तमिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टालिन यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी आता महिला बॉडीगार्ड्सला देण्यात आली आहे. त्यांच्या सुरक्षिततेसाठी ९ महिला बॉडीगार्ड्स असणार आहेत. स्टालिन यांच्या सुरक्षितेतसाठी सफारी सूट घालून X95 सब मशीन गन, AK-47 आणि 9mm पिस्तुलासह त्या दिसणार आहेत. या सर्व महिला बॉडीगार्ड्स या तमिळनाडूतीलच असणार आहेत. या कामासाठी ८० अर्जदारांपैकी ९ महिलांची निवड स्टालिन यांच्या कोर सिक्युरिटी टीमसाठी करण्यात आले आहे. देशात असे पहिल्यांदाच होत आहे की, एखाद्या मुख्यमंत्र्याने आपल्या सुरक्षिततेसाठी महिला बॉडीगार्ड्स ठेवल्या आहेत. जगभरात असे काही सेलिब्रेटीज आहेत ज्यांनी महिला सुरक्षारक्षकांना आपल्या सुरक्षिततेसाठी ठेवले आहे. (Women Bodyguards)
या कारणास्तव ठेवल्या महिला बॉडीगार्ड्स
स्टालिन यांच्या सिक्युरिटी टीममध्ये महिलांना सहभागी करण्याची घोषणा यंदाच्याच वर्षात ८ मार्चला असणाऱ्या महिला दिनावेळी करण्यात आली होती. महिलांना सशक्त करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षितत्या ताफ्यात सहभागी होण्यासाठी अर्ज मागवण्यात आले होते. अर्ज करणाऱ्या महिलांना शारिरीक आणि मानसिक चाचणीला सामोरे जावे लागले. काही महिन्यांच्या ट्रेनिंग नंतर ९० अर्जदारांपैकी फक्त ९ महिलांना मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षिततेसाठी निवडण्यात आले आहे.
मुख्यमंत्र्यांची सुरक्षिततेची जबाबदारी सब-इंन्स्पेक्टर एम तनुष कन्नकी, हेड कॉन्स्टेबल एम दिलस्थ बेगम, कॉन्स्टेबल आर विद्या, जे सुमति, एम कालेश्वरी, के पवित्रा, जी रामी, वी मोनिशा आणि के कौशल्या यांच्यावर असणार आहे.
कशी होती त्यांची ट्रेनिंग?
सुरक्षिततेसाठी निवडण्यात आलेली पवित्रा असे सांगते की, मला प्रथम डीएमके मुख्यलय अन्ना एरीवलयम येथे तैनात करण्यात आले होते. जेव्हा मुख्यमंत्र्यांच्या येथे सुद्धा सुरक्षारक्षासंदर्भात कळले तेव्हा मी अर्ज केला आणि निवड झाली. रामी असे म्हणते की, सिक्युरिटी टीममध्ये सहभागी होण्यासाठी ट्रेनिंग दरम्यान आमची शारिरीक आणि मानसिक चाचणी केली. जसे की, एका मिनिटांमध्ये समोरून जाणाऱ्या कारमधील लोकांची संख्या किती किंवा आजूबाजूच्या गोष्टींवर ही लक्ष ठेवणे.
सर्व सुरक्षारक्षकांना गोपनियतेची शपथ दिली होती. मुख्यमंत्र्यांसंदर्भात कोणतीही माहिती परिवाराला किंवा अन्य कोणाला ही सांगण्यासाठी बंदी होती. निवड झाल्यानंततर त्यांची मरुधम कमांडो ट्रेनिंग सेंटरमध्ये ट्रेनिंग सुरु आहे. ड्युटीपूर्वी सर्व गार्ड्सला सकाळी ६ वाजता ट्रेनिंग दिली जाते. तसेच दररोज ३ किमी धावण्यास सांगितले जाते. त्यानंतर व्यायाम केला जाो. त्यांना १ मिनिटांमध्ये ३० पुशअप्स मारण्यास सांगितल्या जातात. (Women Bodyguards)
हे देखील वाचा- वयाच्या ६० व्या वर्षी सेवानिवृत्ती नाही, का राज्य सरकारला मागे घ्यावा लागला निर्णय?
असे सेलिब्रेटीज ज्यांनी महिला बॉडीगार्ड् ठेवल्या
जगातील असे काही नेते आणि सेलिब्रेटी झाले त्यांनी आपल्या सुरक्षिततेसाठी महिला बॉडीगार्ड्स ठेवल्या. यामध्ये ब्रिटेनचे माजी पंतप्रधान डेविड कॅमरुन, पॉप स्टार बियॉन्से, शाही परिवारातील केड मिडल्टन आणि मेगन मार्केल यांचा सुद्धा समावेश आहे. ऐवढेच नव्हे तर लिबियावर ४० वर्षांपर्यंत राज करणारा तानाशाह गद्दाफी आपल्या लाइफस्टाइलसाठी खुप प्रसिद्ध होता. त्याच्या सुरक्षिततेसाठी १५ महिला गार्ड्स असायच्या.