प्रवास करताना आपण पाण्याची बॉटल खरेदी करणे कधीच विसरत नाही. मात्र पाण्याच्या बॉटलचा ब्रँन्ड जरी बदलला गेला असला तरीही त्यावर असणाऱ्या रेषा या काही वेळा सारख्याच असततात. म्हणजेच त्यांचे डिझाइन समान असते. अशातच तुम्ही कधी विचार केला आहे का, यामागे काय कारण असेल? खरंतर यामागे एक विज्ञान आहे. फॅक्ट्री मध्ये जेव्हा पाण्याच्या बाटलीचे डिझाइन तयार केले जाते तेव्हा या रेषांकडे दुर्लक्ष केले जात नाही. तर जाणून घेऊयात पाण्याच्या बाटलीवर रेषा नक्की का दिल्या असतात त्याबद्दलच अधिक. (Lines on Plastic Bottle)
बाटलीवर असणाऱ्या रेषांचा संबंध हा काही प्रकारचा असतो. जसे त्या रेषा पाण्याच्या बॉटलच्या सुरक्षिततेसाठी असतात. कारण या रेषांच्या माध्यमातून बाटलीला मजबूतपणा मिळण्यास मदत होते. अशातच आणखी एक प्रश्न उपस्थितीत होतो की, प्लास्टिकच्या बॉटल या काही प्रकारच्या असतात, तरीही सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यावर रेषा का नसतात. तर हे सुद्धा समजून घेऊयात.
खरंतर ज्या पाण्याच्या बाटलींमध्ये मिनिरल वॉटरचा वापर केला जातो त्याचे प्लास्टिक हे अधिक मऊ असते. जेव्हा त्यामध्ये पाण्याच्या बाटलीतील पाणी कमी होते तेव्हा ते त्या रेषांना जाऊन चिकटण्याचा प्रयत्न करते. अशातच जर बाटलीवर प्लास्टिकच्या रेषा न बनवल्यास ते खराब होण्याचा धोका अधिक वाढतो आणि बाटलीतून पाणी बाहेर सुद्धा येऊ शकते. त्यामुळेच हे अशासाठी केले जाते. आता याचे आणखी एक कारण आहे ते सुद्धा पाहूयात.
बाटलीवरील रेषा फक्त मजबूतपणासाठीच नव्हे तर ते ग्रिपचे सुद्धा काम करतात. म्हणजेच जेव्हा आपण बाटली हातात पकडतो तेव्हा ती हातातून पडत नाही. आपल्या हातांवरील रेषांमुळे त्या बाटलीला आपण ही अधिक घट्ट पकडू शकतो. लोकांना कमी पैशांमध्ये मिनिरल वॉटर उपलब्ध करण्यासाठी कंपन्या मऊ प्लास्टिकचा वापर करतात. जेणेकरुन त्याच्या उत्पादनासाठी कमी खर्च येईल. हे सुद्धा एक कारण आहे की रेषा त्यावर असतात.(Lines on Plastic Bottle)
हे देखील वाचा- जगाला धोक्याची घंटा ; चीनमध्ये पुन्हा वाढतोय कोरोना
प्लास्टिकच्या बाटलीतून पाणी का पिऊ नये?
काही कंपन्या असा दावा करतात की, ते बीपीए फ्री प्लास्टिकचा वापर करतात. तरीही प्रत्येक प्रकारची प्लास्टिकची बाटली तयार करण्यासाठी काही केमिकलचा वापर केलाच जातो. जो व्यक्तीच्या शरिरासाठी धोकादायक आहे. जेव्हा या बाटलीतील पाणि आणि हिटच्या संपर्कात येते किंवा काही दिवसांपर्यंत पाणी त्यामध्ये साठवले जाते तेव्हा हानिकारक केमिकल्स पाण्यात मिसळले जातात. अशातच आपल्या शरिरातील Endocrine Disrupters ला प्रभावित करतात. ज्याचा प्रभाव आपल्या हार्मोनवर पडतो.