक महिन्याला भाडं ही द्यावं लागते. मात्र जर एखाद्या नातेवाईकाने एका महिन्याचे भाडे दिले नाही किंवा तो भरण्यास असमर्थ असेल तर त्याला त्या कबरीतून काढून सामूहिक कबरीत ठेवले जाते. या कबरींचे भाडे सुद्धा अधिक आहे.
ऐवढेच नव्हे तर स्मशानभूीमीत असे प्रकार केल्याचे ही दिसून येते. ज्यांनी भाडं भरले नसेल त्यांच्या नातेवाईकाचा मृतदेह हा काढून बाहेर ठेवला जातो. काही मृतदेह तर असे उभे केले जातात की, आपल्यासाठी जमिन कधी मिळेल याची वाट पाहत राहतात.(Guatemala Cemetery)
हे देखील वाचा- महाराष्ट्रातील ‘या’ गावात शनि देवाची कृपा म्हणून घराला दरवाजेच लावले नाहीत
गरीबांना येते समस्या
खरंतर ग्वाटेमाला मध्ये जागेच्या अभावामुळे बहुमजली स्मशानभूमी बांधली जाते. एका कबरीवर एक कबर बनवली जाते. येथे लोक जीवंतपणी सुद्धा आपल्या कबरीच्या भड्याची सोय करुन ठेवतात. मात्र गरिब लोकांना यासाठी खुप समस्या येते.
प्रशासनाचे असे म्हणणे आहे की, अधिक लोकसंख्या आणि कमी जागा असल्याने असे नियम बनवावे लागतात. प्रशासनाने प्रत्येक शहराबाहेर एक सामूहिक मैदान बांधले आहे. तेथे प्रत्येक वर्षी अशा मृतदेहांना पुरले जाते ज्यांच्या नातेवाईकांनी वेळेवर भाडे दिलेले नाही.