सध्या आपण डिजिटल पद्धतीने व्यवहार करत असल्याने बऱ्याच वेळा आपल्याला बँकेचे डिटेल्स किंवा कार्ड डिटेल्स काही अधिकृत ठिकाणी द्यावे लागतात. मात्र ऑनलाईन पद्धतीने व्यवहार करताना काळजी घेणे सुद्धा फार महत्वाचे असते. अशातच गेल्या काही काळापासून लोकांची ऑनलाईन पद्धतीने फसवणूक होत असल्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. अशातच हॅकिंगच्या कारणास्तव नेहमीच असा सल्ला दिला जातो की, कोणत्याही बँक, सोशल मीडिया अकाउंटचा पासवर्ड नेहमीच कठीण ठेवावा. मात्र रिपोर्ट असा सांगतो की, भारतीय युजर्स अगदी सहज हॅक होऊ शकतात अशा पासवर्डचा वापर करतात. ज्यामध्ये ‘password’, ‘password@123’, ‘password123′, ‘password@1’ आणि ‘password1’ चा समावेश आहे. नॉर्ड सिक्युरिटीचे पासवर्ड मॅनेजर आर्म NordPass द्वारे २०२२ मध्ये सर्वाधिक सामान्य पासवर्डवरील एक रिपोर्ट शेअर करण्यात आला आहे. त्यावरुन कळते की, ग्लोबली युजर्सद्वारे २०२२ मध्ये ‘password’ चा वापर ४.९ मिलियन वेळा आणि भारतात ३.४ मिलियन वेळा केला गेला. (Hacking Password)
भारतातील सर्वाधिक दुसरा आवडीचा पासवर्ड १२३४५६ जो १६६,७५७ वेळा वापर करण्यात आला होता. तर चौथा अधिक वेळा वापरला जाणारा BigBasket चा ७५,०८१ वेळा वापर करण्यात आला होता. रिपोर्ट्सनुसार, भारतात सामान्यपणे वापर केल्या जाणाऱ्या अन्य पासवर्डमध्ये qwerty, anmol123 आणि googledummy चा समावेश आहे. काही युजर्स आपला पासवर्ड हा देशाच्या नावाने ठेवणे पसंद करतात. जसे India123 किंवा India@123.

नॉर्डपासचा रिपोर्ट सांगतो की, २००२ मध्ये वापर केला जाणारा २०० सर्वाधिक सामान्य पासवर्डपैकी ७३ टक्के हे गेल्या वर्षासारखेच आहेत. त्यांना असे ही कळले की, लिस्टच्या ८३ टक्के पासवर्ड हे एक सेकंदात हॅक केले जाऊ शकतात. भारतात चौथा सर्वाधिक वापर केल्या जाणाऱ्या पासवर्डच्या रुपात BigBasket चा वापर कोविड१९ नंतर ऑनलाईन ग्रोसरी ऑर्डर करण्यासाठी युजर्सच्या बदलत्या सवयींमुळे असल्याचे मानले जात आहे.
हे देखील वाचा- iPhone युजर्स व्हा सावध! तुमच्या App स्टोर अॅक्टिव्हिटिला Apple करु शकते ट्रॅक
iloveyou सुद्धा अत्यंत लोकप्रिय
या व्यतिरिक्त रिपोर्टमध्ये असे कळते की, युजर्स पासवर्डच्या माध्यमातून प्रेम किंवा चिड व्यक्त करणे पसंद करतात. उदाहरणासाठी iloveyou किंवा अन्य भाषांमध्ये त्याच्या ट्रांन्सलेशनचा वापर भारतासह अन्य काही देशात वापर केला जातो. जेथे iloveyou याला ८१ वे स्थान दिले गेले आहे. (Hacking Password)
खरंतर खासगी आणि मोठ्या कंपन्यात वाढणारे सायबर हल्ले पाहता सहज क्रॅक करता येणारे पासवर्डचा वापर करणे धोकादायक ठरु शकते. त्यामुळे कठीण पासवर्ड ठेवावा पण त्यामध्ये स्पेशल कॅरेक्टरचा सुद्धा समावेश असला पाहिजे.