Home » सणासुदीत खाद्यपदार्थांचा आस्वाद घेताय..? वजन वाढू नये म्हणून अशी घ्या काळजी

सणासुदीत खाद्यपदार्थांचा आस्वाद घेताय..? वजन वाढू नये म्हणून अशी घ्या काळजी

by Team Gajawaja
0 comment
Diet management
Share

सण म्हटलं की, पंचपक्वान्न आलीच. मात्र या आहारात कॅलरीज, फॅट, शुगर आणि मिठाचं प्रमाण अधिक प्रमाणात असतं. सणासुदीच्या वेळी स्वादिष्ट जेवणाकडे विशेष कल असतो. पण आपल्याला आरोग्यासाठी हा दृष्टीकोन बदलायला हवाच, नाही का? 

खरंतर हीच ती वेळ असते की, आपण आपल्या आहाराकडे आणि आपल्या शरीराकडे लक्ष दिले पाहिजे. आपल्याला सुदृढ राहायचं असेल, तर जंक फुड, स्वादिष्ट खाणं कमी केलं पाहिजे आणि आपलं शरीर कसं नियंत्रित राहील याची काळजी घेतली पाहिजे. सणासुदीच्या काळात एकाच वेळेस भरपूर खाणं टाळलं पाहिजे. आपल्या आहाराचा समतोल बिघडू नये यासाठी हे खूप आवश्यक आहे.(Diet management)

खाद्यपदार्थांचा आस्वाद घेताना सहा अतिशय सोप्या गोष्टी नक्की लक्षात ठेवा:

१.संयम 

हा आहार नियोजनाचा प्रमुख मंत्र आहे. आपल्याला सणासुदीचा आनंद घ्यायचा असेल, तर खाण्यावर संयम ठेवला पाहिजे. एखादी चटपटीत डिश समोर आली, तर आपण लगेच ती पूर्ण डिश संपवून मोकळे होतो. पण असं न करता आपण एखाद दुसरा चमचा खाल्ल पाहिजे. आपण किती खाल्ले पाहिजे यावर नियंत्रण ठेवणे हे गरजेचे असते.(Diet management)

२.सात्विक आहार

किमान दिवसातून एकदातरी सात्विक आहाराचे सेवन करायला पाहिजे. यामुळे शरीरातील अधिकच्या कॅलरीज संतुलित राहण्यास मदत होते. सात्विक आहार म्हणजे फळे, भाज्या, कोशिंबीर इ. दिवसभरात एकदातरी हा आहार सेवन  केला तरी आपल्याला आपले वजन नियंत्रणात ठेवता येते.

३. मीठ 

सणादरम्यान बनवलेल्या स्वादिष्ट पदार्थामध्ये मिठाचे प्रमाण जास्त असते. विश्वसनीय ब्रँडचे कमी सोडियम असलेले मीठ तुम्ही वापरू शकता. या मिठामध्ये रिफाईंड आयोडाइज्ड मिठापेक्षा 15% ते 30% कमी सोडियम असते.(Diet management)

========

हे देखील वाचा गुडघे दुखत असतील तर ‘ही’ योगासनं देतील आराम

========

४.कर्बोदके 

कर्बोदकांचे प्रमाण जास्त असलेले खाद्यपदार्थ एकामागोमाग एक खाल्ले जाणे हेही चुकीचे आहे. तुमच्या आहारामध्ये प्रथिनांचे प्रमाण जास्त असलेल्या पदार्थांचा वापर करा. प्रत्येक आहारामध्ये किंवा स्नॅक्समध्ये प्रथिने व त्यासोबत कॉम्प्लेक् कार्बोहायड्रेट्स असे मिश्रण असलेलेच पर्याय निवडा.(Diet management)

५. अल्कलाईन खाद्यपदार्थ

सणासुदीचे जेवण पचायला खूप जड असते, यामुळे आपल्या आतड्यांचे संतुलन बिघडते. त्यामुळे आहारामध्ये अल्कलाईन खाद्यपदार्थांचा जाणीवपूर्वक समावेश करून पोटाचा पीएच योग्य राखता येतो. यामध्ये लिंबू खूप उपयुक्त ठरू शकते. आहारामध्ये हिरव्या पालेभाज्या आणि  फळांचा समावेश करा. तसंच आहारामध्ये साखरेच्या प्रमाणावर मात  करण्यासाठी दररोज थोडी दालचिनीचा समावेश केला तर नियत्रंण राहण्यास मदत होते.

६.नियमितपणे, भरपूर पाणी प्या

दररोज कमीत कमी सात ते दहा ग्लास भरून पाणी  पिणं गरजेचं आहे. यामुळे शरीरातील विषद्रव्ये कमी होतात व तुमच्या शरीरातून सहजपणे बाहेर निघून जातात.(Diet management)


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.