सध्या जगात एकच चर्चा जोरदार सुरु आहे ती म्हणजे फ्रांन्स मध्ये तरुणांना फुकटात दिल्या जाणाऱ्या कंडोमची. याची सुरुवात गेल्या दोन दिवसांपूर्वीच झाली असून त्यामध्ये १८ ते २५ वयोगटातील तरुणांचा समावेश करण्यात आला आहे. मात्र नंकर वाद अधिक वाढल्यानंतर यामध्ये १८ वर्षापेक्षा कमी वयोगटातील मुलांचा सुद्धा त्यामध्ये समावेश केला गेला आहे. याच्या माध्यमातून फ्रांन्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रो यांच्या सरकारने असे म्हटले की, या पावलामुळे तरुणांना फार्मेसी, फ्रेंच युथ ग्रुप आणि शाळा-महाविद्यालयांतून कंडोम खरेदी करता येणार आहेत. मॅक्रो यांच्या सरकारने गेल्या महिन्यात याची घोषणा केली होती. तर यामागी नक्की कारण काय आहे ते पाहूयात. (France offering free condom)
फ्रांन्समध्ये याची सुरुवात पुरुष मंडळींच्या कंडोम पासून करण्यात आली आहे. तर महिलांचा यामध्ये समावेश नाही. राष्ट्रपतींचे असे म्हणणे आहे की, सेक्स एज्युकेशनच्या प्रकरणी फ्रांन्स उत्तम काम करत नाही आहे. सध्याची विचार करण्याची पद्धत ही फार वेगळी आहे. आपल्याला देशातील शिक्षकांना या बद्दल अधिक शिक्षित करणे गरजेचे आहे. अशा प्रकरणी अधिक गांभीर्य बाळगणे ही गरजेचे आहे. फ्रांन्सच्या सरकारचा हा निर्णय देशातील लोकसंख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी नव्हे तर वेगळ्याच कारणासाठी आहे.
तरुणांना मोफत कंडोम वाटण्याचा निर्णय हा काही गोष्टी लक्षात ठेवत घेण्यात आला आहे. यामागील सर्वाधिक मोठे कारण की, सेक्सच्या माध्यमातून पसरणाऱ्या संसर्गावर आळा घालणे. सार्वजनिक हेल्श फ्रांन्सचा रिपोर्ट असे सांगतो की, २०२१ मध्ये HIV चे ५००० नवे रुग्ण समोर आले. यामध्ये १५ टक्के असे होते ज्यांचे वय २६ वर्षापेक्षा कमी होते. या व्यतिरिक्त फ्रांन्समध्ये आणखी एक मोठा मुद्दा म्हणजे अनवॉन्टेंड प्रेग्नेंसी.
अनवॉन्टेंड प्रेग्नेंसी थांबवण्यासाठी आणि असुरक्षित सेक्समुळे फैलावणाऱ्या आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने फ्री-कंडोम वाटण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रपतींनी असे ही म्हटले की, या मुद्द्यांबद्दल लोकांना शिक्षण आणि जागृती करणे अत्यावश्यक आहे. जेणेकरुन ते थांबवले जाईल. (France offering free condom)
हे देखील वाचा- टायटानिक फेम गायिक सेलीन डियोन स्टिफ पर्सन सिंड्रोमने ग्रस्त, नक्की काय आहे हा आजार?
जगातील असे काही देश आहेत जेथे कंडोम संदर्भात विविध नियम आहेत. जसे अफ्रीकी देश स्वाजीलँन्डमध्ये कंडोमवर बंदी आहे. त्याचसोबत काही ठिकाणी तेथे कंडोमच वापरले जात नाही. जसे की, नायजेरियास फिलीपींस, जाम्बिया आणि इंडोनेशिया. असुरक्षित सेक्स केल्याने या देशांमध्ये एड्स सारख्या आजारांची प्रकरणे वाढत आहेत.