जगभरातील टेक कंपन्यांमध्ये मंदीचा परिणाम स्पष्टपणे दिसून येत आहे. याच्या परिणामांपासून बचाव करण्यासाठी ट्विटर, एचपी, गुगल आणि फेसबुकसह अॅमेझॉन सारख्या बड्या कंपन्यांना कर्मचाऱ्यांना कपात करण्यास सुरुवात केली आहे. अशातच असे समोर आले की, अमेरिकन डिलिव्हरी सर्विस कंपनी अॅमेझॉन (Amazon) भारतातील आपली फूड डिलिव्हरी सेवा बंद करणार आहे. रिपोर्ट्नुसार, कंपनीने पार्टनर रेस्टॉरंट्सला ईमेलच्या माध्यमातून या बद्दल माहिती दिली आहे. म्हणजेच आता युजर्सला अॅमेझॉन फूडच्या माध्यमातून फूड ऑर्डर करता येणार नाही. यापूर्वी कंपनीने एज्युकेशन प्लॅटफॉर्म सुद्धा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
अॅमेझॉनने भारतात फूड डिलिव्हरी सर्विस मे २०२० पासून सुरु केली होती. मनीकंट्रोलच्या नुसार, ई-कॉमर्स कंपनी २९ डिसेंबर पासून ही सेवा बंद करणार आहे. अॅमेझॉनने एज्युकेशन टेक फर्म ही बंद करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर फूड डिलिव्हरी सर्विस बंद करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. त्याचसोबत कंपनीने जगभरातील तैनात हजारो कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
अॅमेझॉन सपोर्ट देत राहणार
कंपनीने रेस्टॉरंट्सला असे म्हटले की, ते सर्व पेमेंट आणि कॉट्रॅक्टच्या नियमांचे पालन करण्यास प्रतिबद्ध आहे. रेस्टॉरंट्सकडे ३१ जानेवारी २०२३ पर्यंत अॅमेझॉनचे सर्व टूल्स आणि रिपोर्ट्स पोहचणार आहेत. या व्यतिरिक्त कंपनी ३१ मार्च पर्यंत कंपलांयस संदर्भातील प्रकरणांमध्ये सपोर्ट देणे सुरु ठेवणार आहे. अॅमेझॉनने वार्षित ऑपरेटिंग प्लानिंग रिव्हू प्रक्रियाअंतर्गत बंगळुरुतून सुरु असलेल्या पायलट फूड डिलिव्हरी बिझनेसला बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
हे देखील वाचा- ६ हजार कर्मचाऱ्यांना ‘ही’ टेक कंपनी दाखवणार बाहेरचा रस्ता, पण का?
हळू-हळू बंद करणार बिझनेस
अॅमेझॉनचे (Amazon) असे म्हणणे आहे की, या निर्णयाला ते हलक्यात घेत नाही आहेत. त्यासाठी कंपनी या सर्व गोष्टी लगेच बंद करण्याऐवजी टप्प्याटप्प्याने बंद करत आहेत. कंपनीनुसार सध्याचे कस्टमर्स आणि पार्टनर्स यांची काळजी घेत हा बदल हळूहळू केला जात आहे. या व्यतिरिक्त कंपनीचे असे म्हणणे आहे की, या निर्णयामुळे प्रभावित होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सपोर्ट दिला जात आहे.
अॅमेझॉन गुंतवणूक करणे सुरु ठेवणार
कंपनीचे असे म्हणणे आहे की, भारतीय बाजारात ग्रॉसरी, स्मार्टफोन, इलेक्ट्रॉनिक्स आणि ब्युटी सारख्या प्रोडक्ट्सच्या डिलिव्हरी बिझनेसमध्ये गुंतवणूक करणे सुरु ठेवणार आहे. या व्यतिरिक्त अॅमेझॉनचे काम ही सुरु राहिल.