Home » पाकिस्तानातील ‘हे’ विचित्र नियम तुम्हाला माहितेय का?

पाकिस्तानातील ‘हे’ विचित्र नियम तुम्हाला माहितेय का?

by Team Gajawaja
0 comment
Pakistan Weird Rules
Share

भारताच्या शेजारील देश पाकिस्तान भले आपल्यापासून विभक्त होऊन बनला आहे. तरीही तेथे आज ही काही गोष्टी या आपल्यापेक्षा अधिक वेगळ्या आहेत. एका बाजूला भारत जेथे विज्ञानाच्या जगात ते मनोरंजनाच्या जगतापर्यंत दिवसागणिक प्रगती करत आहेत. तर पाकिस्तान मध्ये आज सुद्धा असे नियम-कायद्यांचे पालन केले जात आहेत जे १९ व्या शतकातील आहेत.जेव्हा तुम्ही या कायद्याबद्दल ऐकाल तर अखेर या देशातील लोक कशा पद्धतीने राहत असतील? सोशल मीडिया प्लॅटफॉर्म कोरा आणि न्यूजक्रॅब वेबसाइटच्या हवाल्यातून हे काही कायदे सांगितले गेले आहेत जे अधिक विचित्र आहेत.(Pakistan Weird Rules)

पाकिस्तान हा खरंतर मुस्लिम बहुल देश आहे. तर येथे बहुतांश लोक रमजानच्या दिवसात रोजा ठेवतो. रोजाच्या दरम्यान बाजारात स्ट्रिटफूड किंवा काही सुद्धा खाण्यावर बंदी आहे. सार्वजनिक ठिकाणावर जर तुम्ही खाताना दिसलात तर तुम्हाला शिक्षा होऊ शकते. त्याचसोबत जर तुम्ही मु्द्दाम किंवा चुकून ही दुसऱ्याच्या फोनला हात लावल्यास तुम्हाला तुरुंगवास होऊ शकतो. येथे परवानगी शिवाय फोनला हात लावणे बेकायदेशीर आहे. यामुळे तेथे ६ महिन्यापर्यंत शिक्षा होऊ शकते.

Pakistan Weird Rules
Pakistan Weird Rules

आजच्या काळात सोशल मीडियावर मीम्स शेअर करणे सामान्य बाब आहे. ते पाठवताना सुद्धा एकमेकांना टॅग ही केले जाते. त्याचसोबत काहीजण आपल्या टाइमलाइनवर ही शेअर करतात. पण पाकिस्तानात तु्म्ही असे केल्यास तु्म्हाला दंड भरावा लागू शकतो. जर तुम्ही एखाद्याची मस्करी करण्यासाठी मीम शेअर केल्यास तर तुम्हाला दंड होऊ शकतो.

त्याचसोबत काही भारतीय, जनतेद्वारे नियुक्त केले गेलेले पंतप्रधान मंत्र्यांना अपशब्द बोलू लागतात आणि सोशल मीडियात सुद्धा वाईट बोलतात. वाद-विवाद आणि एकमत असणे किंवा नसणे हे लोकशाहीत असणे गरजेचे आहे. पण पंतप्रधानांचा सोशल मीडियात अपमान करणे चुकीचे आहे. तरीही काही वेळेस त्यांच्यावर कठोर कारवाई केली जात नाही. पण पाकिस्तानात असे नाही. तेथील नागरिक जर सार्वजनिक पोर्टलवर आपल्या पंतप्रधानांबद्दल वाईट बोलले तर त्यांना तातडीने तुरुंगवास होतो. त्यामुळे पीएमच्या विरोधात एखादी टीप्पणी करु शकत नाहीत. या व्यतिरिक्त पाकिस्तानात काही अरबी शब्दांचा इंग्रजीत ट्रांन्सलेशन करण्यासह ही बंदी आहे. जसे की, अल्लाह, मस्जिद, रसूल, नबी असे शब्द.(Pakistan Weird Rules)

हे देखील वाचा- काही ठिकाणी मृत्यूची शिक्षा तर कुठे नोकरीवरुन गुडबाय! समलैंगिकांसंबंधित जगातील ‘हे’ देश आहेत कठोर

पाकिस्तानच्या परराष्ट्र नितीनुसार ते इज्राइलला देश मानत नाहीत. त्याचसोबत आपल्या नागरिकांना इज्राइला जाण्यास परवानगी देत नाही. याच कारणामुळे पाकिस्तानचे सरकार इज्राइलला जाण्याचा वीजा देत नाही. तसेच पाकिस्तानात शिक्षेचा स्तर हा अत्यंत कमी आहे. याचे मोठे कारण असे की, येथे देणाऱ्या शिक्षणासाठी फी वरील टॅक्स ही लागतो. जर एखादा विद्यार्थी शिक्षणावर २ लाख रुपयांपेक्षा अधिक खर्च करत असेल तर त्याला ५ टक्के टॅक्स द्यावा लागतो.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.