भारतात असे फार कमी वेळा होते की, ज्याने आंदोलन सुरु केले आहे त्याचे नाव त्याला दिले जाते. तर लोकनायक जयप्रकाश नारायण म्हणजेच जेपी अशा सुद्धा नावाने ओळखले जातात. त्यांच्या द्वारे छेडण्यात आलेल्या आंदोलन आज ही जेपी आंदोलनाच्या नावे ओळखले जाते. लोकनायक ही उपाधि मिळालेले जेपी तरुण वर्गात कसे आदर्श बनले याचा एक फार मोठा इतिहास आहे. त्यांचे प्रभावी व्यक्तीमत्वाची पायमुळ ही स्वातंत्र्यापूर्वीच रोवण्यास सुरु झाली होती. ज्या प्रकारे महात्मा गांधी यांनी महात्मा बनण्याचा पाया दक्षिण अफ्रिकेत पडला. जेपी यांनी लोकनायक बनवण्याचे बीज हे अमेरिकेत पडले. ११ ऑक्टोंबरला असणाऱ्या त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्याबद्दलच्या काही खास गोष्टी जाणून घेऊयात. (Jayaprakash Narayan B’day)
संघर्षात्मक बालपण
११ ऑक्टोंबर १९११ मध्ये बंगाल प्रेसिडेंसीके साररणाच्या सिताबदियारा गावात जेपी यांचा जन्म झाला. त्यांचे बालपण अत्यंत संघर्षात्मक गेले. पुराची स्थिती उद्भवल्याने त्यांना घरापासून दूर जावे लागले. अभ्यासात खुप आवड होती, स्वत: ला आत्मनिभर करण्याची इच्छा मनात बाळगून ते वयाच्या ९ व्या वर्षी गावातून बाहेर पडत पटनात आले. येथील एका हॉस्टेल मध्ये प्रवेश घेतला. देशासाठी काहीतरी करावी ही नेहमीच इच्छा मनात होती. त्यासाठी गांधीजींच्या असहयोग आंदोलनात सहभागी होण्यासाठी परिक्षेच्या २० दिवस आधीच त्यांनी कॉलेज सोडले. मात्र अभ्यास कधीच सोडला नाही.
अमेरिकेत जाण्याचा निर्णय
जेपी यांचे लग्न १९२० मध्ये वयाच्या १८ व्या वर्षात १४ वर्षाचा प्रभादेवी यांच्यासोबत झाले. लग्नाच्या दोन वर्षानंतर त्यांनी पुढील अभ्यासासाठी अमेरिकेत जाण्याचा निर्णय घेतला. त्यांनी आपल्या पत्नीला साबरमती आश्रमात सोडून कोणत्याही खर्चाचा विचार न करता जॉनस कार्गो जहाजातून अमेरिकेला गेले. तेथे पोहचल्यानंतर अडीच-तीन महिन्यानंतर त्यांनी बर्केले येथे प्रवेश घेतला.
विविध प्रकारची कामे केली
आपला खर्च चालवण्यासाठी जेपी यांनी विविध प्रकारची कामे केली. कॅनिंग फॅक्ट्रीत द्राक्ष उचलून सुखवणे ते फळांचे पॅकेजिंग, ऐवढेच नव्हे तर भांडी सुद्धा धुतली तर कधी गॅरेजमध्ये मॅकेनिक प्रमाणे काम ही केले. कसाई खान्यात काम करण्यासग लोशन विक्री करण्याचे काम आणि अभ्यास तर चालूच होता.
कामगारांच्या समस्या जवळून पाहिल्या
याच कामांदरम्यान जेपी यांना कामगार वर्गाच्या समस्या अधिक जवळून पहायला मिळाल्या. त्यामुळे त्यांनी नेहमीच आयुष्यात कामगारांसाठी काम केले. ब्रकेले मध्ये रसायन शास्रात एक सेमिस्टरमध्ये शिकल्यानंतर त्यांनी इओवा युनिव्हर्सिटीत जावे लागले. कारण बर्केलेची फी दुप्पट झाली होती. मात्र ते काही युनिव्हर्सिटीत जात राहिले.
मार्क्सवादाचा परिणाम
याच दरम्यान त्यांना समाजशास्र सारख्या आवडीचा विषय शिकण्याची संधी मिळाली. त्यांनी विस्कॉन्सिन मध्ये त्यांनी कार्ल मार्क्सचे दास कॅपिटल पुस्तक वाचले. रशियाची क्रांतीच्या यशाबद्दल जाणून घेतल्यानंतर मार्क्सवर त्यांचा अधिक विश्वास बसू लागला होता. समाजशास्रात अधिक खोल अभ्यास करु लागले. त्यांचे सांस्कृतिक विविधता शीर्षक नावाचे शोधपत्र त्यावेळी सर्वश्रेष्ठ समाजशास्र शोधपत्र म्हणून घोषित केले गेले. त्यांनी विस्कॉन्सिन मध्ये समाजशास्रात एमए आणि ओहियो युनिव्हर्सिटीत व्यवहारिक विज्ञानात बीएची डिग्री घेतली. (Jayaprakash Narayan B’day)
हे देखील वाचा- फिरोज गांधींवर कशा प्रकारे करण्यात आले अंतिम संस्कार? ज्याबद्दल खोटे बोलले जाते
एका मार्क्सवादी रुपात परतले
१९२९ मध्ये भारतात परतल्यानंतर जेपी मार्क्सवादी रुपात परतले होते. मात्र स्वातंत्र्याच्या आंदोलनापासून दूर राहू शकले नाही. ते काँग्रेसमध्ये सहभागी झाले. मात्र काही वर्षांपर्यंत मार्क्सवाद त्यांच्यामध्ये होता. काही वेळा त्यांना गांधीजींच्या पद्धती आवडायच्या नाहीत. त्यांनी कधीच गांधीजींचा विरोध केला नाही. पण काँग्रेसमध्ये काँग्रेस सोशलिस्ट पार्टी जरुर तयार केली. भारत छोडो आंदोलनात त्यांनी अन्य समाजवादांसोबत विविध प्रकारचे योगदान दिले. ज्यामुळे त्यांना अधिक लोकप्रियता मिळाली.
स्वातंत्र्यानंतर जेपी पाच वर्षापर्यंत रेल्वे कर्मचाऱ्यांच्या संघटनेचे अध्यक्ष होते. मात्र याआधी पासूनच ते हरी जेपी मार्क्सवादावरुन गांधीवादाकडे वळत होते. स्वातंत्र्यानंतर त्यांनी गांधीजींच्या मार्गावर चालण्यावर अधिक विश्वास ठेवला. त्यानंतर सामाजिक न्याय आणि सर्वोदयासाठी संघर्ष करण्यास सुरुवात केली. नंतर १९७० च्या दशकात त्यांनी विद्यार्थ्यांना प्रेरित केले आणि बिहारमध्ये सामाजिक न्यायासाठी एक आंदोलन सुरु केले. त्यानंतर इंदिरा गांधी यांच्या इमेरजेंसीच्या विरोधात सु्द्धा जेपी आंदोलनाचे प्रमुख चेहरा होते. मात्र जेव्हा इंदिरा गांधी १९९७ मध्ये सत्तेतून बाहेर पडल्या तेव्हा नव्या सरकारमध्ये जेपी यांना कोणतेही पद दिले गेले नाही. ८ ऑक्टोंबर १९७९ मध्ये त्यांना हृदय आणि मधुमेहाच्या आजाराने त्यांचे निधन झाले.