शेती आणि अटॉमिक पर्यटनानंतर आता डार्क टुरिज्म (Dark Tourism) जोरदार सध्या चर्चा आहे. जगभरात पर्यटन इंडस्ट्रीला चालना देण्यासाठी विविध प्रकारे पर्यटनाचे मार्ग शोधले जात आहेत. यापैकीच एक म्हणजे डार्क टुरिज्म. आता हिल्स स्टेशन, रोमांचक आणि मौजमजेसह लोक डार्क टुरिज्मला प्राथमिकता देत आहेत NYT च्या एका रिपोर्ट्सनुसार, अमेरिकेत ८० टक्के लोक डार्क टुरिज्मच्या ठिकाणी जाऊ पाहत आहेत. तर जाणून घेऊयात नक्की काय आहे डार्क टुरिज्म आणि जगात या संदर्भातील कुठे आहेत ठिकाणं त्याबद्दल ही अधिक.
डार्क टुरिज्म म्हणजे अशी ठिकाणं ज्यांचा इतिहास आजही कायम आहे. तेथील गोष्टी अजूनच ही तशाच असल्या तरीही त्याचे आता खंडर मध्ये रुपांतर झाले आहे. आपण त्याला कब्रस्तान असे ही बोलू शकतो. एखाद्या मोठ्या संकटानंतर तेथील स्थिती कशी झाली असेल आणि आताचे त्याचे रुप पाहता खुप भयावह वाटते. अशातच या ठिकाणांवर आणखी काय करता येईल किंवा त्या ठिकाणची अधिकाधिक माहिती घेण्यास लोक खुप उत्साही झाली आहेत. अशा ठिकाणचे फोटो आपल्या कॅमेऱ्यात लोक कैद करु पाहत आहेतच. पण येथे आवर्जून त्यांना भेट ही द्यायला आवडत आहे.
पासपोर्ट फोटो डॉट ऑनलाईनच्या एका सर्वेनुसार ८० टक्क्यांपर्यंत अमेरिकेतील लोकांना आयुष्यात एकदा तरी डार्क टुरिज्मचा (Dark Tourism) हिस्सा बनायचे आहे. ऐवढेच नव्हे तर ३० टक्के लोकांना युक्रेनला जायचे आहे. पण ते सध्या युद्ध थांबण्याची वाट पाहत आहेत. येथील लोकांना तेथील स्थिती अनुभवायची आहे आणि तेथील गोष्टींमधून खुप काही शिकायचे आहे. आंतरराष्ट्रीय टूर ऑपेरेटर्सकडून सुद्धा अशा ठिकाणी जाण्याचा प्लॅन तयार केला जात आहे.
डार्क टुरिज्म संबंधित काही खास ठिकाणे सुद्धा पर्यटकांना आवडत आहेत. १७ व्या शतकात जादूच्या आरोपांमुळे अत्याचार झालेल्या केंद्रांमध्ये बोस्टन, पोलंड मधील यातना स्थळ, जापानमधील सुसाइड फॉरेस्ट अओकिगहारा, कोलंबियातील लक्झरी जेल पाब्लो एक्सोबार, टेनेसीचा मॅकमेकेमी मनोर घोस्ट लोकांना आवडत आहे. पर्यटकांकडून अशा ठिकाणांबद्दल बोलले जात आहे जेथे कधी नरसंहार झाला होता.
हे देखील वाचा- चिनमध्ये सध्या कोंबड्या घरात पाळण्याचा ट्रेंड
पर्यटनासंबंधित शिक्षक असे म्हणतात की, डार्क टुरिज्मला ब्लॅक टुरिज्म अशा नावाने सुद्धा ओखळले जाते. डार्क टुरिज्मची एक वेगळीच भाषा तयार करण्यात आली आहे. त्यानुसार अशी ठिकाणी जेथे नेहमीच यातना, दु:ख आणि नरसंहारच्या घटना घडल्या होत्या. यालाच डार्क टुरिज्म असे म्हटले जाते.