कसा असेल तुमचा हा आठवडा, काय सांगते तुमची रास जाणून घ्या… (Weekly Horoscope – 28 November to 4 December)
मेष – आठवड्याच्या सुरुवातीला आपल्या राशीच्या कर्मस्थानातून शनिवरून चंद्राचे भ्रमण होत आहे. आपल्या उतावळ्या आणि अस्थिर स्वभावाला आवर घालून शांतपणाने काम करावे लागेल. महत्त्वाकांक्षा आणि मेहनतीच्या जोरावर आपले ध्येय साध्य कराल. कामानिमित्त प्रवास घडतील. आपल्या कार्याकुशलतेमुळे वरिष्ठांकडून प्रशंसा केली जाईल. मित्र परिवाराचे सहकार्य लाभेल. आपली इच्छापूर्ती होईल. उत्तरार्धात धार्मिक स्थळांना भेटी द्याल. नवनवीन उपक्रम यशस्वीपणे राबवता येतील. आत्मविश्वास वाढेल.सामाजिक, राजकीय क्षेत्रात सक्रिय सहभाग घ्याल. सामाजिक पतप्रतिष्ठा उंचावेल.
शुभ दिनांक – 30, 1.
वृषभ – आपल्या राशीत आलेला मंगळ आपली महत्त्वाकांक्षा वाढवणारा आहे. भाग्यस्थानातील भाग्येश शनिवरून होणारे चंद्राचे भ्रमण आपल्या अथक परिश्रमांना योग्य न्याय देणारे राहील. धाडसी निर्णय घेतले जातील. जुन्या मैत्रीला उजाळा मिळेल. मित्र परिवाराच्या सहकार्यामुळे काही निर्णय घेणे सोपे जाईल. तरुणांना नोकरीच्या संधी चालून येतील. व्यवसाय उद्योगातून नवीन कार्यारंभ केले जातील. संत सज्जनांचा सहवास लाभेल. धार्मिक शुभ समारंभात सहभागी व्हाल. कामानिमित्त परदेश प्रवास घडतील. आपल्याकडून संशोधनात्मक कार्य केले जाईल.
शुभ दिनांक – 28, 29
मिथुन – आठवड्याच्या सुरुवातीला आपल्या राशीच्या अष्टमस्थानातील अष्टमेश शनिवरून चंद्राचे भ्रमण होत आहे. प्रकृतीच्या जुन्या तक्रारी डोके वर काढतील. वातविकार, शीत विकार, सांधेदुखी यांचा त्रास होऊ शकतो. कुटुंबातील वयस्कर व्यक्तीच्या प्रकृतीची काळजी वाटेल. हा आठवडा आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढवणारा राहील. अध्यात्मिक प्रगती होईल. कर्म स्थानातील गुरु अनेक चांगल्या संधी उपलब्ध करून देणारा राहील. नोकरीत बदल करू इच्छिणाऱ्या तरुणांना सुसंधी लाभतील. विविध व्यावसायिक उपक्रम राबवले जातील. सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घ्याल. मित्र परिवाराचे सहकार्य लाभेल.
शुभ दिनांक – 2, 3
कर्क – राशीच्या सप्तमास्थानातून सप्तमेश शनिवरून चंद्राचे भ्रमण होत आहे. जोडीदाराचे सहकार्य लाभेल. भागीदारी व्यवसायातून फायदा होईल. अनपेक्षित धनप्राप्ती होईल. प्रवासात आपले खिसा पाकीट सांभाळावे. अनोळखी माणसांवर विश्वास ठेवू नका. संततीच्या उत्कर्षाची वार्ता कानी येईल. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षातून यश लाभेल. धाडसी निर्णय घेतले जातील. लेखकांच्या दर्जेदार लिखाणास प्रसिद्धी मिळेल. कवी, कलाकारांना चाहत्यांकडून चांगली दाद मिळेल. आपला उत्साह वाढवणाऱ्या घटना घडतील. प्रसिद्धी लाभेल.
