Home » बाबो… 700 ग्रॅमच्या सदस्याची झाली चोरी

बाबो… 700 ग्रॅमच्या सदस्याची झाली चोरी

by Team Gajawaja
0 comment
Theft from Moong Singh's house
Share

राजस्थानच्या बांसवाडा जिल्ह्यातील पडजा वडखिया गावात रहाणा-या 62 वर्षीय मूंग सिंह नावाच्या गृहस्थाच्या घरी एक चोरी(Theft from Moong Singh’s house) झाली आहे. मूंग सिंहच्या घरातील एक सदस्य चोरीला गेला आहे. या सदस्याची किंमत होती तब्बल दहा लाख रुपये. आणि या सदस्याचे वजन होते फक्त 700 ग्रॅम…आता तुम्हीही चक्रावलात ना…700 ग्रॅमचा हा सदस्य कोण याची उत्सुकता लागली असेल, तर हा सदस्य म्हणजे एक उंदीर आहे. मेंढीपालन करणारे मूंग सिंह यांना काही महिन्यापूर्वी हा उंदिर सापडला होता. तेव्हा तो जखमी होता. या उंदिराला त्यांनी घरी आणून त्याच्यावर उपचार केले. त्यादरम्यान या उंदराचा त्यांच्या सर्व घराला जिव्हाळा लागला. काटेरी प्रकाराचा हा उंदिर मग त्यांच्या घरातला सदस्यच झाला. पण काही दिवसांपूर्वी या उंदिराची चक्क चोरी (Theft from Moong Singh’s house) झाली आहे. चोरीला गेल्यावर मूंग सिंह यांना या उंदिराची किंमत कळली. हा उंदिर झाऊ या प्रजातीमधला आहे. काटेरी उंदिराची किंमत दहा लाखापर्यंत असते. या किंमतीमुळेच उंदिराची चोरी झाल्याची जाणीव झाल्यावर मूंग यांच्या कुटुंबानं या अनोख्या चोरीची तक्रार पोलिस ठाण्यात केली आहे. आता राजस्थानचे पोलीस हा काटेदार झाऊ उंदिर शोधत आहेत.

राजस्थानमध्ये झालेल्या एका अनोख्या चोरीची चर्चा चालू आहे. दागिने, रोख रक्कम, गाई-म्हशी, शेळ्या, मेंढ्या यांची चोरी आत्तापर्यंत झाली आहे. अगदी कबुतरे आणि पोपट यासारखे पक्षीही चोरीला गेले आहेत. पण आता चक्क एका उंदिराच्या चोरीची चर्चा सगळीकडे चालू आहे. राजस्थानच्या बांसवाडा जिल्ह्यातील पडजा वडखिया गावातले मूंग आणि त्यांचे कुटुंब मेंढीपालन करुन आपले उदरनिर्वाह करतात. 62 वर्षीय मूंग सिंह यांना वर्षभरापूर्वी जंगलात एक वेगळा उंदिर दिसला. या उंदिराला जखम झाली होती, आणि त्या वेदनेने त्याला फिरता येत नव्हते. मूंग यांनी या जखमी उंदिराला घरात आणले. झाऊ प्रजातीचा हा उंदिर राजस्थानच्या वाळवंटी प्रदेशात सापडतो. या उंदिराला अंगभर काटे असतात. या जखमी उंदिरावर मूंग आणि त्यांच्या कुटुंबानं उपचार केले. त्यानंतर हा उंदिर या घरातलाच एक सदस्य झाला. मूंग सिंह यांची नातवंडे या उंदिराचा सांभाळ करत होती. या उंदिराच्या काट्यांचाही त्यांना कधी त्रास झाला नाही. अवघ्या 700 ग्रॅमच्या या उंदिराला मूंग सिंह यांच्याच काही नातेवाईकांनी पाहिले. त्यांनी या उंदिराबाबत चौकशी करुन त्याचे वजनही केले. हे नातेवाईक गेल्यावर मूंग सिंह यांच्या लक्षात आले की त्यांचा आवडता उंदिरही (Theft from Moong Singh’s house) गायब झाला आहे. यानंतर या कुटुंबानं या प्रकारच्या उंदिराची माहिती काढली. तेव्हा त्याची किंमत कळली. मग या कुटुंबानं उंदिर हरवल्याची चक्क पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

या झाऊ प्रकारच्या उंदिराची अनेक वैशिष्ट्ये आहेत. शक्यतो बिळात रहाणारा हा झाऊ उंदिर कोणत्याही प्रकारचा धोका जाणवला की मागच्या पायांमध्ये तोंड दाबून बॉल सारखी शरीराची रचना करतो. याच्या शरीरावर काटे असतात. आणि हे काटे शिका-याला लागले तर त्याची वेदना प्रचंड असते. हा छोटुसा उंदीर स्वतःच्या सुरक्षितेसाठी कमालीचा जागरुक असतो. कधीकधी आपली शिकार करायला कोणीही आले असले तर त्यांना घाबरवण्यासाठी स्नायू फुगवून शरीराचा आकार वाढवतात आणि नाकातून वेगाने हवा सोडवून सापाच्या फुत्करण्यासारखा आवाज काढतात.(Theft from Moong Singh’s house)

============

हे देखील वाचा : प्लाक सोरायसिस काय आहे? जाणून घ्या लक्षण आणि उपचार

============

या काटेरी उंदिराच्या अर्थात झाऊ प्रकारच्या उंदिराच्या 17 प्रजाती आहेत. साधारणतः त्या रेताळ प्रदेशात सापडतात. भारतात ही प्रजाती प्रामुख्याने राजस्थान आणि गुजरातमध्ये आढळते. हे उंदिर रेताळ जमिनीखाली रहातात तेही मोठ्या बिळात रहातात. साप आणि मुंगूस यांच्यापासून या उंदराला धोका असतो. पण त्यांची शिकार करणे सोप्पे नसते. कारण या उंदराचे काटे हे अत्यंत टोकदार असतात. ते लागल्यास बराच काळ वेदना सहन कराव्या लागतात. या झाऊ उंदिराला अलिकडे घरातही पिंज-यात पाळण्यात येते. त्यांचा वेगळा आकार आणि अंगभर असणारे काटे यांच्यामुळे या उंदिरांना मोठी मागणी आहे. त्यांची किंमतीही दहा लाख आणि कधीकधी त्यापेक्षाही जास्त असते. त्यामुळेच मुंग सिंह यांच्या घरातील उंदिराची चोरी(Theft from Moong Singh’s house) झाल्याचा अंदाज पोलीसांनी व्यक्त केली आहे. आता हा चोरीला गेलेला पोलीस कसा आणि कधी शोधतात याकडे लक्ष लागले आहे.

सई बने…


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.