टाटा सन्सचे माजी अध्यक्ष साइरस मिस्री यांचे रविवारी रस्ते अपघातात निधन झाले. तर पालघर जवळ हा अपघात झाल्याचे वृत्त समोर आले. प्रवासादरम्यान साइरस यांच्यासह अन्य चार जण सुद्धा होते. साइरस यांच्यासह आणखी एकाचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. दोन जण जखमी झाले आहे. मात्र रस्ते अपघातासंदर्भात बोलायचे झाल्यास साइरस मिस्री यांच्याव्यतिरिक्त सुद्धा अन्य काही प्रसिद्ध व्यक्तींचा सुद्धा रस्ते अपघातात (Road accident) मृत्यू झाला आहे. तर त्याच बद्दल आपण आज अधिक जाणून घेऊयात.
-दीप सिद्धू
यंदाच्याच वर्षात फेब्रुवारी महिन्यात प्रसिद्ध पंजाबी अभिनेता दीप सिद्धू याचा केएमपी एक्सप्रेसवर अपघातात मृत्यू झाला. तर टोल प्लाझाला त्याची गाडी धडकली असता त्याचा जागीच मृत्यू झाला. गाडीमध्ये तेव्हा त्याची होणारी पत्नी सुद्धा होती मात्र ती जखमी झाली. लाल किल्ल्यावर झेंडा फडकवल्यानंतर तो शेतकरी आंदोलनाच्या वेळी अधिक चर्चेत आला होता.
-निर्वैर सिंग
प्रसिद्ध पंजाबी गायक निर्वैर सिंग याचे ऑगस्ट महिन्या अखेरीस ऑस्ट्रेलियात एका रस्ते अपघातात मृत्यू झाला. तो मूळचा पंजाब मधील कुरळीतील वॉर्ड-७ मध्ये राहणारा होता. निर्वैर सिंग याने आपल्या गायनाच्या करियरची सुरुवात ऑस्ट्रेलियातून केली होती. तर ९ वर्षांआधीच ऑस्ट्रेलियात तो राहण्यासाठी गेला होता.(Road accident)
हे देखील वाचा- या लोकप्रिय राजकीय नेत्यांचा झाला होता अपघाती मृत्यू

-जसपाल भट्टी
कॉमेडीचा बादशहा म्हणून ओळखल्या जाणाऱअया जसपाल भट्टी यांचा २०१२ मध्ये ऑक्टोंबर महिन्यात एका रस्ते अपघातात मृत्यू झाला. या अपघातावेळी त्यांचा मुलगा ही जखमी झाला होता. एका आगामी सिनेमाच्या प्रमोशनासाठी ते मोगाहून पंजाब येथील जालंधर येथे जात होते. त्याचवेळी हा अपघात झाला आणि जसपाल भट्टी यांचा मृत्यू झाला. पण मुलगा या अपघातात बचावला होता.
-ईश्वरी देशपांडे
मराठी चित्रपटातील अभिनेत्री ईश्वरी देशपांडे हिचा गेल्या वर्षात सप्टेंबर महिन्यात गोव्यात कार अपघातात मृत्यू झाला होता. बारदेझ तालुक्याजवळील अरपोरा नावाच्या परिसरात ही घटना घडली होती. ईश्वरी हिच्यासोबत असलेला तिचा मित्र याचा सुद्धा अपघातानंतर जागीच मृत्यू झाला होता. त्यांची गाडी बागा खाडीच्या पाण्यात कोसळली गेली होती.
-गायत्री उर्फ डॉली डिक्रुज
तेलगू अभिनेत्री गायत्री उर्फ डॉली डिक्रुज याचा मार्च महिन्यात डिवाइडरला धडकून मृत्यू झाला होता. अपघातानंतर तिचा जागीच मृत्यू झाला. तर तिचा मित्र याने एका खासगी रुग्णालयात आपला जीव सोडला.