Home » ईराण मधील हिजाब वादानंतर पाकिस्तानात एअर होस्टेसच्या कपड्यांसाठी काढलाय विचित्र नियम

ईराण मधील हिजाब वादानंतर पाकिस्तानात एअर होस्टेसच्या कपड्यांसाठी काढलाय विचित्र नियम

by Team Gajawaja
0 comment
Pakistan Cabin Crew
Share

इस्लामिक देश ईराणसह काही देशात हिजाब संदर्भात विरोध केला जात आहे. याच दरम्यान, पाकिस्तान मधून एक विचित्र बातमी समोर आली आहे. त्यानुसार महिला एअर होस्टेससाठी बातमी आहे. देशातील राष्ट्रीय एअरलाइन्स- पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्स (PIA) च्या केबिन क्रूसाठी योग्य प्रकारचे कपडे घालण्यासंदर्भात सांगण्यात आले आहे. पाकिस्तान मधील वृत्तपत्र, द एक्सप्रेस ट्रिब्युशनच्या रिपोर्ट्सनुसार, महिलांनी योग्य अंडरगार्मेंट्स घालणे गरजेचे आहे. (Pakistan Cabin Crew)

पीआयएने दावा केला आहे की, एअर अटेंडेंट द्वारे उत्तम पोषाक घातले जात नसल्याने पीआयएची वाईट छाप पडत आहे. एक नकारात्मक प्रतिमा उभी राहत आहे. पाकिस्तानचे नॅशनल एअर लाइन्सचे महाप्रबंधक आमिर बशीरने एअरलाइनच्या एअर होस्टेसच्या कपड्यांवरुन आपत्ती व्यक्त केली आहे. त्यांनी असे म्हटले की, एअर होस्टेसच्या कपड्यांवरुन खुप तक्रारी आल्या आहेत. जेव्हा त्या एअरलाइन्सच्या कार्यालयात येतात, हॉटेलमध्ये राहतात किंवा दुसऱ्या शहरात प्रवास करतेवेळी योग्य कपडे घालत नाहीत. त्याचा खराब प्रभाव एअरलाइन्सवर पडत आहे. यामुळेच पीआयएची प्रतिमा मलिल होत आहे.

Pakistan Cabin Crew
Pakistan Cabin Crew

बशीरने महिलांना साधे कपडे आणि अंडरगार्मेंट्स घालण्याची ताकीद दिली आहे. बशीरने यासाठी काही गाइडलाइन्स ही तयार केल्या आहेत. त्यानुसार पुरुष आणि महिलांद्वारे घातले जाणारे कपडे आपली संस्कृती आणि राष्ट्रीय नैतिकतेनुसार असले पाहिजेत. त्याचसोबत ग्रुमिंग अधिकाऱ्यांना निर्देशन दिले आहेत की, ते प्रत्येक वेळी केब्रिन क्रू वर लक्ष ठेवतील आणि जे या नियमाचे उल्लंघन करतील त्यांच्याबद्दल तातडीने तक्रार करावी. (Pakistan Cabin Crew)

हे देखील वाचा- ब्रिटेन मधील राजेशाहीला लोक किती पसंद करतात? जाणून घ्या अधिक

यामुळे अन्य आंतरराष्ट्रीय ट्रांसपोर्ट वर्कर्स फेडरेशनने PIA पायलट आणि फ्लाइट अटेंडेंटच्या अधिक कामाच्या वेळेवर ही चिंता व्यक्त केली आहे. फेडरेशनने या प्रकरणी पीआयएचे सीईओ आमिर हयात यांना एक पत्र सुद्धा लिहिले आहे. त्या पत्रात त्यांनी असे म्हटले आहे की, कामाचे तास वाढवल्यास केबिन क्रू च्या प्रोडक्टिव्हिटी आणि परफॉरमेंन्सवर ही प्रभाव पडतो. हे पाऊल नियमांचे उल्लंघन करते.

पीआयएने नुकत्याच जेव्हा एक पाकिस्तानी प्रवाशाने खिडकी तोडण्याचा प्रयत्न केल्याच्या बातमी बद्दल सांगितले होते. तेव्हा प्रवासी हा पेशावर येथून दुबईसाठी रवाना झाला होता. विमानात नमाज पठणासाठी रोखल्यानंतर प्रवाशाने हंगामा केला होता. या घटनेचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाला होत. जेव्हा तो फ्लाइटमध्ये चढला तेव्हा सर्वकाही ठिक होते. मात्र त्यानंतर तो अशा प्रकारे वागू लागला होता. जेव्हा त्याला नमाजासाठी अडवले तेव्हा त्याने हंगामा केला.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.