शुभ दिनांक – 4
सिंह – आपल्या राशीच्या षष्ठस्थानातील षष्ठेश शनिवरून चंद्राचे भ्रमण होत आहे. आपण कडक शिस्तीचे भोक्ते आहात. कामातील प्रामाणिकपणा आणि कामाला योग्य न्याय देण्याच्या वृत्तीमुळे वरिष्ठांकडून आपली प्रशंसा केली जाईल. जुनी येणी वसूल होतील. प्रकृतीच्या कोणत्याही तक्रारीकडे दुर्लक्ष करू नका. जोडीदाराचे चांगले सहकार्य लाभेल. सासुरवाडीकडून लाभ होईल. अध्यात्मिक क्षेत्रात प्रगती कराल. आठवड्याच्या उत्तरार्धात कामानिमित्त दूरचे प्रवास घडतील. नवीन ओळखीतून फायदा होईल. भविष्यकाळाच्या दृष्टीने आर्थिक गुंतवणूक केली जाईल.
शुभ दिनांक – 30, 1
कन्या – आठवड्याच्या सुरुवातीला आपल्या राशीच्या पंचमस्थानातून पंचमेश शनिवरून चंद्राचे भ्रमण होत आहे. संशोधनपर अभ्यासक्रमातून यश लाभेल. संततीच्या उत्कर्षाची वार्ता कानी येईल. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षातून यश लाभेल. आपल्या कर्तृत्वाला चांगली झळाळी मिळेल. नवीन क्षेत्रात काम मिळवू शकाल. आपल्या इच्छेनुसार सर्व गोष्टींची प्राप्ती होईल. सप्तमस्थानात गुरु चंद्राचा होणारा गजकेसरी योग आपल्या उत्कर्षास कारणीभूत ठरेल. गुरु म्हणजे संस्कार आणि सुबत्ता यांच्या उपलब्धतेचा ग्रह असल्याकारणाने आपला वैयक्तिक उत्कर्ष घडून येईल. जोडीदाराचे चांगले सहकार्य लाभेल. विवाहेच्छुक तरुणांचे विवाह ठरतील. उत्तरार्धात मोठे लाभ होतील.
शुभ दिनांक – 3, 4
तूळ – आपल्या राशीच्या सुखस्थानातून चंद्राचे भ्रमण होत आहे. कुटुंबातील व्यक्तींचे सहकार्य लाभणार आहे. आपल्या कामात कुटुंबीयांची साथ लाभेल. गृह उद्योगातून नवीन कार्यारंभ केले जातील. मातृसौख्य लाभेल. नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराल. धार्मिक स्थळांना भेटी देण्याचे योग येतील. षष्ठस्थानातील गुरुमुळे आपल्याला अनेक संधी लाभणार आहेत. अथक परिश्रमाने मिळालेल्या संधीचे सोने करता येईल.सामाजिक, राजकीय क्षेत्रातून लोकहितार्थ कामे केली जातील. महत्त्वाचे निर्णय घेतले जातील.
शुभ दिनांक – 30, 1
वृश्चिक – आपल्या राशीतून रवी, बुध, शुक्र यांचे भ्रमण तर पराक्रमस्थानातून शनी-चंद्राचे भ्रमण होत आहे. त्यामुळे या आठवड्यातील ग्रहमान आपल्या वैयक्तिक उत्कर्षास अतिशय अनुकूल आहे. आपल्या संभाषण चातुर्याच्या जोरावर मोठी मजल माराल. गोड बोलून आणि अतिशय संयम राखून आपले काम पूर्णत्वास नेण्याकडे कल राहील. सामाजिक क्षेत्रात मोठी कामगिरी कराल. अनैसर्गिक गोष्टींकडे दुर्लक्षकरून आपल्या जबाबदाऱ्या पार पाडण्याकडे लक्ष द्यावे. संततीच्या उत्कर्षाची वार्ता कानी येईल. घरात धार्मिक शुभ समारंभाचे आयोजन केले जाईल. घरातील वातावरण अतिशय आनंदी, उत्साही राहील. उत्तरार्धात विरोधकांच्या कारवायांवर मोठ्या शिताफिने मात कराल.
