लिओनेल मेस्सी जगातील सर्वाधिक प्रसिद्ध फुटबॉलर्सपैकी एक आहे. ज्यांना फुटबॉलच्या खेळाबद्दल अधिक माहिती नसली तरी त्यांनी मेस्सी याचे नाव जरुर ऐकले असेल. अर्जेंटिनाच्या संघातून आपले नाव फुटबॉल प्रेमींच्या मनात कोरत त्याने यंदाच्या फिफा वर्ल्ड कप मध्ये शानदार खेळी केली. पुन्हा एकदा त्याच्या मेहनीतीचे फळ त्याला मिळालेच. पण अर्जेंटिनाने फ्रांन्सला पराभूत करुन यशस्वी खेळी केल्याने सर्वत्र आनंद व्यक्त केला जात आहे.(Fifa World Cup 2022)
यापूर्वी अर्जेंटिनाने वर्ष २०१४ च्या फाइनलमध्ये झेप घेतली होती. पण तेव्हा त्यांना पराभव स्विकारावा लागला होता. अर्जेंटिनासह संपूर्ण जगातील चाहते मेस्सी याचे कौतुक करत आहेत. अखेर मेस्सीचे स्वप्न यंदाच्या फिफा वर्ल्डकप मध्ये पूर्ण झाले आहे.
जेव्हा मेस्सी फक्त ११ वर्षाचा होता तेव्हा असे कळले की, त्याला गंभीर आजार आहे. तो म्हणजे ग्रोथ हार्मोन डेफिसिएंसी. जर मेस्सीला त्या वेळी योग्य उपचार मिळालेले नसते तर जगासमोर तो आज एक दिग्गज फुटबॉलर म्हणून कधीच नावारुपाला आला नसता. २४ जून १९८७ रोजी मेस्सी याचा जन्म एका सामान्य परिवारात झाला होता. त्याचे वडिल एका फॅक्ट्रीत काम करायचे तर आई ही सफाई कामगार होती. मेस्सीला फुटबॉल खेळण्याची आवड तेव्हापासून सुरु झाली जेव्हा त्याने आपल्या वडिलांच्या कोचिंगला पाहिले होते. मेसी त्या क्लब सोबत वयाच्या ५ व्या वर्षापासून खेळू लागला होता.(Fifa World Cup 2022)
टॅलेंट पाहून बार्सिलोनाने घेतले
मेस्सी याचे नशीब अशावेळी पालटले जेव्हा बार्सिलोनाने कमी वयातच त्याचे टॅलेंट पाहिले आणि त्याला संघात घेतले.येथूनच लियोनेल मेसी याच्या प्रोफेशनल करियरला सुरुवात झाली. १७ व्या वर्षात मेस्सीने सीनियर टीमसाठी पहिला गोल केला. २०१० मध्ये मेस्सीवर संपू्र्ण अर्जेंटिनीला अपेक्षा होती पण तेथे त्याला एक ही गोल करता आला नाही. क्वार्टरफाइनल मधूनच संघाला माघार घ्यावा लागला होता. २०१४ मध्ये मेस्सीने शानदार खेळी केली आणि संघ फाइनल पर्यंत पोहचला. पण फाइनलमध्ये जर्मनीच्या संघाने त्यांचा पराभव केला. मेस्सी ८ वर्षापासून फक्त वर्ल्ड कप जिंकण्याचे स्वप्न पाहत होता. त्याचे स्वप्न मात्र आता पूर्ण झाले असून अर्जेंटिनाचा संघ हा विजयी झाला आहे.
हे देखील वाचा- कतारच नाही तर शेजारील देशांमध्येही पर्यटकांचा पूर…
७ वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी
सोशल मीडियात सध्या एक ट्विट जोरदार व्हायरल होत आहे. त्यामध्ये मेस्सी वर्ल्ड चॅम्पियन होईल अशी भविष्यवाणी करण्यात आली होती. खरंतर २१ मार्च २०१५ रोजी जोस मिगुएल पोलांको नावाच्या व्यक्तीने ट्विट केले होते. त्याने त्यात असे म्हटले होते की, १८ डिसेंबर २०२२ रोजी ३४ वर्षीय लियोनेल मेस्सी वर्ल्ड कप जिंकणार. यावरुन आता विविध प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. काहीजण हे ऐकून हैराण झाले आहेत तर काही लोक ते ट्विट एडिटेड असल्याचे सांगितले जात आहे.