महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने लॉकडाऊनबाबत अलीकडेच सर्वेक्षण करण्यात आलं होतं. करोनाचा प्रसार थांबवण्यासाठी साडे पाच महिन्यांपासून लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. मात्र, लॉकडाऊनबाबत जनतेची काय मत आहेत हे जाणून घेण्यासाठी मनसेनं सहा दिवसांचे सर्वेक्षण सुरु केलं होतं. याचा निकाल आज जाहीर करण्यात आला आहे.
राज्यातील जनतेला लॉकडाऊन बाबत काय वाटत. तसंच, लॉकडाऊन हवं की नको? यावर तुमचं मत मांडा असं आवाहन मनसेकडून करण्यात आलं होतं. मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी त्यांच्या ट्विटरवर हे सर्वेक्षण सुरु केलं होतं. यात ७०. ०३ टक्के लोकांनी लॉकडाऊनविरोधात मत नोंदवली आहे. तर, २६ टक्के लोकांनी लॉकडाऊनचे समर्थन केलं आहे.