रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या ७ महिन्यांपासून अधिक काळ युद्ध सुरु आहे. याच दरम्यान रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सैन्यासाठी जमवाजमव करण्याचे आदेशानंतर हालचाली अधिक वाढल्या गेल्या. लोक देश सोडून पळ काढण्याचा प्रयत्न करु लागले. पुतिन यांनी ३ लाख रिजर्व सैनिकांना तैनात करण्याचे सुद्धा आदेश दिले होते. पुतिन यांचा हा आदेश अशावेळी आला जेव्हा रशिया युक्रेनला चार विभागात एकत्रित करण्याच्या तयारीत आहे. त्यानंतर बुल्गेरियातील भविष्यवाणी सांगणारे बाबा वेंगाने (Baba Vanga) रशिया आणि पुतिन यांच्या संदर्भा सुद्धा भविष्यवाणी केली होती. ती आता सध्या फार चर्चेत आली आहे.
पुतिन बनतील सर्वाधिक शक्तिशाली व्यक्ती- बाबा वेंगा
बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीनुसार रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन जगातील सर्वाधिक शक्तिशाली व्यक्ती बनतील. तसच रशिया जगावर हुकूमत गाजवेल. भविष्यवाणी करताना बाबा वेंगानी असे ही म्हटले होते की, सर्व बर्फाप्रमाणे वितळेल मात्र केवळच एक गोष्ट यापासून बचावेल आणि ती म्हणजे व्लादिमीर यांचा गौरव, रशियाचा गौरव. त्यांनी म्हटले होते की, बहुतांश लोक शिकार होतील पण रशियाला कोणीही थांबवू शकत नाही. त्यांच्या द्वारे सर्व रस्ते बंद केले जातील आणि त्यांना कोणीच थांबवू शकणार नाही. जर जगाचा स्वामी Lord Of the World सुद्धा होतील.
रशिया बनेल जगातील शक्तिशाली देश
रिपोर्ट्सनुसार, आपल्या मृत्यूपूर्वी बाबा वेंगाने (Baba Vanga) रशिया संदर्भात ही भविष्यवाणी केली होती. त्यांनी असे म्हटले होते की, रशिया हा एकमेव शक्तिशाली देश असेल. त्यांना परमाणू हत्यांराचा वापर आणि तिसऱ्या विश्व युद्धाबद्दल ही एक भविष्यवाणी केली होती. तर रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या ७ महिन्यांपेक्षा अधिक काळ युद्ध सुरु आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सुद्धा काही वेळा परमाणू हल्ल्याची धमकी सुद्धा दिली आहे.
हे देखील वाचा- जेव्हा अणू करारासाठी मनमोहन सिंहांना आपल्याच पक्षाकडून मिळाला होता विरोध, पण…
वयाच्या १२ व्या वर्षात गेले होते बाबा वेंगांचे डोळे
बाबा वेंगांचा जन्म बुल्गेरियात १९११ मध्ये झाला होता. त्यांच्याकडे भविष्य पाहण्याची शक्यती होती. मात्र ते पाहू शकत नव्हते कारण वयाच्या १२ व्या वर्षातच त्यांनी त्यांचे डोळे एका दुर्घटनेत गमावले होते. ते डोळ्यांनी पाहू शकत नव्हते पण त्यांच्याकडे असलेल्या विशेष शक्तीमुळे ते भविष्य पाहू शकत होते.