केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे आपल्या कामांमध्ये जेवढे परफेक्ट राहण्याचा प्रयत्न करतातच पण आरोग्याची ही तेवढीच काळजी घेतात. मात्र आपल्या सर्वांना माहिती आहे ते खवय्ये आहेत. जेव्हा ते नागपूरला आपल्या घरी नेतेमंडळींना बोलावतात तेव्हा लज्जतदार बेत असतोच. पण जेव्हा नितीन गडकरी घरी जातात तेव्हा त्यांची बायको तिच्या स्वत:च्या हाताने जेवण बनवते असे त्यांनी एका मुलाखतीत म्हटले होते. गडकरी खवय्ये असल्याने त्यांना विविध पदार्थ खाण्याची आवड आहेच. पण भारतीय जेवणासह ते चायनीज पदार्थ खाणे त्यांना आवडते.
नितीन गडकरींनी (Nitin Gadkari) एका कार्यक्रमावेळी असे म्हटले होते की, त्यांना वांद्रे येथील ताज मध्ये भोजन करणे फार आवडते. त्याचवेळचा एक किस्सा ही त्यांनी शेअर केला होता.
जेव्हा नितीन गडकरींनी शेफला पगार विचारला होता…
नितीन गडकरी यांनी ताज मधील जेवणाचे कसे सेक्शन आहेत त्याबद्दल सांगितले. तेव्हा त्यांनी म्हटले होते की, ताजमध्ये एक स्वतंत्र चायनीज रेस्टॉरंट आहे. त्याच रेस्टॉरंटमधी डेव्हिड नावाचा एक शेफ असून त्याच्या हातचे खाणे मला फार आवडते असे ते म्हणाले होते. त्या डेव्हिडला त्यांनी त्याबद्दल अधिक विचारले होते. तेव्हा त्याने तो हॉंगकॉंग चा असल्याचे म्हटले होते. तेव्हा गडकरींनी त्याला भारतात कसा काय तेव्हा त्याने मला भारतात फिरायला आवडते असे उत्तर दिले होते. याच संवादात त्यांनी डेव्हिडला त्याचा पगार विचारला असता त्याने तो १ लाख रुपये असल्याचे म्हटले होते. त्याच्या या उत्तरावर गडकरींचा विश्वासच बसत नव्हता.
नितीन गडकरी हे वेळोवेळी आपण खवय्ये आहोत हे बोलण्यातून दाखवूनच देतात. ते असे म्हणतता की, मी जेवणाचा खुप मोठा शौकीन आहे. त्यामुळे संध्याकाळ होताच मी विचार करतो की, आज कोणत्या हॉटेलमध्ये जायचे आणि काय खायचे. तर या सर्व गोष्टीमध्ये कसलीच कसर सोडत नाही. पण सध्या माझ्या खाण्यापिण्याबद्दल काही मर्यादा आल्या आहेत हे सुद्धा ते सांगतात. आपण खवय्ये जरी असलो तरीही आरोग्याची काळजी घेणे सुद्धा तितकेच महत्वाचे आहे असे ही ते सांगतात.
खाण्यापिण्याचे शौकिन असून ही कमी केले वजन
केंद्रीय नितीन गडकरी हे खाण्यापिण्याचे शौकिन असून त्यांनी वजन कमी केले. त्याबद्दल ते इंडियन एक्सप्रेसचा कार्यक्रम Adda मध्ये बोलत होते. त्यावेळी त्यांनी सांगितले की, त्यांचे वजन ३५ किलो होते. पण ते कमी करुन फक्त ८९ किलो केले. दररोज योग आणि प्राणायम करतात असे ही त्यांनी सांगितले होते.(Nitin Gadkari)
हे देखील वाचा- ‘मुंबई ही कोणाच्या बापाची नाही’, कर्नाटकातील मंत्र्यांच्या दाव्यावर फडणवीसांची तीव्र प्रतिक्रिया
सर्व उत्तम रेस्टॉरंटची माहिती
नितीन गडकरींनी म्हटले होते की, ज्या शहरात राहिलो आहे तेथील उत्तम रेस्टॉरंट आणि हॉटेल बद्दल मला माहिती आहे. त्याबद्दल तुम्ही मला विचारु ही शकता.