जर तुम्हाला कोणत्याही जोखमीशिवाय उत्तम रिटर्न्स हवे असतील तर तुम्ही फिक्स्ड डिपॉजिट किंवा रिकरिंग डिपॉजिटमध्ये गुंतवणूक करु शकता. या दोन्हीत गुंतवणूक करणे म्हणजे कोणत्याही भीतीशिवाय तुम्हाला त्याचे रिटर्न हे वेळोवेळी मिळतातच. एफडी आणि आरडी मध्ये पैसे बुडण्याची भीती फार कमी असते. बँक एका वर्षासाठी १० वर्षाच्या काळासाठी आरडी करण्याची सुविधा देते. तर एफडीचा कालावधी हा ७ दिवस ते १० वर्ष असते. (FD vs RD)
रिकरिंग डिपॉजिट एक डेट इंस्ट्रुमेंट आहे आणि हे गुंतवणूकदारांना पैशांची सुरक्षितता देते. यामध्ये शॉर्ट टर्म मध्ये फंड बनवण्याचे उत्तम मार्ग मानला जातो. आरडीचा फायदा असा होतो की, प्रत्येक महिन्याला तुम्ही थोडे-थोडे पैसे जमा करु शकतात. खासकरुन आरडीचे रिटर्न महागाई दरापेक्षा कमी असतो. एफडी हे बचतीचा सोप्पा आणि सुरक्षित मार्ग आहे. यामध्ये बँक किंवा कोणतीही आर्थिक कंपनी मध्ये एका निश्चित काळासाठी पैसा लावला जातो. बँक किंवा आर्थिक संस्था या बदल्यात ठरवण्यात आलेल्या मर्यादेत व्याज देते.
आरडीचे फायदे-नुकसान
आरडीमध्ये जमी करण्यात आलेल्या ५ लाखांच्या रुपयांपर्यंतच्या डिपॉजिट इंन्शुरन्स अॅन्ड गॅरेंटी कॉर्पोरेशनकडून गॅरेंटी दिली जाते. मात्र एखाद्या कारणास्तव पैसे बुडाले तर तर ५ लाखांपर्यंतची रक्कम गुंतवणूकदाराला कोणत्याही स्थितीत परत मिळतात. आरडीत शॉर्ट टर्ममध्ये उत्तम पैसे मिळवण्याचा सोप्पा मार्ग आहे. जर तुम्ही दीर्घकाळ गुंतवणूक करायची असेल तर यामध्ये गुंतवणूक करुन काहीच फायदा नाही. कारण यामध्ये जे रिटर्न मिळतात ते कमी असतात.
आरडीत करण्यात आलेल्या गुंतवणूकीवर टॅक्समधून सूट दिली जात नाही. यामुळए व्याजावर सुद्धा टॅक्स द्यावा लागतो. त्यामुळे तुम्ही विचार करा आणि त्यानंतरच आरडीमध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय घ्या. आरडी मध्ये लॉक-इन पीरियेड असतो. म्हणजे, एका मर्यादित काळापूर्वी तुम्ही पैसे काढू शकत नाहीत. जर तुम्ही पैसे काढले तर तुम्हाला त्यामधील काही शुल्क द्यावा लागतो. आरडी लहान बचतीचा सर्वाधिक उत्तम ऑप्शन मानला जातो. (FD vs RD)
हे देखील वाचा- कोण ठरवंत डॉलरच्या तुलनेतील रुपयांच्या एक्सचेंजचा दर?
एफडीचे फायदे-नुकसान
एफडीमध्ये करण्यात आलेल्या गुंतवणूकीवर सुरक्षित मानले जाते. तर एफडी दोन प्रकारची असते. क्युमुलेटिव्ह व्याज आणि नॉन-क्युमुलेटिव व्याज असणारी एफडी. क्युमुलेटिव व्याज असणाऱ्या एफडीमध्ये तुम्हाला मॅच्युरिटीवर प्रिंसिपल आणि कंपाउंडेड व्याज मिळते. नॉन-क्युमुलेटिव व्याज असणाऱ्या एफडीवर नियमित काळ जसे की, मासिक किंवा तिमाहीच्या आधारावर व्याज काढण्याचा ऑप्शन असतो. एफडीमध्ये सर्वाधिक पहिला लाभ असा की, या मध्ये व्याज आरडीपेक्षा अधिक मिळते.
जर तुम्हाला गुंतवणूकीसह टॅक्स मध्ये सूट हवी असल्यास तुम्ही एफडीमध्ये गुंतवणूक करु शकता. असे तुम्ही टॅक्स सेविंह एफडीमध्ये गुंतवणूक करु शकता. लक्षात घेण्यासारखी बाब अशी की, टॅक्स सेविंग एफडीसाठी लॉक-इन-पिरियड असतो. म्हणजेच, एका मर्यादेपर्यंत तुम्ही यामध्ये लावण्यात आलेले पैसे काढू शकत नाहीत. एफडी किंवा आरडीपैकी एक निवडण्यासाठी तुम्ही जी रक्कम गुंतवणूक करणार आहात त्यानुसार गुंतवणूकीचा कालावधी आणि टॅक्स संदर्भात सूट ही फार महत्वाची असते. जर तुमच्याकडे ठरवलेल्या कालावधीसाठी मोठी रक्कम असेल तर तुम्ही एफडीचा ऑप्शन निवडू शकता. जर तुम्हाला प्रत्येक महिन्यात एक निश्चित रक्कम गुंतवायची असेल तर तुमच्यासाठी आरडी हा बेस्ट ऑप्शन आहे. अधिक व्याज हवे असेल तर एफडीचा पर्याय निवडू शकता.