टोयोटा किर्लोस्कर मोटरचे वाइस चेयरपर्सन विक्रम किर्लोस्कर (Vikram S Kirloskar) यांचे वयाच्या ६३ व्या वर्षी हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. किर्लोस्कर हे व्यावसायिक परिवाराच्या चौथ्या पढीचे सदस्य होते. त्यांना भारतातील ऑटोमोटिव्ह इंडस्ट्रीला नव्या दिशेने घेऊन जाणारे मानले जायचे. टोयोटाचा व्यापार हा भारतात आणण्याचे श्रेय हे त्यांनाच जाते. विक्रम किर्लोस्कर यांचा जन्म १९५८ मध्ये झाला होता. त्यांचे वडील श्रीकांत किर्लोस्कर, हे किर्लोस्कर ग्रुप झपाट्याने वाढणाऱ्या एसएल किर्लोस्कर यांचे पुत्र होते.
शाळेच्या शिक्षणादरम्यान मिळाले संकेत
विक्रम यांनी आपले शालेय शिक्षण हे उटीतील लॉरेंस शाळेतून घेतले. त्यांना आपल्या शब्दात शिकणे फार आवडायचे आणि ते त्यात तरबेज होते. शाळेत ते बॅडमिंटन खेळले आणि विमानाचे मॉडल तयार करण्यासाठी एयरोची मॉडलिंग सुद्धा केली. येथून त्यांच्या प्रोडक्शन इंजिनियरिंग आणि मॅन्युफॅक्चरिंग मध्ये करियर बनवण्याचे सुरुवातीचे संकेत होते. शिक्षणामुळे त्यांना परिवाराच्या व्यवसायात एन्ट्री करण्यासाठी मदत मिळाली. किर्लोस्कर यांनी असे म्हटले होते की, व्यावसायिक इंजिनिअरिंगसाठी मी इथे तिथे फिरत राहिले आणि मला इंजिनिअयरिंगच्या शिक्षणामुळे फार मदत झाली.
सुरुवातीला उत्तम कामगिरीसाठी दबाव
विक्रम किर्लोस्कर यांना बिझनेस प्रोडक्शन इंजिनिअयरिंग पासून सुरुवात केली. त्यानंतर कंपनीत सुरुवातीच्या वर्षांमध्ये काही टूल्स आणि प्रोसेसचा विकास ही केला. प्रतिष्ठित बिझनेस फॅमिली असल्याने त्यांच्यावर लवकर पण उत्तम कामगिरी करण्याचा दबाव होता. त्यांनी असे म्हटले होते की, मी पुण्यात किर्लोस्कर कमिंस मध्ये मॅन्युफॅक्चरिंग मध्ये ट्रेनी होतो, जेव्हा मी काम सुरु केले होतो तेव्हा.

तर ज्यावेळी एसयूवीच्या नावावक केवळ टाटा सफारी आणि त्याआधीची सिएरा सारख्या दोन-तीन गाड्या मार्केटमध्ये उपलब्ध होत्या. परंतु या गाड्या सर्वसामान्यांना परवडणाऱ्या नव्हता. ज्या लोकांना त्या गाड्यांचे वेड होते तीच लोक त्या ठेवायचे. यामागील मोठे कारण असे की, त्यांची देखरेख आणि महागडी रनिंग कॉस्ट. मात्र विक्रम यांनी याचे संपूर्ण चित्रच बदलले.
देशात जेव्हा १९९९ मध्ये बजेट कारचा काळ आला तेव्हा आलिशान गाड्या ग्राहकांसाठी फार कमी होत्या. त्या सुद्धा एसयूवीच्या बरोबरचीच्या नव्हत्या. अशातच टोयोटाने एक बॉक्सी डिझाइनमधील एमपीवी कम एसयूवी उतरवली. ती होती क्विलिस. देशभरात अचानक टोयोटाचे मोठे शोरुम दिसू लागले होते. पण या गाडीची डिझाइन पाहून सुरुवातीला लोकांनी ती चालवण्यास नकार दिला खरा. पण ज्यांनी ही गाडी चालवली तो त्याच्या प्रेमातच पडला. अशा प्रकारे हळूहळू लोकांना क्वालिस आवडू लागली होती. याची विक्री ही अधिकाधिक वाढू लागली. पण यामागे विक्रम यांची कल्पना आणि मार्केटिंग स्ट्रॅटेजी होती.(Vikram S Kirloskar)
हे देखील वाचा- तंत्रज्ञानाच्या क्रांतीने बदलणारे “बिल गेट्स”
नंतर आला इनोवाचा काळ
क्वालिसची विक्री होत नव्हती म्हणून जबरदस्तीने ती विक्री केली जात होती. अशातच अचानक कंपनीने त्याचे प्रोडक्शन बंद केले आणि रात्रीच्या रात्री शोरुम मधील क्वालिस कमी झाल्या. त्याचसोबत २००५ मध्ये इनोवाने मार्केटमध्ये एन्ट्री केली. आतापर्यंत लोकांना एक एयरोडायनेमिक शेपसह ८ सीटर गाडीच्या डिझाइनची सवय किंवा ती पाहिली नव्हती. इनोवाने मात्र पहिल्या एका वर्षात अधिक विक्री केली नाही पण विक्रम यांनी सुद्धा हार मानली नाही. क्वालिस बंद केल्यानंतर आलेल्या वॅक्युम भरण्यासठी इनोवाला प्रमोट केले जाऊ लागले. एक आधुनिक इंजिन, बॉडी लाइन आणि टेक्नीकपेक्षा लैस इनोवा लोकांना पसंद पडू लागली. तर २००७ मध्ये इनोवाच्या सेल्सने सर्व रेकॉर्ड ब्रेक केले होते. त्यावेळी कंपनीने ५ हजार युनिट्सची विक्री केली होती.
तर आत भारतात टोयोटाच्या व्यवसायात काही कंपन्यांचा समावेश आहे. जेथे किर्लोस्कर सिस्टिम्स पार्टनर आहेत. Kirloskar Systems Ltd विक्रम किर्लोस्कर यांचे मालकी हक्क असणारी होल्डिंग आणि गुंतवणूक कंपनी आहे. जी टोयोटासह टेक्सटाइन मशीन, कार, ऑटो कंम्पोनंट्स, अॅल्युमिनियम डाय कास्टिंगसह मॅन्युफॅक्चरिंग सारख्या सेक्टरमध्ये आहेत.