सध्या अशी चर्चा जोरदार सुरु झाली आहे की, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन मॉस्कोसह प्रमुख शहरांमध्ये मार्शल लॉ लावण्याच्या तयारीत आहेत. तर पुतिन जवळजवळ २० लाख लोकांची सैन्यात भरती करणार आहेत. जेणेकरुन युक्रेन युद्धात रशियाची कमकुवत होणारी शक्ती पुन्हा एका स्थापित केली जाऊ शकते. यामध्ये ३ लाख महिलांची भरती होणार आहे. पण पुतिन यांचे प्रवक्ते दिमित्री पेसकोव यांनी शुक्रवारी अशी कोणतेही घोषणा करण्यास नकार दिला आहे. मात्र पुतिन यांनी सैन्यात भरती करण्याच्या पहिल्या टप्प्याला संपवण्यासाठी महत्वाच्या डिक्रीवर हस्ताक्षर केलेले नाहीत. (Martial Law)
डेली मेलनुसार, प्रवक्ता दिमित्री पेसकोव यांनी असे म्हटले आहे की, पुतिन त्या संबोधनात ज्यामध्ये मोठ्या घोषणा करतील ते सत्य नाही आहे. दुसऱ्या बाजूला युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेंस्की यांनी मॉस्कोला पुन्हा इशारा दिला आहे. त्यांनी असे म्हटले आहे की, युद्धाच्या स्थायी समाधानासाठी रशियाकडे असलेल्या परिसरातील सैन्यांना माघारी बोलवावे. नुकत्याच महिन्यात पुतिन यांची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर आली होती. तेव्हापासून अशी अफवा सुद्धा आहे की, राष्ट्राध्यश्र पद सोडून आपली सत्ता एखाद्याला सोपवणार आहेत.

जनरल एसवीआर टेलीग्रा चॅनलच्या माध्यमातून तथिर रुपात असे सांगितले जात आहे की, जवळजवळ २० लाख लोकांची भरती केली जाणार आहे. यामध्ये ३ लाख महिला असतील. मॉस्कोमधील प्रतिष्ठीत इंस्टीट्युट ऑफ इंटरनॅशनल रिलेशंन्सचे माजी प्रोफेसर, पुतिन वॉचर वेलेरी सोलोवी यांनी असे म्हटले की, या व्यतिरिक्त मार्शल लॉ च्या सुरुवातीला एकत्रित करण्याची योजना तयार करण्यात आली आहे. हे मार्शल लॉ ला पूर्णपणे रशिया किंवा रशियातील राजधानी- मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्ग यांच्यासह क्षेत्रातील एक महत्वपूर्ण भागापर्यंत विस्तारित करणे आहे.
पुतिन यांची जागा कोण घेणार?
अशी अफवा आहे की, सर्गेई किरियेंको यांना पुतिन यांची जागा मिळू शकते. सध्या सर्गेई किरियेंके रशियाचे राष्ट्राध्यक्षांचे अधिनायकवादी डेप्युटी चीफ ऑफ स्टाफ आहेत. ते माजी पीएम सुद्धा आहेत. या व्यतिरिक्त कृषी मंत्री दिमित्री पेत्रुशेव यांचे नाव सुद्धा समोर आले आहे. ते पुतिनचे कट्टर सुरक्षा प्रमुख निकोलो पेत्रुशेव यांचा मुलगा आहे.
हे देखील वाचा- उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग यांची बातच वेगळी….
मार्शल लॉ म्हणजे काय?
मार्शल लॉ (Martial Law) ज्या देशात किंवा क्षेत्रात लावला जातो तेथील शान व्यवस्था सामान्य जनता किंवा सरकार व्यतिरिक्त सैन्याच्या हातात जाते. याच कारणास्तव याला सैनिक कायदा किंवा आर्मी अॅक्ट असे ही म्हटले जाते. हा कायदा लागू झाल्यास देशात किंवा क्षेत्रातून नागरिक कायदा हटवला जातो आणि सैन्याचे नियंत्रण सुरु होते. या दरमायान सैन्याकडे काही अधिकार असतात. सैन्यात कोणतेही पाऊल उचलण्यासाठी नागरिक, सरकार किंवा मंत्र्यांची परवानगी घेण्याची गरज भासत नाही. लोकांचे नागरी अधिकार हिरावून घेतले जातात.
जो कोणीही मॉर्शल लॉ च्या विरोधात बोलतो किंवा त्याच्या विरोधात भडकवतो त्याला तातडीने अटक केली जाते. सैन्य एखाद्याला किती ही वेळ आपल्याकडे ठेवू शकते. मार्शल लॉ दरम्यान सैन्य कोणताही न्यायिक निर्णय घेते.