आपले आरोग्य सुदृढ रहावे म्हणून आपल्याला दररोज १०-१५ मिनिटे तरी व्यायाम करावा असे सांगितले जाते. व्यायामाचे विविध प्रकार ही आहेत. काहींना जिममध्ये जाऊन व्यायाम करणे आवडते तर काहींना आउटडोर व्यायाम किंवा चालणे, धावणे अथवा योगा करणे आवडते. अशातच जर तुम्ही धावण्यासाठी दररोज जात असाल तर तो सुद्धा उत्तम व्यायाम आहे. यामुळे वॉफी फॅट कमी होते आणि ब्लड सर्कुलेशन वेगाने होते. त्याचसोबत यामुळे आजारांपासून सुद्धा बचाव होतो. मात्र धावताना काही चुका आपण करतो ज्यामुळे आपल्याला काही समस्यांचा सामना करावा लागतो. (Running Tips)
वजन कमी करण्यासाठी आपण जोश मध्ये येऊन चुकीच्या पद्धतीने धावतो. अशातच आपल्याला धावण्यामुळे जे फायदे होतात ते होत नाहीत. या उलटच तुम्हाला नुकसान होते. तुम्हाला नेहमीच धावताना जाणवते की, गुडघ्यांखालील मसल्समध्ये सूज किंवा खेचल्यासारखे वाटू लागते. दरम्यान ही समस्या सामान्य आहे. पण त्यापासून बचाव करणे ही फार गरजेचे आहे.

त्याचसोबत जर तुम्ही धावण्यासाठी चुकीचे शूज वापरत असाल तर तुमच्या पायांच्या तळवे दुखणे हे सामान्यच आहे. त्यासाठी नेहमीच लक्षात ठेवा की, धावण्यासाठी रनिंग शूजचाच वापर करावा. जेणेकरुन तुम्हाला या समस्येपासून दूर राहता येईल. सर्वात महत्वाचे म्हणजे मसल्स आणि बॉडी स्ट्रेच करा. धावताना २-३ मिनिटांचा ब्रेक सुद्धा घ्या. सुरुवातीला वेगाने धावण्यापासून दूर रहा.
धावताना आपले शरिर पुढील बाजूला झुकलेले असावे. जेणेकरुन शरिराचा सर्व भार हा गुडघ्यांवर येणार नाही आणि दुखणार ही नाही. जेव्हा तुमचा पाय शरिराच्या समोर येते तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की, तुम्ही धावण्यासाठी ब्रेक लावत आहात आणि त्याचा थेट परिणाम तुमच्या गुडघ्यावर होतो. तसेच तुम्ही पहिल्यांदा किंवा काही महिन्यांनंतर पुन्हा धावण्यासाठी बाहेर पडला असाल तर काही वेळ चाला. त्यानंतरच धावण्याचा सराव करण्याचा प्रयत्न करा. (Running Tips)
हे देखील वाचा- शरिरातील कोलेस्ट्रॉल वाढल्यास होऊ शकतात ‘या’ समस्या, वेळीच काळजी घ्या
धावण्याचा वेग वाढवण्यासाठी फायदेशीर ठरणारे फूड्स
धावण्याचा स्टॅमिना वाढवण्यासाठी तुम्ही डाइट ही करु शकता. मात्र स्टॅमिना खरोखरच तुम्हाला वाढवायचा असेल तर तुमच्या खाण्यापिण्यात महत्वाची पोषक तत्वांचा समावेश करणे फार गरजेचे आहे. त्यासाठी तुम्ही प्रोटीन, विटामिन आणि कार्बोहायड्रेडचा संतुलित आहार घेऊ शकता. प्रोटीन, कॅल्शियम, विटामिन आणि पुरेश्या प्रमाणातील द्रव्य पदार्थांचे सेवन करुन तुम्ही स्टॅमिना वाढवू शकता.