भारतात कोरोनानंतर आता टीबीच्या रुग्णांमध्ये वाढ होत चालली आहे. भारतात २०२१ मध्ये एकूण २१.४ लाख टीबीची प्रकरणे समोर आली आहेत. जी २०२० च्या तुलनेत १८ टक्क्यांनी अधिक आहेत. डब्लूएचओ यांनी जाहीर केलेल्या ग्लोबल टीबी रिपोर्ट २०२२ च्या रिपोर्टमध्ये हा दावा करण्यात आला आहे. रिपोर्टमध्ये असे सांगण्यात आले आहे की, २०२१ मध्ये २२ कोटी लोकांची तपासणी करण्यात आली. डब्लूएचओद्वारे हा तपास जगभरातील डागसोंसिस, ट्रिटमेंट आणि आजाराच्या आधारावर कोरोनाच्या प्रभावासाठी करण्यात आली होती. (TB Cases in India)
भारत सरकारने डब्लूएचओ ग्लोबल टीबी रिपोर्टला गांभीर्याने घेत त्यावर लक्ष देण्यास सांगितले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने असे म्हटले की, सरकारच्या प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियानाअंतर्गत ४० हजारांहून अधिक निक्षय मित्र (Nikshay Mitra) देशभरात १०.४५ लाख टीबी रुग्णांची सध्या मदत करत आहेत. या रिपोर्टवर लक्ष देत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने असा दावा केला की, भारतातील अन्य देशांच्या तुलनेत उत्तम प्रदर्शन केले आहे.
मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट्सनुसार, भारतात २०२१ दरम्यान टीबी रुग्णांची संख्या प्रति लाख लोकसंख्येवर २१० होती, तर २०१५ मध्ये प्रति एक लाख लोकसंख्येवर टीबी रुग्ण हे २५६ होती. यानुसार टीबीच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे.
वर्ष २०२५ पर्यंत देश टीबी मुक्त करण्याचे लक्ष्य
मोदी सरकारने २०२५ पर्यंत देश टीबी मुक्त राष्ट्र बनवण्याच्या दिशेने अभियान सुरु केले आहे. या अभियानाअंतर्गत संपूर्ण देशात निक्षय मित्र हे टीबी रुग्णांची मदत करत आङेत. या अभियानाशी जोडले जाण्यासाठी सरकारने निक्षय मित्र पोर्ट सुद्धा लॉन्च केला आहे. त्यासाठी तुम्ही www.nikshay.in ला भेट द्यावी लागणार आहे. (TB Cases in India)
हे देखील वाचा- मायोसायटिस आजार तुम्हाला आहे का?
अशा पद्धतीने करा टीबीपासून बचाव
टीबीपासून बचाव करण्यासाठी आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवावी. डाएटमध्ये खासकरुन प्रोटीन डाएट सोयाबीन, डाळी, मासे, अंडी, पनीरचा अधिक वापर करावा. कमजोर रोगप्रतिकारक शक्तीमुळे टीबीचे बॅक्टेरिया अॅक्टिव्ह होण्याची अधिक शक्यता असते. डॉक्टरांच्या मते, टीबीचे बॅक्टेरिया काही वेळा शरिरातच असतात. पण रोगप्रतिकारक शक्ती उत्तम असल्याने ते अॅक्टिव्ह होत नाहीत. अधिक गर्दीच्या ठिकाणांवर जाण्यापासून ही दूर रहावे. टीबीच्या रुग्णांनी खासकरुन याचे पालन करावे. कमीत कमी एक मीटर अंतर ठेवावे आणि त्यांच्या भांड्यात दुसऱ्यांनी खाऊ सुद्धा नये.