टाटा सन्सचे माजी अध्यक्ष साइरस मिस्री यांचे निधन झाल्यानंतर रस्त्यांच्या सुरक्षिततेसंदर्भात नियमांबद्दल जोरदार चर्चा सुरु झाल्या आहेत. अशातच नियमांमध्ये बदल केले जाणार आहेत. केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी कार मध्ये असलेल्या सहप्रवाशाने सुद्धा सीट बेल्ट लावणे गरजेचे असते असे म्हटले आहे. त्याचसोबत जर कारमध्ये मागील बाजूस असलेल्या सीटवर ही बसणाऱ्यांनी बेल्ट लावला नसेल तर त्यांना दंड भरावा लागणार आहे. आता कारमध्ये प्रत्येक व्यक्तीला सील्ट बेल्ट लावणे गरजेचे असणार आहे. (Seat belt rules)
असे सांगितले जात आहे की, पुढील तीन दिवसांमध्ये केंद्र सरकारच्या परिवहन मंत्रालयाकडून आदेश जाहीर केले जाणार आहेत. मात्र असे नव्हे की हे नियम पहिल्यांदाच आले आहे. खरंतर सीट बेल्ट लावण्यासंदर्भातील नियमाचा यापूर्वी सुद्धा उल्लेख केला गेलेला आहे. तर जाणून घेऊयात सील्ट बेल्ट संदर्भातील काय आहेत नियम.
आधीपासूनच आहे हा नियम
आता कार मध्ये बसलेल्या प्रत्येक व्यक्तीला सीट बेल्ट लावण्यासंदर्भातील नियमाबद्दल बोलले जात आहे. मात्र हा नियम जूनाच आहे. फक्त फरक ऐवढा आहे की, त्याबद्दल पोलिसांकडून चलान कापले जात नाही. जर नियमानुसार पाहिल्यास केंद्रीय मोटार वाहन अधिनियम १९८९ नुसार, चारचाकी वाहनात प्रत्येक प्रवाशाने सीट बेल्ट लावणे अनिवार्य आहे. मात्र आता सुद्धा फक्त चालक आणि त्याच्या बाजूला बसलेला सहप्रवासी सीट बेल्ट लावतो.
अनिवार्य तरीही पोलिसांकडून चालान का कापले जात नाही?
एका वृत्तपत्रात छापण्यात आलेल्या रिपोर्टमध्ये एडीडी ट्रॅफिकच्या हवाल्यामध्ये असे सांगितले की, चारचाकी वाहनांमध्ये सर्व प्रवाशांना सीट बेल्ट लावणे अनिवार्य आहे. परंतु पुढील सीटवर बसलेल्यांनी सीट बेल्ट लावला नसेल तर चलान कापले जाते. परंतु नियमात हे स्पष्ट करण्यात आलेले नाही की, मागील सीटवर बसणाऱ्यांवर ही कारवाई करावी की नाही.(Seat belt rules)
हे देखील वाचा- सायरस मिस्रीच नव्हे तर ‘या’ प्रसिद्ध व्यक्तींचा सुद्धा रस्ते अपघातात झालायं मृत्यू
२००२ पासून प्रत्येक गाडीमध्ये गरजेचे
दरम्यान, १ ऑक्टोंबर २००२ नंतर बनवण्यात आलेल्या गाड्यांसाठी सुद्धा अनिवार्य करण्यात आले आहे की, सीट बेल्टची व्यवस्था असावी. ऐवढेच नव्हे तर आठ सीटर गाडीमध्ये सुद्धा सर्व प्रवाशांसाठी सीट बेल्ट असावा. नियमांनुसार, फ्रंट फेसिंग सर्व सीटसाठी सीट बेल्ट असणे गरजेचे आहे आणि प्रवाशाने तो लावणे अनिवार्य आहे.