रशियातील दोन नागरिकांच्या संशयात्मक मृत्युमुळे भारतात खळबळ उडाली आहे. या दोघांची ओळख रशियातील प्रसिद्ध व्यावसायिक Pavel Antov आणि Vladmimir Bidenov च्या रुपात झाली आहे. पावेल अंतोव हे रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा तिरस्कार करायचे. काही वेळेस रशिया आणि युक्रेनच्या युद्धावर ही टीका केली होती. काही दिवसांपूर्वी ओडिशातील एका हॉटेलमध्ये या दोघांच्या मृत्यूनंतर राज्यातील डीजीपीने या प्रकरणी सीआयडीच्या तपासाचे आदेश दिले आहेत. तर रशियन दुतवासाने असे म्हटले की, ओडिशा पोलिसांना यामध्ये अपराधिक पैलू मिळालेला नाही.
व्लादिमीर बिदेनोव यांचा मृत्यू स्ट्रोकच्या कारणास्तव झाला. तर पावेल अतोव यांचा मृतदेह योग्य स्थितीत आढळला. रशियन दुतवासाने दोन दिवसांपूर्वी असे म्हटले की, या दोघांच्या मृत्यू प्रकरणी ओडिशा पोलिसांना कोणाताही अपराधिक पैलू मिळालेला नाही. या दोघांचा मृतदेह ओडिशाच्या रायगढ जिल्ह्यातील एका हॉटेलमध्ये आढळला होता. रशियन दुतवासाने पुढे असे म्हटले की, रशियन दुतवास हे कोलकाता मध्ये आहे आणि तेथील स्थानिक प्रशासनाच्या संपर्कात आहेत. तसेच त्यांची पोलिसांसोबत चर्चा ही झाली.
कोण होते पावेल अंतोव?
पावेल अंतोव अत्यंत चर्चेत राहणाऱ्या व्यक्तीमत्वांपैकी एक होते. ते व्लादिमीर मीट प्रोसेसिंग प्लांटचे संस्थापक होते आणि रशियातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींपैकी एक होते. तर रशियातील व्लादिमीर क्षेत्राचे ते नेते सुद्धा होते. त्यांचा मृतहेद नुकताच हॉटेलच्या बाहेर मिळाला तेव्हा रक्त ओसंडून वाहत होते. यापूर्वी पावेल अंतोव यांच्यासोबत भारतात आलेले व्लादिमीर बिदेनोव यांचा मृतदेह सुद्धा त्याच हॉटेलमध्ये २२ डिसेंबरला आढळला होता.(Pavel Antov )
रशियातील उद्योगपती पावेल अंतोव यांना व्लादिमीर पुतिन यांचे कट्टर तिरस्कारकर्ते म्हणून ओळखले जायचे. युक्रेनवर रशियाच्या हल्ल्यानंतर त्यांनी खुलेआम पुतिन यांच्यावर टीका ही केली होती. दरम्यान, त्यांचे व्हॉट्स अॅप स्टेटस व्हायरल झाल्यानंतर ते आपल्या विधानावरुन पलटले आणि पुतिन यांना देशाचा सच्चा देशभक्त म्हटले होते.
अत्यंत वेगळे होते अंतोव
जेथे व्यवसायाचा प्रश्न आहे तेथे केवळ अंतोव ही असे होते ज्यांचा संबंध सॉसेज उद्योगासंबंधित होता. मात्र अन्य उद्योगपतींप्रमाणे श्रीमंत ही होते. तसेच व्यावसायासंदर्भात बहुतांश काम उर्जा आणि तेल कंपन्यासंबंधित करायचे आणि त्याचेच ते बिझनेसमन ही होते. एका रशियन टॅबलॉइडचे एडिटर होत. दोन एविएशन आणि अन्य व्यवसायात ही त्यांचे संबंध होते.
हे देखील वाचा- वीडियोकॉन: दिवाळी ते दिवाळं
किती मृत्यू कधी झाले
रशिया-युक्रेनच्या युद्धानंतर सर्वात प्रथम लियोनिट सुलमॅन यांचा मृत्यू झाला होता. जे ट्रांन्सपोर्ट ऑफ गाजप्रोम नावाच्या कंपनीचे डायरेक्टर होते. त्यांचा ३० जानेवारी २०२२ रोजी लेनिनवग्राड ओबलास्ट येथील आपल्या घरातील बाथरुम मध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला होता. त्यांच्या मृतदेहा शेजारी एक सुसाइट नोट ही मिळाली होती. त्यानंतर फेब्रुवारी मध्ये तीन, मार्चमध्ये एक, एप्रिल मध्ये दोन, मे मध्ये दोन, जुलैत एक, सप्टेंबरमध्ये पाच, नोव्हेंबर मध्ये एक आणि डिसेंबरमध्ये चार मृत्यू झाले आहेत.