पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पीटीआयचे प्रमुख इमरान खान यांच्यावर एका रॅलीदरम्यान जीवघेणा हल्ला झाला. या हल्ल्यात त्यांच्या पायाला गोळी लागली. सध्या त्याची प्रकृती ठिक आहे. पाकिस्तानात सत्तेसाठी नेहमीच जीवघेणे हल्ले झाले आहेत. जनतेचे समर्थन आणि निवडणूकीच्या निकालानंतर सत्तेसाठी काही नेत्यांवर हल्ले झाले यापूर्वी सुद्धा झाले होते. काही नेत्यांना या हल्ल्यात आपला जीव ही गमवावा लागला आहे. (Pakistan Politics)
पाकिस्ताचे पहिले पीएम लियाकत अली सुद्धा निशाण्यावर
पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान लियाकत अली खान यांची सुद्धा गोळ्या घालून हत्या करण्यात आली होते. भारतात जेव्हा जवाहरलाल नेहरु यांच्या नेतृत्वात अंतरिम सरकार बनले तेव्हा ते पहिले पीएम बनले. या सरकारमध्ये लियाकत अली खान भारताचे अर्थ मंत्री झाले होते. दरम्यान जेव्हा भारताची विभागणी झाली तेव्हा मुस्लिम लीगचे नेते राहिलेले लियाकत अली खान हे पाकिस्तानचे पंतप्रधान झाले. दरम्यान, त्यांना जिन्ना यांनी काही दिवसानंतर पसंद करणे बंद केले होते. लियाकत अली खाल १६ ऑक्टोंबर १९५१ मध्ये कंपनी गार्डनच्या लोकांमध्ये पोहचले आणि त्यांना संबोधित करणार होते. तेव्हाच त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. त्यांना तातडीने सैन्याच्या रुग्णालयात नेण्यात आले. त्यांचे ऑपरेशन सुद्धा झाले पण मृत्यू झाला.
बेनजीर भुट्टो यांच्यावर हल्ला
पाकिस्तानातील सर्वाधिक तरुण पंतप्रधान बेनजीर भुट्टो यांच्यावर सुद्धा गोळीबार झाला होता. त्या ३५ वर्षाच्या होत्या आणि त्याच वयात त्या पाकिस्तानच्या पंतप्रधान झाल्या होत्या. भुट्टो यांनी १९८८ मध्ये पहिल्यांदा निवडणूक जिंकत पंतप्रधान झाल्या. पण त्या फक्त दोन वर्षच पाकिस्तानचे पंतप्रधान राहिल्या. १९९० मध्ये पाकिस्तानच्या राष्ट्पतींद्वारे त्यांचे सराकर बरखास्त करण्यात आले. १९९३ मध्ये बेनजीर पुन्हा पीएम झाल्या, पण १९९६ मध्ये त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप लावलण्यात आला. यामुळे त्यांना तुरुंगात जावे लागले होते. जेव्हा त्या तुरुंगातून बाहेर पडल्या तेव्हा त्यांना देश सोडावा लागला. २००७ मध्ये बेनजीर पुन्हा पाकिस्तानात परतल्या. पुन्हा निवडणूक लढवू पाहत होत्या. प्रचारादरम्यान त्यांनी दहशतवादी संघटनांवर जोरदार हल्लाबोल केला होता. डिसेंबर २००७ मध्ये निवडणूकीच्या प्रचारादरम्यान त्यांना गोळी घालण्यात आली आणि हल्लेखोराने स्वत:वर सुद्धा गोळ्या झाडून घेतल्या.
खान अब्दुल जब्बार खान यांची हत्या
९ मे १९५८ रोजी खान अब्दुल जब्बार ज्यांना डॉ. खान साहिब अशा नावाने ओळखले जात होते. त्यांची सुद्धा हत्या झाली. त्यांची हत्या एक मियानवाली आधारित भू-राजस्व क्लर्क अट्टा मोहम्मद याने केली होती. अब्दुल खान NWFP चे नेते होते. लियाकत यांच्या नंतर दुसरी हाय प्रोफाइल मर्डर होती. फेब्रुवारी १९५९ मध्ये सार्वत्रिक निवडणूकीसंबंधित आयोजित एका बैठकीत झांगचे कर्नल सैय्यद आबिद हुसैन यांची आपल्यासोबत येण्याची वाट पाहत होते. ही घटना अशावेळी झाली जेव्हा खान लाहौर मध्ये आपला मुलगा सदुल्लाह खान यांच्या घरातील बगिच्यात बसलेले होते. हल्लेखोर मियांवाली एका असंतुष्ट भू-राजस्व क्लर्क होतो, ज्याला दोन वर्षापूर्वी सेवेतून काढून टाकण्यात आले होते.
मीर मुर्तजा भुट्टो यांची हत्या
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान जुल्फिकार अली भुट्टो यांचा मोठा मुलगा मीर मुर्तजा भुट्टो यांच्यावर सुद्धा गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. २० डिसेंबर १९९६ मध्ये कराचीत त्यांच्या पक्षाच्या ६ कार्यकर्त्यांसोबत झालेल्या हाणामारीत त्यांची हत्या करण्यात आली. (Pakistan Politics)
फजल-ए-हक- यांची गोळ्या झाडून हत्या
पाकिस्तानचे खैबर पख्तूनख्वाचे माजी मार्शल लॉ प्रशासक, माजी राज्यपाल आणि माजी मुख्यमंत्री, लेफ्टिनेंट जनरल फजल-ए-हक यांची सुद्धा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यांच्यावर पेशावर येथे ३ ऑक्टोंबर १९९१ मध्ये एका अज्ञात हल्लेखोराने गोळी चालवली. याच दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
हे देखील वाचा- ब्राजीलचे राष्ट्रपती झाल्यानंतर लूला डी सिल्वा यांचा का केला जातोय विरोध?
जनरल परवेज मुशर्रफ यांच्यावर सुद्धा हल्ला
पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेज मुशर्रफ यांच्या ताफ्यावर सुद्धा झाला होता. २००३ मध्ये अत्याधुनिक सुरक्षा असणाऱ्या ताफ्यावर रावलपिंडीत एक पुल पार करताना बॉम्ब स्फोट ढाला. या हल्ल्यात त्यांना लिमोसिन मध्ये एक जॅमिंग डिवाइस द्वारे वाचवण्यात आले होते. ज्याने रिमोट नियंत्रित विस्फोटकांना पुल उडवण्यापासून थांबवले होते. याच वर्षात २५ डिसेंबरला सुद्धा त्यांच्यावर हल्ला झाला. पण तेव्हा सुद्धा ते बचावले. २००७ मध्ये सबमशीन गनच्या माध्यमातून त्यांच्या विमानावर ३० राउंड फायरिंग ही करण्यात आली. पण तेव्हा ही ते बचावले.