बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांची मुलगी रोहिणी आचार्य हिने आपल्या वडिलांना किडनी दिली. सिंगापुर मध्ये तिची यशस्वीपणे ट्रांसप्लांट सर्जरी पूर्ण झाली. या संदर्भात आता रोहिणी हिच्याबद्दल चर्चा करत आहेत. तर काही जणांच्या मनात असा ही प्रश्न उद्भवत आहे की, भारतात किडनी दान करण्यासंदर्भात काय नियम आहेत. भारतातील लोक परदेशात जाणे का पसंद करतात आणि कोणती लोक किडनी दान करु शकतात. तर याच सर्व प्रश्नांची उत्तरे आपण पाहूयात. (Kidney transplantation)
NOTTO कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, किडनी दोन प्रकारची लोक दान करु शकतात. प्रथम जीवंत व्यक्ती म्हणजेच ज्याला आपल्या मर्जीने आपली एक किडनी दान करायची असते. कारण दुसऱ्या किडनीच्या मदतीने ते जगू शकतात. या व्यतिरिक्त दुसरा पर्याय असा की, मृत व्यक्ती. ही अशी व्यक्ती ज्याचा एखाद्या कारणास्तव मृत्यू झाला आहे. तो व्यक्ती आपल्या शरिराचा कोणताही अवयव दान करु शकतो. अशा प्रकारचे अवयव दान करुन दुसऱ्या रुग्णाला जीवनदान देऊ शकतो.
वयाची मर्यादा काय असते?
खरंतर अवयव देण्यासाठी वयाची मर्यादा ही वेगवेगळी असते. पण ते या गोष्टीवर अवलंबून असते की, तो व्यक्ती जीवंत आहे की मृत. उदाहरणासाठी जीवंत व्यक्ती असेल तर त्याचे वय हे १८ वर्षापेक्षा अधिक असावे. तसेच बहुतांश लोकांसाठी निर्णय घेणाऱ्या व्यक्तीचे त्यावेळी वय नव्हे तर काही वेळेस स्थिती ही पाहिली जाते. तज्ञांच्या मते, व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्या व्यक्तीचा कोणता अवयव हा दुसऱ्या व्यक्तीसाठी उपयुक्त आहे हे पाहतात. ७० आणि ८० च्या दशकात लोकांचे अवयव आणि ऊती या संपूर्ण जगात यशस्वीपणे ट्रांन्सप्लांट केले होते. यामध्ये ऊती आणि डोळ्यांप्रकरणी वय महत्वाचे नसते. एका मृत दात्याचे अवयव आणि ऊती दान करु शकतात पण त्यासाठी वयाची मर्यादा असते. परंतु किडनी आणि लिवर दान करण्याचे वय अधिकाधिक ७० वर्ष असते.

कोण किडनी देऊ शकते?
किडनीचे दान परिवारातील सदस्य जसे आजी-आजोबा, काका-काकी, मामा-मामी, पती-पत्नी, आई-वडिल किंवा मुलं सुद्धा दान करु शकतात. अवयवांचे ट्रांन्सप्लांट हे केवळ जीवन रक्षक उपचारांच्या रुपात केले जाते. केवळ ट्रांन्सप्लांट टीमच हे ठरवु शकते की, रुग्णाच्या समोर येणारी जोखिम ही त्याला घेता येऊ शकते की नाही. प्रत्यारोपण टीम डोनरचा मृत्यू दर आणि रुग्णता लक्षात ठेवते.
परदेशात का करतात सर्जरी
बीबीसीच्या एका रिपोर्ट्सनुसार, अमेरिका आणि चीन नंतर भारत तीसरा देश आहे जेथे शरिराच्या अवयवांचे अधिक ट्रांन्सप्लांट केले जाते. हा आकडा ग्लोबल ऑब्जर्वेटरी ऑन डोनेशन अॅन्ड ट्रांन्सप्लांटेशनने जारी केला आहे. मात्र ही लोकांची खासगी इच्छा आणि सुविधेवर निर्भर करते की, त्यांना कुठे सर्जरी करायची आहे. दरम्यान, परदेशात ही मोठ्या संख्येन रोगी येथे येऊन ट्रांन्सप्लांट करतात.(Kidney transplantation)
हे देखील वाचा- हिमोफिलिया आजार नक्की काय आहे? जाणून घ्या अधिक
काय आहे भारतात कायदा?
भारतात कायद्याअंतर्गत अयवयव दान आणि ट्रांन्सप्लांट करण्याची परवानगी आहे. त्यानुसार मानव अंग प्रत्यारोपण अधिनियम १००४ अंतर्गत येते. ज्यामध्ये मृत किंवा जीवंत व्यक्ती हा आधीच आपले अवयव दान करण्यासंदर्भात परवानगी देतो. वर्ष २०११ मध्ये अधिनियम मध्ये संशोधनाच्या माध्यमातून मानव ऊती दान करण्याचे यामध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. अशा प्रकारे संशोधित अधिनियम ऊती आणि अवयव प्रत्यारोपण अधिनियम २०११ आहे.