Home » आलियाआधी रणबीर कपूर होता या बड्या अभिनेत्रींच्या प्रेमात

आलियाआधी रणबीर कपूर होता या बड्या अभिनेत्रींच्या प्रेमात

by Team Gajawaja
0 comment
Ranbir Kapoor
Share

रणबीर(Ranbir Kapoor) आणि आलिया मागील बऱ्याच काळापासून रिलेशनशिपमध्ये आहेत. आज जरी रणबीर आलिया लग्नबंधनात अडकत असले तरी आलिया रणबीरचे पहिले प्रेम नाही. याआधी त्याचे नाव अनेक मोठमोठ्या अभिनेत्रींसोबत जोडले गेले आहे. जाणून घेऊया रणबीरच्या अफेयर्सबद्दल.

सोनम कपूर:

रणबीर कपूर आणि सोनम कपूर यांनी एकत्र एकाच सिनेमातून बॉलिवूडमध्ये पाऊल टाकले. संजय लीला भन्साळी यांच्या ‘सांवरिया’ सिनेमातून या दोघांनी एकत्रच पदार्पण केले. या सिनेमाच्या सेटवर रणबीर आणि सोनम जवळ आले आणि त्यांच्या नात्याला सुरुवात झाली. मात्र थोड्या काळातच त्यांचे नाते संपुष्टात आले. 

दीपिका पदुकोण:

बॉलिवूडमध्ये सर्वात जास्त गाजलेल्या प्रेमप्रकरणांपैकी एका प्रकरण म्हजे दीपिका आणि रणबीर. दीपिका आणि रणबीर (Ranbir Kapoor) अनेक काळ एकत्र होते, त्यांचे नाते लग्नापर्यंत जाईल असे वाटत असतानाच त्यांचे ब्रेकअप झाले.

कॅटरिना कैफ:

‘अजब प्रेम की गजब कहाणी’ या सिनेमाच्या शूटिंग दरम्यान रणबीर आणि कॅटरिना जवळ आले. सिनेमा हिट झाला आणि दोघांच्या जोडीला प्रेक्षकांनी देखील पसंत केले. तेव्हा रणबीर (Ranbir Kapoor) दीपिकाला डेट करत होता, मात्र कॅटरिना आणि त्याच्यात नवीन नाते खुलले आणि त्याने दीपिकासोबत ब्रेक अप केले. पुढे रणवीर- कतरिनाचे लग्नापर्यंत जाणारे नातेही मधेच तुटले. 

नर्गिस फाखरी:

रणबीर कपूर आणि नर्गिस फाखरी यांनी ‘रॉकस्टार’ सिनेमात एकत्र काम केले. या सिनेमाच्या शूटिंगच्या वेळी रणबीर आणि नर्गिस यांच्यात जवळीक निर्माण झाली आणि दोघांनी डेट करणे सुरु केले. कॅटरिना कैफसोबत ब्रेकअपचे कारण म्हणजे रणबीरच्या नर्गिससोबतची जवळीक, असंही म्हटलं जातं. 

=============

हे देखील वाचा करिअर ऐनभरात असताना पडद्यावरुन गायब झाली होती आएशा कारण…

=============

प्रियांका चोप्रा:

रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि प्रियांका चोप्रा यांनी ‘अंजाना अंजानी’ सिनेमात काम केले. या सिनेमासोबत त्यांचे नाते सुरु झाले आणि चित्रपट संपला तसे नाते देखील संपले.

श्रुती हसन:

एका रिपोर्टनुसार रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि श्रुती हसन यांनी देखील एकमेकांना डेट केले आहे. एका जाहिरातीच्या शूटिंग दरम्यान ते दोघं जवळ आले होते मात्र त्यांच्या नात्यावर कोणीही कोणतेच वक्तव्य केले नाही. 


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.