पालक आणि मुलांमध्ये उत्तम रिलेशनसह उत्तम काळजी-पालनपोषणासाठी संवाद असणे फार गरजेचे असते. या नात्यात जर संवाद नसेल तर मोठी समस्या उद्भवू शकते. त्यामुळे लहान मुलांचे पालनपोषण जेव्हा तुम्ही करता तेव्हा त्याला काय हवं-नको किंवा त्याच्या तुमच्याकडून काय अपेक्षा आहेत हे सुद्धा पहायला हवे. वेळ पडल्यास तुम्ही त्याची अधिक काळजी करण्यापेक्षा त्याला काही गोष्टींची जाणीव करुन देणे सुद्धा फार गरजेचे असते. अशा सर्व गोष्टी पालक आणि मुलाच्या नात्यात होत असतातच. पण तरीही तुमचे मूल तुमच्यापासून दूर-दूर राहत असेल तर त्यामागे सुद्धा काही कारणं असू शकतात. (Kids Avoiding to parents)
पुढील काही कारणांमुळे पालकांशी बोलत नाही ना त्यांच्या जवळ राहणे पसंद करतात
-प्रत्येक वेळी ओरडणे
मुल जे काही करतात त्याकडे आपले लक्ष असतेच. पण लहान-लहान गोष्टींसाठी त्यांना अडवणे किंवा ओरडण्याने मुलाच्या स्वभावावर नकारात्मक परिणाम करु शकतात. अशातच तुम्ही असे करणे थांबवले नाही तर ते काही बोलण्यासह तुमच्यासोबत शेयर करण्यासंबंधित घाबरतील. त्यामुळे मुलांकडून काही कामे धमकावून केली जाऊ शकत नाही. यामध्ये तुमचेच नुकसान आहे.
-मुलांना वेळ न देणे
जर तुम्ही मुलांना वेळ देत नसाल आणि त्यांच्या समस्या, आनंदात त्यांच्या सोबत नसाल तर मुलं हळूहळू स्वत:ला एकटे असल्याचे मानतात. त्यामुळे ही मुलं तुमच्यापासून दूर दूर राहू राहतात. खरंतर मुलांना जगातील नव्या गोष्टी शिकणे, त्यांचा अनुभव घेणे वाढत्या वयानुसार आवडत असते. अशातच या काळात तु्म्ही त्यांच्या सोबत राहणे फार आवश्यक आहे. तर दिवसभरातून तुम्ही १ तास तरी मुलांना तुमचा वेळ देऊ करा.
-मुलांच्या प्राथमिकतेला प्राधान्य न देणे
नेहमीच असे पाहिले गेले आहे की, काही पालक आपल्या मुलांना त्यांच्या मनानुसार निर्णय घेणे किंवा त्यांच्या आवडीनिवडीसाठी नकार देतात. अशातच ते त्यांच्यापासून नाराज राहतात. त्यांना असे वाटू लागते की, त्यांचे पालक त्यांची परवाह करत नाही. (Kids Avoiding to parents)
हे देखील वाचा- मुलांच्या ‘अशा’ वागण्यावरुन ओळखता येईल की मुलं भीतीपोटी खोटं बोलत आहेत का…
-मुलांच्या प्रश्नांची उत्तरे न देणे
एखाद्या गोष्टीबद्दल मुलांना जाणून घेण्यासाठी फार उत्सुकता असते. परंतु त्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली नाहीत तर त्यांची चिडचिड होते. काही वेळेस पालक त्यांच्या प्रश्नांना कंटाळून त्यांच्यावर ओरडतात. अशातच त्याचा परिणाम मुलांवर होतो.