Home » रियाचा भाऊ शोविक आणि मिरांडाला एनसीबीने केली अटक

रियाचा भाऊ शोविक आणि मिरांडाला एनसीबीने केली अटक

by Correspondent
0 comment
Share

अभिनेता सुशांत सिंग राजपूत यांच्या मृत्यूच्या प्रकरणात आज सकाळी सहा वाजताच्या सुमारास रियाच्या सांताक्रुज येथील राहत्या घरी आणि सॅम्युअलच्या अंधेरी येथील घरावर एनसीबीने छापेमारी केली. यानंतर शोविक आणि सुशांतचा हाऊस मॅनेजर सॅम्युअलला एनसीबीच्या मुंबई कार्यालयात आणण्यात आले, जिथे त्यांची चौकशी केली जात आहे. यावेळी सॅम्युअल मिरांडा याने अधिकाऱ्यांना सुशांतसाठी ड्रग्ज खरेदी करत असल्याचे सांगितले. अखेर आता शोविक आणि मिरांडा यांना NDPS Act अंतर्गत एनसीबीकडून अटक केली गेली आहे.

काही कायदेशीर बाबींची पूर्तता एनसीबीकडून केली जात आहे, अशी माहिती न्युज १८ ने दिली आहे. <br><br>याआधी ड्रग्ज कनेक्शन संबंधी कपिल झव्हेरी, अब्बास लखानी , फेयाज अहमद, परवेझ खान उर्फ चिकू पठाण, बासित परिहार, झेंद विलात्रा व करण अरोरा अशी अटक केल्याची नावे आहेत. झव्हेरी व अब्बास यांना मंगळवारी पश्चिम उपनगरातील अड्डयावर छापे टाकून अटक केली. त्यानंतर बुधवारी इतरांना अटक करण्यात आली. हे सर्वजण बॉलिवूड आणि पेज र्थी पार्ट्यामध्ये अंमली पदार्थ पुरवित असल्याचा अधिकाऱ्यांचा कयास आहे.

गौरव आर्या हा बासित परिहार याच्या संपर्कात होता. तो टॅक्सी ड्रायवरचे काम करतो, इच्छुक ठिकाणी त्याचबरोबर मालाची डिलिव्हरी करण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपविली जात होती. रिया चक्रवर्ती हिचा भाऊ शोविक हा ही या तस्कराच्या संपर्कात होता. त्याने एकाकडे वडिलांसाठी अंमली पदार्थाची मागणी केल्याचे व्हॉटस अप मेसेज समोर आले आहेत. त्यानुषंगाने त्याची, गौरव आर्या, रिया चक्रवर्ती, तिचे वडील इंद्रजित यांच्याकडे एनसीबी चौकशी करणार आहे.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.