दिल्लीतील एम्सच्या सर्वरवर करण्यात आलेल्या सायबर आरोपीला अद्याप पकडण्यात आलेले नाही. अशातच काही आठवड्यातच सायबर हल्लेखोरांनी हेल्थ सिस्टिम संदर्भातील आणखी एक महत्वाचे पोर्टलवर अटॅक केला आहे. डार्कबेववर एका ईराणी हॅकरने पोस्ट करुन असा दावा केला आहे की, त्याच्याकडे कोविन प्लॅटफॉर्मच्या अॅडमिनचे एक्सेस म्हणजेच युजरनेम आणि पासवर्ड आहेत. या महिला हॅकरने आपल्या पोस्टमध्ये असे म्हटले की, तिनो कोविन प्लॅटफॉर्मवर असलेल्या हेल्थकेअर वर्कर्सचा सेंसिटिव्ह डेटा मिळवला आहे, जो तिला आता विक्री करायचा आहे. कोविन प्लॅटफॉर्मवर देशातील जवळजवळ ११० कोटी लोकांचा खासगी डेटा उपलब्ध आहे, जो हॅकरचा दावा खरा ठरल्यास तर तो धोक्यात येऊ शकतो. त्याचसोबत या दाव्यानंतर देशातील सार्वजनिक पोर्टलवर सामान्य जनतेचा सेंसिटिव्ह डेटाच्या सुरक्षिततेसंदर्भात नवे प्रश्न उपस्थितीत झाले आहेत. (COWIN Portal Hack)
हॅकरने शेअर केला पोर्टलच्या एक्सेसचा स्क्रिनशॉट
ईराणी हॅकरने डार्कबेववर करण्यात आलेल्या पोस्टमध्ये दावाच नव्हे तर कोविन प्लॅटफॉर्मच्या एक्सेसचा एक स्क्रिनशॉट ही शेअर केला आहे. या स्क्रिनशॉटमध्ये काही हेल्थ वर्कर्सचे मोबाईल क्रमांकांसह काही खासगी डेटा सुद्धा दिसून येत आहे. हॅकरने एका अन्य स्क्रिनशॉटमध्ये कोविन प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असलेल्या वॅक्सीनेशन सेंटरची माहिती ही शेअर केली आहे. हॅकरने दावा केला आहे की, हे दोन्ही स्क्रिनशॉट्स कोविन प्लॅटफॉर्मच्या अॅडमिन पेजचे आहे, ज्याचा कंट्रोल तिच्याकडे आहे.
Zee News च्या रिपोर्टनुसार या हॅकरचे नाव नजीला ब्लॅकहॅट आहे आणि ती ईराणच्या APT ग्रुप Shield Iran Security Team ची सदस्य आहे. तिच्यामुळे जगभरातील काही सरकारे सुद्धा त्रस्त आहेत. कोविन पोर्टलवर हल्ला करणाऱ्या या ईराणी हॅकरने डार्कवेबवर आपले टेलीग्राम युजरनेम सुद्धा शेअर केले आहे. तसेच असे ही लिहिले आहे की, जो व्यक्ती कोविन पोर्टवरचा एक्सेस खरेदी करु इच्छित आहे त्याने टेलीग्रामच्या माध्यमातून मला संपर्क करावा.
चॅट केल्यानंतर हॅकरने दिला सेंसिटिव्ह डेटा
या प्रकरणी अधिक माहिती घेण्यासाठी झी न्यूजच्या टीमने टेलीग्राम मेसेंजवर या हॅकर सोबत बातचीत केली. त्यानंतर तिने आपल्या दाव्याच्या पुष्टीसाठी काही स्क्रिनशॉट शेअर केले. त्या मध्ये असे स्पष्टपणे दिसून येत आहे की, हे हॅकर बंगळरुतील एका आरोग्य कर्मचाऱ्याच्या युजर अकाउंटच्या माध्यमातून admin.cowin.gov.in वेबसाइटला एक्सेस करत होती. या हॅकरने सांगितले की, कोविन प्लॅटफॉर्मवर अॅडमिन एक्सेससाठी ती ३० डॉलर म्हणजेच २५ हजार रुपयांना विक्री करेल. हॅकरला या बद्दल कशी माहिती मिळाली तर तिने Private Exploit तंत्रज्ञान असे म्हटले.(COWIN Portal Hack)
हे देखील वाचा- एखाद्या वेबसाइटवर तुमचा डेटा Save केलायं हे तपासून पाहण्यासाठी ‘ही’ ट्रिक वापरा
कोविन पोर्टल हॅक होणे अधिक चिंताजनक
कोविन पोर्टलच्या माध्यमातून भारत सरकारने जगातील सर्वाधिक मोठे लसीकरण कार्यक्रम चालवले होते. कोरोना व्हायरसच्या महारोगाच्या विरोधात कोविड१९ वरील लस ही सामान्य नागरिकांना या पोर्टलच्या माध्यमातून दिली गेली. लसीकरणासाठी जवळजवळ ११० कोटी लोकांनी पोर्टलवर आपले रजिस्ट्रेशन केले होते. ज्यामध्ये आधार क्रमांक, मोबाईल क्रमांकासह काही खासगी माहिती दिली होती. जर पोर्टल हॅक झाल्यास तर भारतीयांचे खासगी आयुष्य प्रभावित होऊ शकते.