जगातील असे एक विचित्र गाव जेथे लोक अचानक झोपतात. हैराण करणारी गोष्ट अशी की, या गावातील लोकांना माहिती नसते आपल्याला झोप कधी येईल. त्यापैक्षा अधिक हैराण करणारी गोष्ट असी ते एक-दोन तासांसाठी नव्हे तर काही दिवसांपर्यंत झोपून राहतात. काहीजण गाडी चालवताना सुद्धा झोपतात तर काहीजण रस्त्याच्या कडेला पडून झोपी जातात. हे गाव कजाकिस्तान येथे आहे जे काही वर्षांपूर्वी फार चर्चेत आले होते. (Kazakhstan sleeping village)
लॅडबाइबल बेवसाइटच्या रिपोर्टनुसार, कजाकिस्तानची राजधानी एस्टानापासून जवळजवळ ३७० किमी दूर एक गाव आहे. त्याचे नाव कलाची असे आहे. या गावतील लोकांच्या झोपण्याच्या सवयीमुळे ते अधिक चर्चेत असतात. म्हणून त्याला स्लीपी हॉलो विलेज असे ही म्हटले जाते. लोक कधीही कुठेही अगदी सहजपणे झोपू शकतात. या गावातील फक्त माणसंच नव्हे तर जनावरांना सुद्धा अशाच पद्धतीने झोप यायची. दरम्यान, २०१३ ते २०१६ दरम्यान १६० हून अधिक लोकांना झोपण्याचा विचित्र आजार झाला होता.
काही दिवसांपर्यत झोपायची माणसं, उठल्यानंतर मात्र….
काही लोकतर ६ दिवसांपर्यंत झोपायची आणि त्यांची झोप झाल्यानंतर त्यांना आठवायचेच नाही नक्की आपल्यासोबत काय झाले होते. रिपोर्ट्सनुसार, २०१० मध्ये एक महिला भर बाजारातच झोपी गेली होती. तेव्हा डॉक्टरांनी सांगितले होते की, तिला हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर अन्य ५ महिलांसोबत सुद्धा असेच झाले. पाहतापाहता १५० ते १८० लोकांना अशा प्रकारे झोप येऊ लागलीय काही महिलांनी असा दावा केला होता की, झोपल्यानंतर उठल्यावर त्यांना काहीच आठवत नाही. याव्यतिरिक्त पुरुषांना झोपून उठल्यानंतर अधिक शारिरीक संबंध ठेवण्याची इच्छा व्हायची.
युरेनियमच्या कारणास्तव हवेत निर्माण व्हायचा गॅस
रिपोर्टनुसार नागरिकांना असे वाटू लागले होते की, गावात भूत आहे, त्यामुळेच असे होत आहे. पण २०१५ मध्ये कजाकिस्तान सरकारने दावा केला की, त्यांना या आजाराचे कारण शोधायचे आहे. त्यांनी असा दावा केला होता की, गावात सोवियत काळातील युरेनियमचा सुरंग आहे ज्यामध्ये पाणी भरले गेले होते आणि त्याचे रिअॅक्शनमुळे कार्बन मोनोऑक्साइड गॅस हवेत नॉर्मल ते १० पट अधिक झाली होती. या गॅसच्या कारणास्तव लोकांना झोप यायची. त्यांचे असे म्हणणे होते की, रेडन सारख्या अन्य दुर्लक्ष गॅसमुळे लोकांना झोप यायची. मात्र Nazarbayev युनिव्हर्सिटीच्या एका प्रोफेसरने वर्ष २०२० मध्ये दावा केला की, कार्बन मोनोऑक्साइड एकमेव कारण नाही आहे. (Kazakhstan sleeping village)
हे देखील वाचा- लॅबमध्ये तयार करण्यात आले मानवी डोळे, जाणून घ्या कशा पद्धतीने करणार काम
वैज्ञानिकांनी सांगितले होते आजाराचे कारण
बायरन क्रेप यांनी असे म्हटले होते की, गावातील ८०० लोकसंख्या एका व्यक्तीद्वारे जमीनीतून काढण्यात आलेले पाणी प्यायचे. अशातच पाणी युरेनियमच्या कारणास्तव दुषित व्हायचे आणि त्याचा परिणाम त्यांच्यावर झाला असावा. मात्र दीर्घकाळ झोपण्यामागील घटनांचा खुलासा झाला नाही.