शुभ दिनांक – 28, 29
धनु – आपल्या राशीच्या व्ययस्थानातून रवी, शुक्र, बुध यांचे भ्रमण होत आहे. उंची वस्त्रालंकार तसेच मौल्यवान वस्तूंची खरेदी केली जाईल. दैनंदिन जीवनातून विरंगुळा मिळावा म्हणून सहलीत सहभागी व्हाल. धनस्थानातून धनेश शनीवरून चंद्राच्या होणाऱ्या भ्रमणामुळे जुनी येणी वसूल होतील. कुटुंबात वडीलधाऱ्या व्यक्तींच्या मतांचा आदर करावा लागेल. आपल्या बोलण्याने इतरांची मने दुखवू नका उलट गोड बोलून त्यांची मने जिंकून घ्यावीत. भावंडांचे सहकार्य लाभेल. नवीन वाहन वास्तूचे योग येतील. कुटुंबात शुभ कार्य ठरेल. संततीस त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून द्या. सामाजिक कार्याची रुची वाढेल.
शुभ दिनांक – 2, 3
मकर – राशीस्वामी शनिवरून चंद्राचे भ्रमण आपल्याच राशीतून होत आहे. अध्यात्माची गोडी वाढेल.आपल्या मेहनतीने, चिकाटीने अवघड कामे मार्गी लावण्यात यश येईल. भविष्यकाळातील फायद्यासाठी काही निर्णय कठोर असले तरी अतिशय विचारपूर्वक घ्यावे लागणार आहेत.आपल्या कर्तृत्वाला चांगली झळाळी येईल. काही प्रलंबित कामे मार्गी लागतील.सुयोग्य निर्णय घेतले जातील. उधारी उसनवारी वसूल होईल. व्यवसाय उद्योगाच्या दृष्टीने मोठी गुंतवणूक कराल. नवीन संधी चालून येतील. धार्मिक स्थळांना भेटी द्याल. हातून दानधर्म होईल. आठवड्याच्या उत्तरार्धात राहत्या जागेत बदल घडू शकतात.
शुभ दिनांक – 28, 29.
कुंभ – आठवड्याच्या सुरुवातीला व्ययस्थानातून होणारे चंद्राचे भ्रमण आपणास कामानिमित्त प्रवास घडवणारे राहील. आपला मूळ स्वभाव अबोल असला तरी काही कामे मोकळेपणाने बोलल्याशिवाय होत नाहीत, हे लक्षात ठेवावे. आपल्या जबाबदाऱ्या पार पाडताना प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नका. पाय दुखी अथवा संधिवाताचा त्रास उद्भवू शकतो. कवी, गायक, वादक यांच्यासाठी हा आठवडा म्हणजे आनंदाची पर्वणीच ठरणार आहे. अनेक सुसंधींचा लाभ घेता येईल. आर्थिकदृष्ट्या भरभराट करणारे ग्रहमान आपणास या आठवड्यात लाभले आहे. परदेशस्थ भावंडांशी सल्लामसलत करून एखाद्या घरगुती समस्येचे निराकरण करता येईल. पतप्रतिष्ठा उंचावेल.
शुभ दिनांक – 30, 1.
मीन – राशीच्या लाभस्थानातून शनीवरून होणाऱ्याा चंद्रभ्रमणामुळे जुन्या मैत्रीला उजाळा मिळेल. मित्र परिवाराबरोबर वेळ आनंदात घालवाल. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीची पूर्तता झाल्यामुळे हाती पैसा येईल. आपली इच्छापूर्ती होणाऱ्या घटना घडतील. सरकारी क्षेत्रात रेंगाळलेली कामे गती घेतील. व्ययस्थानातील नेपच्यून आणि चंद्र तर आपल्या राशीतील गुरूमुळे धार्मिक स्थळांना भेट दिली जाईल. अध्यात्मिक प्रगती होईल. मिळालेल्या संधीचे सोने कराल. कुटुंबातील वातावरण आनंदी, उत्साही ठेवण्यासाठी सतत प्रयत्नशील राहाल. आपल्या स्वभाव अनुकरणप्रिय असल्याने समोर आलेल्या चांगल्या गोष्टी आत्मसात केल्या जातील.
शुभ दिनांक – 2, 3
- श्री बालाजी ज्योतिषालय आणि वास्तू कन्सल्टन्सी, पुणे
9011149780 / 8668293104
टीप : या लेखातील माहिती आणि मते ही सर्वस्वी लेखकाची आहेत. क फॅक्टस टीम याची पुष्टी करत नाही. तसेच लेखकाच्या मतांशी आम्ही सहमत असू असेही नाही.