दिग्गज ब्रँन्ड बिस्लेरीला लवकरच टाटा ग्रुप कडून खरेदी केली जाणार आहे. टाटाची कंपनी Tata Consumer Products Limited जवळजवळ ७०००कोटी रुपयांमध्ये बिस्लेरी ब्रांन्डला आपलेसे करण्याच्या तयारीत आहे. तर बिस्लेरीचे चेयरमॅन रमेश चौहान यांनी आपली कंपनी विक्री करण्याच्या निर्णयानंतर अत्यंत भावुक झाले होत. त्यांचे वय ८२ वर्ष आहे. त्याचसोबत त्यांची प्रकृीत ठीक नसते. त्याच कारणास्तव त्यांनी आपली कंपनी पुढे नेण्यासाठी कोणीही उत्ताराधिकारी नसल्याने बिस्लेरीचा विस्तार करु शकत नाहीत. त्यांची मुलगी बेटी जयंती चौहान (Jayanti Chauhan) यांना या व्यवसायात अधिक रस ही नाही.
मीडिया रिपोर्ट्नुसार, रमेश चौहान यांचे असे म्हणणे आहे की त्यांच्याकडे कंपनीचे त्या पद्धतीने सांभाळणारा कोणीही नाही आहे. ज्या पद्धतीने त्यांनी सांभाळले आहे. त्यांची मुलगी जयंती या व्यवसायात खास आवड नाही. त्याच कारणास्तव त्यांना आपल्या व्यवसायाची विक्री करावी लागत आहे.
बिस्लेरीचे मालक रमेश चौहान यांची एकुलती एक मुलगी जयंती चौहान आता ३७ वर्षीय आहे. जयंती चौहान यांच्या लिंक्डइन प्रोफाइलवर असलेल्या माहितीनुसार त्या बिस्लेरी इंटरनॅशनलच्या वाइर चेयरपर्सन आहेत. त्यांनी वयाच्या २४ व्या वर्षातच वडिलांच्या या व्यवसायाची जबाबदारी सांभाळली होती. त्यांनी बिस्लेरीच्या दिल्ली ऑफिस आणि नंतर २०११ मध्ये मुंबईतील ऑफिसची कमान सांभाळली. त्यांच्या नेतृत्वातच कंपनीचे दिल्लीत कार्यालयाची सुरुवात झाली.

जयंती चौहान (Jayanti Chauhan) यांनी बिस्लेरीचा आंतरराष्ट्रीय ब्रांन्ड बनवण्यासाठी फार महत्वाची भुमिका बजावली आहे. त्या अॅड आणि मार्केटिंगची कमान सांभाळतात. जयंती बिस्लेरी ब्रँन्डला प्रसिद्ध करण्यासाठी फार मेहनत करत आहेत. त्या कंपनीच्या अॅड कॅम्पेन व्यतिरिक्त प्रोडक्टच्या डेव्हलपमेंटवर अधिक लक्ष देतात. बिस्लेरी व्यतिरिक्त जयंती बिस्लेरी मिनिरल वॉटर, वेदिका नॅच्युरल मिनिरल वॉटर, फिजी फ्रूट ड्रिंक आणि बिस्लेरी हँन्ड प्युरीफायर प्रोडक्ट्सच्या ऑपरेशनची जबाबदारी सांभाळतात. त्या मार्केटिंग व्यतिरिक्त ब्रँन्ड मॅनेजमेंटसह डिजिटल मार्केटिंगमध्ये सुद्धा पाहतात. कंपनीच्या जाहिराती आणि कम्युनिकेशन मध्ये सुद्धा त्या अधिक सक्रिय आहेत.
हे देखील वाचा- अवघ्या २९५ रुपयांपासून सुरु झाली ब्रिटानिया, १३० वर्षात अशी बनली १२ हजार कोटींची कंपनी
जयंती यांचे लहानपण दिल्ली आणि मुंबई त्यानंतर न्यूयॉर्क मध्ये गेले आहे. त्यांनी सुरुवातीचे शिक्षण दिल्लीतून घेतले, त्यानंतर फॅशन डिझाइनिंगच्या कोर्ससाठी दिल्लीला निघून गेल्या. त्यांनी लंडन कॉलेज ऑफ फॅशन येथून फॅशन डिझाइनिंगमध्ये ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतले आहे. या व्यतिरिक्त Institue of Maeangoni Milano येथून फॅशन स्टाइलिंगचा कोर्स केला आहे.
जयंती चौहान यांनी लंडन युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ ओरिएंटल अॅन्ड अफ्रिकन स्टडीतून अरबीची डिग्री मिळवली आहे. जयंती सध्या लंडनमध्ये राहतात. देशभरात कंपनीच्या १२२ ऑपरेशनल प्लांट आहेत. ४५०० हून अधिक डिस्ट्रीब्युटर्स आहेत. तर बिस्लेरी विक्री करण्यामागील कारण असे की, जयंती चौहान यांनी कंपनीची जबाबदारी घेण्यास नकार दिला आहे.