Home » युरोपचं वातावरण खालावणार?

युरोपचं वातावरण खालावणार?

by Team Gajawaja
0 comment
World Meteorological Organization
Share

भारतात मार्च, एप्रिल, मे हे महिने तापदायक ठरतात.  एप्रिल, मे महिन्यात तर सूर्य उष्णतेचा नवा रेकॉर्ड करण्यासाठी तयारी करतोय की काय असं तपमान असतं…मग यापासून सुटका करण्यासाठी अनेकजण एखाद्या थंड जागी फिरायला जाण्याचा पर्याय निवडतात.  ज्यांना शक्य असेल ती मंडळी थेट युरोप गाठतात.  कारण युरोप म्हणजे थंड तापमान, हे सूत्र झालेलं.  गरमीच्या वातावरणापासून थोडा थंडावा देणारा हाच युरोप काही वर्षात सर्वाधिक उष्ण प्रदेश म्हणून घोषित होईल अशी शक्यता आहे.  हवामानासंदर्भात संशोधन करणा-या काही तज्ञांनी हा इशारा दिला आहे.  गेल्या काही वर्षात युरोपातील वातावरणात कमालीचे बदल होत आहेत.  त्याचा परिणाम म्हणजे, युरोपातील अनेक देशात तापमानानं उच्चांक वाढला आहे.  पाऊसानंही विक्रम केला आणि शहरं पाण्याखाली गेली.  हा बदलत्या हवामानानं दिलेला इशारा होता, असं तज्ञांचं म्हणणं आहे.  याबाबत गंभीर दखल घेतली नाही तर काही वर्षातच युरोपातील थंडावा कायमचा जाण्याची शक्यता असून वाळवंटी प्रदेशासारखी उष्णता युरोपला सहन करावी लागणार आहे.  (World Meteorological Organization)

गेल्या आठ वर्षात युरोपातील बदलत्या हवामानाचा संयुक्त राष्ट्र संघाची  एजन्सी WMO तर्फे अभ्यास करण्यात आला आहे.  त्यात युरोपातील बदलत्या वातावरणाबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे.  WMO(World Meteorological Organization) ने आपल्या अहवालात येत्या काही वर्षांत मोठा सर्वाधिक उष्ण वातावरण सहन करावं लागू शकतं असा इशारा दिला आहे.  जागतिक हवामान संघटनेनं येत्या वर्षात बदलत्या हवामानामुळे तीव्र उष्णता, दुष्काळ आणि विनाशकारी पूर यांची तीव्रता वाढेल असे स्पष्ट केले आहे.  या अहवालानुसार 1993 पासून समुद्र पातळी वाढण्याचे प्रमाण दुप्पट झाले आहे. 2020 पासून सुमारे 10 मिमी (मिलीमीटर) च्या वाढीसह, या वर्षी नवीन विक्रमी पातळी गाठली आहे.  30 वर्षांपूर्वी उपग्रहाद्वारे पाण्याची पातळी मोजण्यात आली होती.  त्यानुसार गेल्या अडीच वर्षांत समुद्राच्या पातळीत 10 टक्के वाढ झाली आहे.  युरोपियन आल्प्समधील हिमनद्यांवर गंभीर परिणाम झाल्याचीही अहवालात नोंद आहे. पर्यावरण तज्ञ पेटेरी तालास यांनी या बदलासाठी वाढत्या शहरीकरणाला दोष दिला आहे.  त्यांच्या मते, उष्णता जितकी जास्त असेल तितका वाईट परिणाम होईल. अनेक हिमनद्यां पुढची काही वर्षे वितळत राहणार आहेत.  त्यामुळे समुद्राच्या पातळीत वाढ होईल.  पुढच्या शंभर वर्षात आणि लाखो सखल राज्ये आणि किनारपट्टीवरील नागरिकांना यामुळे धोका निर्माण होणार आहे.   

जागतिक हवामान संघटनेच्या (World Meteorological Organization)अहवालानुसार गेल्या 50 वर्षांमध्ये, युरोपीय प्रदेशात तीव्र तापमानामुळे 1,48,000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.  युरोपमध्ये यावर्षी उष्णतेमुळे 15,000 नागरिकांचा मृत्यू झाला   त्यात स्पेन, पोर्तुगालमधील 4,000 नागरिकांचा समावेश आहे.  ब्रिटनमध्ये उन्हाळ्याच्या तीन महिन्यांत ब्रिटनमध्ये 3,200 आणि जर्मनीमध्ये सुमारे 4,500 मृत्यू तीव्र उष्णतेमुळे झाल्याची नोंद आहे.  पुढच्या काही वर्षात उष्णता तीव्र झाल्यास ही मृत्यूची नोंदही वाढू शकते, अशी भीती आता व्यक्त करण्यात येत आहे.   युरोपातील नागरिक आता  जागतिक सरासरी तापमानात 1.1 °C ची वाढ अनुभवत आहेत. म्हणून, जर तापमान पूर्व-औद्योगिक पातळीपेक्षा दोन अंश सेल्सिअस किंवा त्याहून अधिक वाढले, तर आपण काय होऊ शकते, याचा विचारही करता येत नाही.  हवामानातील बदल लक्षात घेऊन भविष्यासाठी आपण सतर्क राहायला हवे, असे आहवानच जागतिक हवामान संघटनेनं केलं आहे.  याबाबतीत वेळीच जागरुकता दाखवली नाही तर आरोग्य आणीबाणी लागू करण्याची भीतीही संघटनेनं व्यक्त केली आहे.  

=========

हे देखील वाचा : चिनच्या गुप्तहेर जहाजाची भारताला चिंता…

=========

गेल्या उन्हाळ्यात, युरोपियन देशात उष्णतेच्या लाटा, दुष्काळ आणि जंगलातील आगीमुळे लोकांच्या आरोग्यावर परिणाम झाला. तसाच धोका पुढच्या वर्षाही असणार आहे.  युरोपियन एन्व्हायर्नमेंट एजन्सीने (EEA) आगामी वर्षातील उष्णतेच्या लाटेबाबत इशारा दिला आहे. शतकाच्या अखेरीस उष्णतेच्या लाटेमुळे दरवर्षी 90 हजार युरोपियन लोकांचा मृत्यू होऊ शकतो, असा इशारा दिला आहे.  हवामान बदलामुळे युरोपात मलेरिया आणि डेंग्यू सारख्या रोगांचा फैलाव होण्याचीही भीती आहे.  यातूनही मृत्यूच्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता या संघटनेनं व्यक्त केली आहे.  (World Meteorological Organization)

एकूण काय, पुढच्या काही वर्षात युरोपात बदलत्या हवामानामुळे वातावरणातला थंडावा गायब होणार आहे.  बर्फाऐवजी तिथेही वाळूची वादंळं होण्याची शक्यता आहे.  भारतीयांसाठीही हा एक इशारा आहे.  या सर्वांची वेळीच नोंद घेत, हरित पट्टा वाढवण्यासाठी प्रयत्न करणे हाच एक मोठा पर्याय असू शकतो.

सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.