दिवाळीच्या सणाला सुरुवात झाली आहे. अशातच घरात आनंदाचे मंगलमय वातावरण असतेच. पण घराची सजावट ही केली जाते. अंगणात किंवा दारापुढे रांगोळी काढली जाते, तोरणे लावली जातात. याच दरम्यान, रांगोळी काढताना त्यामध्ये काही शुभ चिन्हांचा वापर केला जातो. यामागे विविध धार्मिक मान्यता सुद्धा आहेत. (Vastu tips for Rangoli)
तर दिवाळीच्या दिवशी भगवान श्री राम हे १४ वर्ष वनवास आणि रावणाचा वध करुन अयोध्येत आले होते. ते आल्याने त्यांच्या आनंदास्तव संपूर्ण अयोध्येत दीवे लावलण्यात आले होते. तेव्हापासून ते आतापर्यंत दिवळीच्या दिवळी घरी रंगोळी, दीवे लावण्याची परंपरा आहे. तर रांगोळीला समृद्धीचे प्रतीक मानले जाते. असे म्हटले जाते की, घराबाहेर काढली जाणारी रांगोळी ही लक्ष्मीच्या स्वागतासाठी असते. अशातच तुम्ही सुद्धा दिवाळीदरम्यान रांगोळी काढणार असाल तर ती वास्तुनुसार कोणत्या दिशेला असावी याचबद्दल आपण आज पाहूयात.

-रांगोळी हा शब्द ‘रंग’ आणि ‘अवल्ली’ या दोन शब्दांपासून बनवला आहे. याचा अर्थ असा ही रंगांची ओळ. या प्राचीन केलेला सणांच्यावेळी फार महत्व असायचे.
-घराबाहेर आणि घरात काढली जाणारी रांगोळीचे काही प्रकार असता. परंतु कमळाचे डिझाइन असलेली रांगोळी ही दिवाळी दरम्यान जरुर काढणे शुभ मानले जाते. धार्मिक मान्यतेनुसार, धनाची देवी लक्ष्मी हिचे आसन मानल्या जाणाऱ्या कमळाची रांगोळी दिवाळीच्यावेळी काढल्यास देवी लक्ष्मी तुम्हाला प्रसन्न होते.
-वास्तुनुसार दिवाळीच्या वेळी तुम्ही घराच्या मुख्य द्वारावर रांगोळी काढणार असल तर ती लाल, पिवळ्या, हिरव्या, गुलाबी, नारंगी अशा रंगांची असू द्या. अशी मान्यता आहे की, या रंगांचा वापर केल्याने सकारात्मक उर्जा वाढते. वास्तुनुसार रांगोळीसाठी दिवाळीवेळी तरी काळ्यारंगाचा वापर करु नये. (Vastu tips for Rangoli)
-रांगोळी काढताना तुमचा अंगठा आणि पहिले बोट जसे आपण प्राणायम करताना मुद्रा करतो त्यापद्धतीने ती धरावी. या मुद्रेमुळे तुमची मस्तिक अधिक उर्जावान आणि सक्रिय करते. त्याचसोबत तुमच्या बौद्धिक शक्तीत सुद्धा वाढ होते.
-रांगोळी काढताना पीठ, तांदूळ, हळद-कुंकू, फुलांच्या पाकळ्यांचा वापर करणे अत्यंत शुभ मानले जाते. त्याचसोबत तुम्ही तांदळाला विविध रंग लावून त्याची सुद्धा रांगोळी काढू शकता.
हे देखील वाचा- धनतेरसच्या दिवशी नवी झाडू का खरेदी करतात? पहा काय सांगते शास्र
वास्तुनुसार कशी काढाल रांगोळी
-जर तुमचे घर पूर्व मुखी असेल तर तुमच्या घराच्या मुख्यद्वारावर अंडाकार डिझाइनमध्ये रांगोळी काढा. पूर्व दिशेला अंडाकार डिझाइन आयुष्यात विकासाचे मार्ग उघडते. वास्तु शास्रानुसार या दिशेला रांगोळी काढल्यास तुम्हाला त्याचा लाभ नक्कीच होईल.
-उत्तरमुखी तुमचे घराचा प्रवेशद्वार असेल तर उत्तर दिशेला पाण्यासंदर्भातील रांगोळीचे डिझाइन काढू शकता. यामध्ये तुम्ही पिवळा, हिरवा किंवा आकाशी रंगाचा वापर करु शकता.
-दक्षिणमुखी घर असेल तर दक्षिण-पूर्व त्रिकोणात तुम्ही आयताकार डिझाइनची रांगोळी काढू शकता. असे करणे फार लाभदायी असते. या दिशेला रांगोळी काढल्याने तुमच्या आयुष्यात सुरक्षा, यश आणि आत्मविश्वास वाढतो.
-पश्चिममुखी घर असेल तर गोलाकार रांगोळी काढा. पश्चिम दिशेला तुम्ही ही रांगोळी काढू शकता. या दिशेला रांगोळी काढल्याने तुमच्या आयुष्यात लाभ आणि नव्या संधी उपलब्ध होतात.