न्युक्लियर हत्यारांप्रकरणी भारताचा जगातील ७ टॉप देशांमध्ये क्रमांक लागतो. भारताकडे सध्या १६० न्युक्लियर हत्यारे आहेत. मात्र ही स्थिती अशीच असती का जर ३० ऑक्टोंबरला जन्मलेले देशाचे महान वैज्ञानिक होमी भाभा (Homi Bhabha) जर अपघातात दगावले नसते तर? खरंतर नाही. पण त्यांचा मृत्यू एका विमान अपघातात झाला नसता तर भारत न्युक्लियर सायन्सच्या क्षेत्रात फार पुढे गेला असता.
न्युक्लियर एनर्जी प्रोग्रामचे जनक होमी भाभा २४ जानेवारी १९६६ मध्ये मुंबईहून न्यूयॉर्कला जात होते. तेव्हाच त्यांच्या एअर इंडियाच्या विमानाला अपघात झाला. यामध्ये भाभा यांच्यासह असलेल्या ११७ प्रवाशांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला होता. तेव्हा ते ५६ वर्षाचे होते, त्याच काळात त्यांना खुप काही करायचे सुद्धा होते.
ऑक्टोंबर १९६५ मध्ये होमी भाभा यांनी ऑल इंडिया रेडियोवर घोषणा करत असे म्हटले की, त्यांना जर परवानगी मिळाली तर १८ महिन्यात न्युक्लियर बॉम्ब तयार करु शकतो. ते कृषी, उर्जा आणि वैद्यकिय क्षेत्रात प्रगती करण्यासाठी न्युक्लियर एनर्जी प्रोग्राम तयार करु पाहत होते. त्यांना असे ही वाटत होते की, देशाच्या सुरक्षिततेसाठी न्युक्लियर बॉम्ब तयार केले पाहिजेत.
मीडिया रिपोर्ट्समध्ये असे सांगितले जाते की, भारताची प्रगती पाहून अमेरिका थोडा चक्रावला होता. त्याला असे वाटत होते की, भारताने जर न्युक्लियर बॉम्ब तयार केल्यास तो दक्षिण एशियासाठी धोकादायक ठरु शकतो. असे म्हटले जाते की, भारतातील न्युक्लियर प्रोग्राम थांबवण्यासाठी भाभा (Homi Bhabha) यांच्या हत्येचा कट रचण्यात आला होता.अमेरिकेतील एजेंसी सीआयएवर या संदर्भात संशय सुद्धा होता. अधिकृत रुपात त्या विमान अपघाताचे कारण हे जेनेवा एअरपोर्ट आणि फ्लाइट पायलटची चूक असल्याचे सांगितले गेले. माउंट ब्लॅकच्या डोंगरांवर फ्लाइटच्या लोकेशनसंदर्भात भ्रम निर्माण झाल्याने अपघात झाला होता.
हे देखील वाचा- हिमाचलच्या पहिल्या मुख्यमंत्र्यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर बसने केला घरचा प्रवास, खात्यात होते फक्त ५६३ रुपये
दरम्यान, २००८ मध्ये समोर आलेल्या रिपोर्टनुसार सीआयएच्या अधिकाऱ्यांनी असे संगितले की, भाभा यांच्या मृत्यूचा कट रचण्यात आला होता. पत्रकार ग्रेगरी डगलस यांच्याशी बातचीत करताना अधिकारी रॉबर्ट क्राओली यांचे असे म्हणणे होते की, भारतातील न्युक्लियर प्रोग्राम आमच्यासाठी एक समस्या होती. त्यांच्या मते भाभा रशियाच्या मदतीने असे करत होता. भाभा ज्या कामासाठी जात होते, त्यानंतर अमेरिकेला अधिक त्रास झाला असता. असे म्हटले जाते की, विमानाच्या कार्गोत बॉम्ब स्फोट घडवून आणत ते उडवण्यात आले होते. दरम्यान, याची पुष्टी झाली नाही.