इंस्टाग्रामवर लहान मुलांच्या डेटा सुरक्षिततेसंदर्भात छेडछाड केल्याच्या कारणास्तव आयरलँन्डच्या डेटा खासगी नियामकने या सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्मवर ३१.७ अरब रुपयांचा दंड ठोठावला आहे. खरंतर इंन्स्टाग्रामला लहान मुलांच्या खासगी डेटासंबंधित युरोपीय युनियनच्या डेटा पॉलिसच्या नियमांचे उल्लंघन केल्यामध्ये दोषी पकडले आहे. त्यामुळेच त्यांच्यावर ऐवढ्या मोठ्या रक्कमेचा दंड ठोठावण्यात आला आहे. आयरलँन्डच्या डेटा संरक्षण आयोगाने सोमवारी ईमेल पाठवून असे सांगितले की, गेल्या आठवड्यातच कंपनीने ४०२ मिलियन डॉलरचा दंड ठोठावण्यासंदर्भात अंतिम निर्णय घेतला होता.(Instagram fined $400 million)
दंड सुनावल्यानंतर इंस्टाग्रामची पॅरेंट कंपनी मेटाने असे म्हटले होते की, संपूर्ण प्रकरणाच्या तपासादरम्यान त्यांना पूर्णपणे मदत केली जाईल. दरम्यान, मेटाने असे म्हटले आहे की, ऐवढा मोठा दंड भरण्याबद्दल आम्ही सहमत नाहीत. याच्या विरोधात आम्ही अपील करणार आहोत.आयरिश वॉचडॉगच्या तपासात असे समोर आले की, इंस्टाग्रामने १३ ते १७ वर्षाच्या वयोगटातील मुलांचा खासगी डेटा सार्वजनिक रुपात लीक केला. त्यामध्ये त्यांचे फोन क्रमांक आणि ईमेल अॅड्रेसचा समावेश होता. तर इंस्टाग्राम वापरण्यासाठी कमीत कमी वय १३ वर्ष असावे लागते.
एका मेटा अधिकाऱ्याने बीबीसी न्यूजला असे सांगितले की, ही चौकशी जुन्या सेटिंग्सवर केंद्रित आहे. जी आम्ही एक वर्षापूर्वीच अपडेट केली आहे आणि तेव्हापासून आम्ही लहान मुलांना सुरक्षित ठेवण्यासाठी आणि त्यांची खासगी सुद्धा सुरक्षितरित्या ठेवण्याच्या मदतीसाठी काही फिचर्स सुद्धा रोलाउट केले आहेत.(Instagram fined $400 million)
हे देखील वाचा- इंटरनेटशिवाय Gmail पाठवण्यासाठी ‘या’ सोप्प्या ट्रिक्स वापरा
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच इंस्टाग्रामच्या नव्या अपडेटनंतर कोणाचेही लोकेशन ट्रॅक करु शकते का? या प्रश्नावर कंपनीने उत्तर दिले होते. सोशल मीडियात लोकेशन ट्रॅक संदर्भात अफवा पसरली गेली होती. त्यावक कंपनीने असे म्हटले होते की, ते युजर्सचे लोकेशन दुसऱ्यांसोबत शेअर करत नाहीत. त्याचसोबत दुसऱ्या सोशल मीडिया कंपन्यांप्रमाणेच ते लोकेशन टॅग आणि मॅप फिचर्स सारख्या गोष्टींसाठी परफेक्ट लोकेशनचा वापर करतात. इंस्टाग्रामचे असे म्हणणे आहे की, युजरला आपल्या डिवाइस सेटिंग्सच्या माध्यमातून लोकेशन सर्विसला मॅनेज करता येऊ शकते. तर त्यांना त्याबद्दल माहिती शेअर करायची असल्यास ते आपल्या पोस्टमध्ये लोकेशन टॅग करु शकतात.
कंपनीने स्पष्ट केले होते की, Precise Location हे आयओएस आणि अॅन्ड्रॉइडमध्ये एक सिस्टिम लेव्हल सेटिंग आहे आणि ते अशा अॅपसाठी लागू होतात जे लोकेशन डेटाचा वापर करतात. तर PC मॅगझिनच्या एका रिपोर्टमध्ये असे सांगण्यात आले होते की, Precise Location सुविधा ही काही नवी गोष्ट नाही. अॅप्पलने २०२० मध्ये ते आणले होते. तर गुगलने त्याला अॅन्ड्रॉइड १२ सोबत लॉन्च केले होते.