आपण टेलिव्हिजनवर विविध कार्यक्रम, सिनेमे किंवा गेम्स पाहतो. सध्या मार्केटमध्ये बहुतांश स्मार्ट टीव्ही उपलब्ध आहेत. ते भितींवर अगदी सहज लावता येतात. पण त्याची साफसफाई करताना बहुतांश लोक काही गोष्टींकडे दुर्लक्ष करतात. जुन्या काळात बहुतांश लोक टीव्ही एका टेबलावरुन ठेवून ते सजवून ठेवायचे. ऐवढेच नव्हे तर सिनेमा पाहून झाल्यानंतर सुद्धा त्यावर कवर टाकायचे. याच कारणास्तव काही लोकांच्या घरात जुने टीव्ही अद्याप ही दिसून येतात. (TV Screen Cleaning)
आजच्या काळात स्वच्छता फार कमी लोक करतात. काही लोक असे सुद्धा आहेत की, त्यासाठी चुकीचा मार्ग वापरतात. यामुळे पिक्चर क्वालिटीमध्ये घट होण्यासह त्याच्या स्क्रिनवर स्क्रॅच सुद्धा येण्याची शक्यता असते. जर तुम्हाला टीव्हीची स्वच्छता करायची असेल तर आम्ही तुम्हाला काही त्याबद्दलच्या टीप्स सांगणार आहोत.
-स्वच्छ करण्यापूर्वी प्लगमधून त्याची पिन काढा
टीव्ही स्क्रिन स्वच्छ करण्यापू्र्वी त्याची पिन बोर्डातून बाहेर काढा. काही वेळा बहुतांश लोक टीव्ही सुरु केल्यानंतर पिक्चर क्वालिटी घराब झाली आहे म्हणून एखादे फडके किंवा कापडाने त्याची सफाई करणे सुरु करतात. अशातच शॉर्ट सर्किट होण्यासह अन्य काही पद्धतीच्या समस्या येऊ शकतात. काही लोक अशी सुद्धा असतात जी केबल टीव्ही ऑफ केल्यानंतर त्याची लगेच स्वच्छता करता. पण तसे करण्यापासून दूर रहा.
-स्वच्छ करण्यापूर्वी काही गोष्टींची काळजी घ्या
स्क्रिनची स्वच्छता करताना सावधगिरी बाळगा. त्यामुळे टीव्हीवर होणारा खर्च वाचेल. स्क्रिन स्वच्छ करण्यापूर्वी तो भिंतीवरुन खाली काढा. जर तो खाली काढणे संभव नाही तर एखादे टेबल घेऊन त्याची सफाई करा. काही लोक टीव्हीला धरुन स्वच्छता करण्यास सुरुवात करतात अशातच टीव्हीवर जोर पडल्याने तो बिघडू शकतो.
-कठीण वस्तूने स्वच्छ करण्यापासून दूर रहा
कठीण वस्तूने स्वच्छ करण्यापासून दूरच राहिलेले बरे. काही लोक शर्टचा वापर करतात. भले ते सुती कापड का असे पण त्याची बटण स्क्रिनला लागल्यास त्यावर स्क्रॅच येण्याची शक्यता असते. मार्केटमध्ये बहुतांश स्क्रिन क्लिनिंग किट उपलब्ध आहेत. ते तुम्ही खरेदी करु शकता. (TV Screen Cleaning)
-पाण्याचा वापर करु नका
जरी तुम्हाला टीव्हीची स्क्रिन स्वच्छ करायची असेल तर एखादे उत्तम ब्रँन्डचे क्लिनिंग लिक्विड खरेदी करा. मात्र पाण्याचा वापर करण्यापासून दूर रहा. कारण ते जर टीव्ही स्क्रिनच्या आतमध्ये गेल्यास तुम्हालाच त्याचा फटका बसू शकतो.
हे देखील वाचा- पाण्याच्या बाटलीवर रेषा का असतात?
-प्लाज्मा किंवा एलसीडी फ्लॅट स्क्रिनची अशी करा सफाई
प्लाज्मा किंवा एलसीडी यांची जाडी फार कमी असते. अशातच त्यांचे वजन सुद्धा कमी असते. त्यामुळे त्याची स्वच्छता करताना एकाच हाताने करु नका.जर सुती कापडाच्या मदतीने ती स्क्रिन स्वच्छ करत असाल तर दुसऱ्या हाताने टीव्ही सुद्धा पकडून रहा.