Home » मिस्री विरुद्ध टाटा यांच्यातील ‘या’ वादांमुळे जेव्हा कॉर्पोरेट क्षेत्रावर झाले होते परिणाम…

मिस्री विरुद्ध टाटा यांच्यातील ‘या’ वादांमुळे जेव्हा कॉर्पोरेट क्षेत्रावर झाले होते परिणाम…

by Team Gajawaja
0 comment
Mistry vs Tata
Share

जर कॉर्पोरेटच्या जगातील वादांसंदर्भात बोलायचे झाल्यास साइरस मिस्री विरुद्ध रतन टाटा यांच्यामधील वाद सर्वाधिक मोठा होता. या दोघांमध्ये काही वर्ष वाद सुरु होता. रतन टाटा आणि राइरस मिस्री यांच्या मधील इंटरनली झालेल्या भांडणाला इतिहासातील सर्वाधिक मोठा वाद असल्याचे मानले जाते. लाख प्रयत्न आणि वाद दूर करण्याचा ही प्रयत्न करण्यात आला तरीही त्यांमध्ये काही तोडगा निघाला नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या दोन्ही पक्षांत या गोष्टीवरुन वाद सुरु होता की, टाटा ग्रुपसाठी दान कसे करावे, कोणते प्रोजेक्ट आणि कोणत्या प्रोजेक्टमध्ये गुंतवणूक करावी आणि टाटा ग्रुपला अमेरिकेतील फास्ट फूड चेन सोबत संबंध प्रस्थापित करायचे आहेत का अशा मुद्द्यांवरुन मतभेद आणि वाद होत राहिले. या गोष्टींवरुन वाद खुप विकोपाला गेला आणि पुढे जाऊन स्थिती ऐवढी बिघडली की, हे प्रकरण सुप्रीम कोर्टात पोहचले गेले. (Mistry vs Tata)

पल्लोनजी मिस्री यांचा मुलगा साइरस मिस्रीने २०१२ मध्ये टाटा सन्सच्या ग्रुपच्या चेअरमन पदाचा कारभार सांभळण्यास सुरुवात केली. मात्र रतन टाटांना हटवून त्या जागी त्यांना बसण्यात आले होते. दरम्यान, वर्ष २०१६ मध्ये मिस्री यांना अचानक चेअरमनच्या पोस्टवरुन हटवण्यात आले. तेव्हापासून टाटा ग्रुपसह त्यांच्यामध्ये दूरावा आणि भांडण सुरु होती. टाटा ग्रुपने मिस्री यांच्या मालकीचे हक्क असलेले एसपी ग्रुपचे शेअर खरेदी आणि त्यांना टाटा सन्समध्ये एकत्रित करण्याची ऑफर दिली होती. मात्र मिस्री परिवाराने त्याचा स्विकार केला नाही. हे प्रकरण अखेर कोर्टात पोहचले. तेथे निर्णय हा रतन टाटा यांच्या बाजूने घेतला गेला होता. मिस्री परिवाराच्या एसपी ग्रुपवर खुप कर्ज आहे. त्यांनी टाटा सन्सचे काही शेअर्स सुद्धा गहाण ठेवले आहेत.

Mistry vs Tata
Mistry vs Tata

मोठं घराणं, मोठा वाद
ज्या गोष्टींवरुन वाद सुरु होता त्यामध्ये दान हे सुद्धा एक प्रकरण आहे. मोठंमोठी कॉर्पोरेट घरणे राजकीय दान देतात आणि ही आधीपासूनच दस्तूर आहे. टाटा सन्सच्या बाबतीत ही हिच गोष्ट आहे. ओडिशाच्या एका दानाप्रकरावरुन मिस्री आणि रतन टाटा यांच्यामधील वाद अधिक वाढला. काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असे सांगितले गेले की, साइरस मिस्री यांच्या एका निकटवर्तीयाने २०१४ मध्ये ओडिशाच्या विधानसभा निवडणूकीत १० कोटी रुपये दान देण्याचा सल्ला दिला होता. मिस्री यांच्या गटाचे असे मत होते की, ओडिशामध्ये लोह अधिक असून त्याचा फायदा घेतला जाऊ शकतो. परंतु रतन टाटा यांच्या बोर्डने या मताच्या विरोधात जाऊन आपले मतं मांडले.

टाटा-वेलस्पन डीलचे प्रकरण
आणखी एक प्रकरण म्हणजे टाटा-वेलस्पन डील. असे सांगितले जाते की, साइरस मिस्री यांनी टाटा टाटा वेलस्पनची डील केली होती. मात्र याची माहिती टाटा सन्सच्या बोर्डाला दिली नाही. टाटा सन्स बोर्डाने त्याला कॉर्पोरटच्या नियमांचे उल्लंघन असल्याचे म्हटले, कारण ही डील ऐवढी मोठी होती की ती बोर्डाला सांगितल्याशिवाय पुढे जाऊच शकत नाही. मात्र साइरस मिस्री यांनी तसे केले नाही. या प्रकरणावरुन ही साइरस मिस्री आणि रतन टाटा यांच्यामधील दूरावा अधिक वाढला. सर्वाधिक खास गोष्ट अशी की, टाटा सन्सला वेलस्पन डील संदर्भात माहिती मिळण्यापूर्वी मीडियामध्ये ही गोष्ट पोहचली होती. यावरुन टाटा सन्सने नाराजी व्यक्त केली होती. मात्र नंतर सुर्वणमध्य काढत तोडगा काढला गेला.(Mistry vs Tata)

हे देखील वाचा- एक काळ असा होता जेव्हा रतन टाटा यांचे निकटवर्तीय होते साइरस मिस्री

या’ अमेरिकन कंपनीमुळे वाद चिघळला
पुढचा वाद असा की, अमेरिकन फास्ट फूड कंनी लिटिल कॅसर्ससोबत टाटा कंपनीचे टायअप. साइरस मिस्री यांच्या नेतृत्वाखालील बोर्डाने अमेरिकन फास्ट फूड कंपनी सोबत टाइअप करण्याची योजना बनवली. परंतु ही गोष्ट टाटा सन्स बोर्डाच्या समोर ठेवण्यात आली नाही. टाटा सन्सचे असे म्हणणे होते की, त्यांची एखादी कंपनी अशा प्रकारचे निर्णय घेऊ शकत होती. टाटा सन्सने असे सुद्धा म्हटले की, अशाप्रकारच्या दूराव्यामुळे कंपनीच्या प्रतिमेला डाग लागू शकतो. मिस्रीच्या सहकार्यांचा असा तर्क होता की, टाटा ग्रुप आधी पासूनच कॉफी चेन स्टारबक्स सोबत जोडला गेला होता. त्यामुळेच फास्ट फूड कंपनी सोबत बिझनेस डील करणे काही वाईट नाही. अशाच प्रकारचा एक वाद टाटा आणि डोकोमो मध्ये राहिला जो नंतर दिल्ली हायकोर्टापर्यंत पोहचला गेला.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.