मध्य प्रदेशातील ग्लालियर फोर्ट आपल्या सौंदर्यामुळे खुप प्रसिद्ध आहे. त्याचसोबत असे म्हटले जाते की, हा भारतातील सर्वाधिक मोठा तिसरा किल्ला आहे. याच्या भव्यतेबद्दल काही कथा आणि तथ्य सुद्धा आहे. मात्र या भव्यतेच्या कथांसह किल्ल्याचे एक रहस्य सुद्धा आहे. हे रहस्य ग्वालियर मधील त्या खजिन्याचे आहे ज्याबद्दल विविध कथा प्रचलित आहे. खजिन्यासंदर्भात असे म्हटले जाते की, खजान्यामध्ये खुप मौल्यवान सामान आहे. मात्र तो खोलणे फार मुश्किल आहे. त्यामुळेच तो आतापर्यंत खोलण्यात आलेला नाही.(Gwalior Fort Treasure)
काय आहे खजिन्याची खासियत?
ग्वालियर मधील किल्ल्यातील ज्या खजिन्याबद्दल असे सांगण्यात येते की, त्याचे नाव गंगाजली आहे. असे म्हटले जाते की, सिंधियाचे महाराजांनी या खजिन्यात करोडो रुपयांचा खजिना ठेवला होता. काही रिपोर्ट्समध्ये असे सांगण्यात आले होते की, हा खजिना खोलण्याची पद्धत आणि त्याबद्दल फक्त महाराजा जयाजीराव सिंधिया यांना सुद्धा माहिती नव्हते. त्यांनी हा खजिना इंग्रजांपासून गुप्त ठेवला होता आणि आज सुद्धा तो गुप्तच आहे. तसेच तो कोणीही खोलू शकत नाही.

खजिन्याचा एक हिस्सा सापडला
खजिन्याबद्दल कोणालाही माहिती नव्हते, परंतु खजिन्याच्या एख हिस्सा माधवराज सिंधिया यांना मिळाला होता. अशा प्रकारच्या कथा प्रचलित आहेत की, माधवराज सिंधिया एकदा महलात फिरत होते आणि त्यांना धक्का बसला आणि त्यांना खांबाच्या मागे लपवण्यात आलेल्या खजिन्याबद्दल कळले. अशाप्रकारे रहस्यमयी खजिन्यासंदर्भात कळले होते. या खजिन्यात खुप सोनं-नाणी आणि चांदी मिळाली होती. मात्र याचा एक हिस्सा आजवर कोणालाही सापडलेला नाही.(Gwalior Fort Treasure)
हे देखील वाचा- विष्णुपद मंदिर: या मंदिरात राम – सीतेने केलं होतं पिंडदान…
दुसऱ्या खजिन्याचे सीक्रेट काय?
जर दुसऱ्या खजिन्याबद्दल बोलायचे झाल्यास तर त्याबद्दल कळलेले नाही. त्यानंतर काही महाराजांनी दुसऱ्या खजिन्यांचा शोध ही लावला पण तेव्हा ही काही कळले नाही. मात्र या संदर्भात विविध कथा आहेत. त्यानुसार एकदा ज्योतिषीसह ते खजिना शोधण्यासाठी गेले होते परंतु त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर पुन्हा या खजिन्याचा शोध घेतलाच नाही. नंतक खजिना तसाच राहिला. माधवराज सिंधिया द्वितीय सुद्धा याचा शोध घेण्यास अयशस्वी झाले. आता असे म्हटले जाते की, दुसऱ्या खजिन्यात खुप धन आहे. पण तो अद्याप मिळालेला नाही. या व्यतिरिक्त तो मिळाल्यानंतर खोलणे सुद्धा मुश्किलीचे असणार आहे.