Home » राजकरणातील दीदी ‘ममता बॅनर्जी’

राजकरणातील दीदी ‘ममता बॅनर्जी’

by Team Gajawaja
0 comment
Mamta Banerjee
Share

भारताच्या राजकरणात अत्यंत कमी अशी नेतेमंडळी आहेत जे त्यांच्या क्षेत्रातील नेते जरी असले तरीही त्यांची राष्ट्रीय पातळीवर चर्चा होत राहते. यामधीलच प्रमुख नाव म्हणजे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamta Banerjee). त्या आज ६८ वर्षाच्या झाल्या आहेत. त्यांनी आठवेळा बंगालच्या मुख्यमंत्री पदाची कमान सांभाळाली आहे. त्याचसोबत २० मे २०११ पासून त्या सातत्याने तेथील मुख्यमंत्री आहेत. परंतु त्याआधी ममता बॅनर्जी यांचे जीवन आणि राजकीय प्रवास हा सोप्पा नव्हता. त्या नेहमीच एक लढवय्या नेत्याच्या रुपात दिसून येतात. मुख्यमंत्री झाल्यानंतर त्या नेहमीच बंगाल आणि देशासाठी काही ना काही करण्याचा संकल्प करताना दिसतात.

स्वतंत्रता सेनानी यांची मुलगी
ममता दीदी, लोक त्यांना याच नावाचे बोलतात. त्यांचा जन्म ५ जानेवारी १९५५ रोजी पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता मधील एका ब्राम्हण परिवारात झाला होता. त्यांचे वडिल प्रोमिलेश्वर बॅनर्जी हे एक स्वतंत्रता सेनानी होते. जेव्हा ममता बॅनर्जी १७ वर्षाच्या होत्या तेव्हा त्यांनी वडिलांना गमावले. त्यांना व्यवस्थितीत उपचार न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला होता.

धर्म ते कायद्याचे शिक्षण
ममता बॅनर्जी यांनी वयाच्या १५ व्या वर्षातच राजकरणात पाऊल ठेवले. जोगमाया देवी कॉलेज मध्ये त्यांनी विद्यार्थी परिषदेच्या युनियनची स्थापना केली. ती त्यावेळी काँग्रेस आय पक्षाच्या विद्यार्थ्यांची शाखा होती. त्यांच्या नेतृत्वत परिषदेने सोशलिस्ट युनिटी सेंटर ऑफ इंडिया संबंधित ऑल इंडिया डेमोक्रेडिक स्टुडेंट ऑर्गेनाइजेशनचा पराभव केला आणि राजकिय क्षमतांचा त्यांनी परिचय करुन दिला.

दोन वेळा चर्चेत आल्या
त्यानंतर त्या काँग्रेस मध्ये सहभागी झाल्या आणि विविध संघटनात्मक पदांवर राहिल्या, १९७० मध्ये काँग्रेस पासून सुरु झालेल्या त्यांच्या करियरच्या पाच वर्षानंतर त्यांनी जय प्रकाश नारायण यांचा विरोध करत त्यांच्या कार समोर त्यांनी नृत्य करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये नेहमीच वरच्या पदावर जात गेल्या, १९८४ मध्ये पुन्हा एकदा जेव्हा त्यांनी दिग्गज कम्युनिस्ट नेता सोमनाथ चटर्जी यांना जाधवपुर खासदारकीच्या सीटवरुन हरवले तेव्हा त्या पुन्हा चर्चेत आल्यय १९९१ मध्ये निवडणूकीपासून त्यांनी दक्षिण कलकत्ताच्या सीटवर २००९ पर्यंत विजय मिळवला.

हे देखील वाचा- एकेकाळी म्हटले गेले २१ व्या शतकातील हीरो आणि भावी पीएम, पण आज मुख्यमंत्री होण्यासाठी करतायत धडपड

काँग्रेस पासून विभक्त
मात्र ममता दीदी नेहमीच डाव्यांच्या विरोधात संघर्ष करण्यासाठी पुढे राहिल्या. ममता बॅनर्जी यांनी त्यांचा विरोध केल्याने त्यांच्या सरकारच्या पोलिसांनी बलाचा प्रयोग करत मागे हटवण्याचा प्रयत्न केला. पण तरीही त्यांच्या संघर्षाला ते तोडू शकले नाही. डावे पक्ष आणि काँग्रेसच्या जवळीकतेमुले १९९७ मध्ये त्यांनी काँग्रेसमधून एक्झिट घेतली. त्यानंतर ममता बॅनर्जी यांनी स्वत:चा पक्ष तृणमुल काँग्रेसची स्थापना केली.(Mamta Banerjee)

केंद्रात भाजपशी संबंध
१९९८ च्या नंतर त्या एनडीए सोबत वाजपेयी सरकामध्ये सहभागी झाल्या. देशाच्या रेल्वे मंत्री असताना त्यांना अधिक लोकप्रियता मिळाली. याच दरम्यान, काही मुद्द्यांवर भाजपवर त्या नाराज झाल्या. पण तरीही सरकार आणि एनडीए मध्ये पुन्हा येत राहिल्या, २००४ मध्ये वाजपेयी यांचे सरकार गेल्यानंतर त्यांच्यामध्ये आणि भाजपमध्ये अंतर वाढत गेले. २००९ मध्ये त्यांनी काँग्रेस सोबत गठबंधन करत आपल्या पक्षाला राष्ट्रीय स्तरावर आणला.

परंतु २०११ हे वर्ष ममता बॅनर्जी यांच्यासाठी खुप मोठे परिवर्तनकारी राहिले. त्यांच्या पक्षाने पश्चिम बंगालमध्ये मोठा विजय मिळवला होता. त्याचसोबत डाव्या पक्षांची सत्ता उलटून लावण्यात ही त्या यशस्वी झाल्या होता. त्यानंतर सातत्याने त्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री राहिल्या आहेत.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.