पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशात 5G नेटवर्क (5G Network) लॉन्च केले आहे. त्यांनी राजधानी दिल्लीतील प्रगति मैदानात एका भव्य कार्यक्रमादरम्यान ते लॉन्च केले आहे. त्याचसोबत सर्व टेलिकॉम कंपन्यांनी सुद्धा आपल्या आपल्या नेटवर्कचे डेमो दाखवण्यास सुद्धा सुरुवात केली आहे. वाराणसी मधील एक गाव आणि अहमदाबाद मधील एका गावात रिलायनस जिओ आणि एअरटेलने सर्वात प्रथम 5G ची सुरुवात केली आहे.
रिपोर्टनुसार, पहिली फेज ही ज्या शहरात 5G सर्विस सुरु होईल त्यामध्ये अहमदाबाद, बंगळुरु, चंदीगढ, चेन्नई, दिल्ली. गांधीनगर, गुरुग्राम, हैदराबाद, जामनगर, कोलकाता, लखनौ, मुंबई आणि पुण्याचा समावेश आहे. रिलायनस जिओ ते एअरटेल, वीई सर्व टेलिकॉम कंपन्या आता या शहरात आपली सर्विस सुरु करणार आहेत. त्याचसोबत टेलिकॉम कंपन्या वेगाने या नेटवर्कचा विस्तार ही करणार आहेत.
नव्या सिम कार्डची गरज नाही
असे मानले जात आहे की, 5G नेटवर्क 4G पेक्षा १०० पट अधिक वेगवान असणार आहे. अशातच व्हिडिओ स्ट्रिमिंग ते ऑनलाईन गेमिंग, व्हिडिओ कॉलिंगच्या क्वालिटीत सुद्धा अभूतपूर्व बदल होणार आहे. प्राप्त झालेल्या माहितीनुसार, 5G च्या वापरासाठी लोकांना कोणत्याही प्रकारच्या नव्या सिम कार्डची गरज नाही. तु्म्ही तुमचे जुनेच सिम कार्ड 5G टेक्नॉलॉजीला सपोर्ट करणार आहे. जसं की, 3G सिम कार्ड हे 4G मध्ये बदलले होते.

कोणती टेलिकॉम कंपनी कधी सुरु करणार 5G सुविधा
-एअरटेलचे चेअरमॅन सुनील भारती मित्तल यांनी असे सांगितले की, १ ऑक्टोंबर पासूनच देशातील ८ शहरात 5G सुविधा सुरु होणार आहे. त्याचसोबत त्यांनी असे ही सांगितले की, २०२४ पर्यंत ५जी नेटवर्क संपूर्ण देशात सुरु होईल.
-जिओने आधीच घोषणा केली आहे की, दिवाळीपासून ही सेवा दिल्ली, मुंबई, कोलकाता, चैन्नई सारख्या मेट्रो शहरात सुरु होणार आहे रिलायनस जिओचे प्रमुख मुकेश अंबानी आज असे म्हटले की, जिओचे ५जी नेटवर्क (5G Network) सुद्धा डिसेंबर २०२३ पर्यंत संपूर्ण देशात पसरलेले असेल.
-वोडाफोन-आयडियाचे चेरअमॅन कुमार मंगल बिर्ला यांनी असे म्हटले की, कंपनी लवकरत आपली ५जी सेवा देशात सुरु करेल.
हे देखील वाचा- आता ग्राहकांना खरेदी करता येणार नाही नवे सिम कार्ड, जाणून घ्या अधिक
5G व्यतिरिक्त डेटाचे सुद्धा होणार फायदे
महत्वाची गोष्ट अशी की, 5G सर्विस केवळ तुम्हाला केवळ डेटाची स्पीडच नव्हे तर इंटरनेटवर काम करण्याचा अनुभव ही बदलणार आहे. त्याचसोबत फोनची कॉल क्वालिटी ते टेक्स मेसेज पर्यंतच्या क्वालिटीत एक नवा आणि आधुनिक स्तर निर्माण होणार असून जो युजरला उत्तम डिजिटलचा अनुभव देणार आहे.