Home » पंतप्रधान मोदी यांनी अहमदाबादमध्ये जो चरखा चालवला त्याचा बगदादशी काय संबंध?

पंतप्रधान मोदी यांनी अहमदाबादमध्ये जो चरखा चालवला त्याचा बगदादशी काय संबंध?

by Team Gajawaja
0 comment
PM Modi in Ahmadabad
Share

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन दिवसाच्या अहमदाबादच्या दौऱ्यावर आहे. साबरमती रिवरफ्रंटवर आयोजित करण्यात आलेल्या खादी उत्सवात ते सहभागी झाले. या उत्सावाचे सेलिब्रेशन करण्यात आलेच पण ७५०० खादी कारागिर महिलांनी सुद्धा त्यावेळी चरखा चालवला. त्यांनी लोकांना आपल्या घरात सुद्धा खादीचे कापड असावे असे अपील केले. खरंतर भारतातील चरख्याचा इतिहास फार जुना आहे. हा चरखा देशात झालेल्या आंदोलनाचे प्रतीक बनला. महात्मा गांधी यांचा चरखा त्यावेळी इंग्रजांच्या हुकूमशाहीच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी कामी आला होता. मात्र त्याचे कनेक्शन बगदादशी आहे. याच बद्दल आपण आज अधिक जाणून घेऊयात.(PM Modi in Ahmadabad)

चरख्याचे बगदादशी कनेक्शन
भारतात चरख्याची एन्ट्री स्वदेशी आंदोलनाच्या सुद्धा आधी झाली होती. गुगलचा आर्ट अॅन्ड कल्चर ब्लॉगच्या रिपोर्ट्सनुसार, चरख्याचा उगम १२०० ईसीवी सन मध्ये झाला होता. ऐतिहासिक प्रमाण असे सांगतात की. चरख्याचा वापर करण्याची प्रथम सुरुवात बगदाद मध्ये झाली होती. त्याचे नाव पर्शियन भाषेत शब्द चर्ख यावरुन ठेवण्यात आले होते. त्याचा अर्थ चक्र किंवा व्हिल.

१८ व्या शतकात औद्योगिक क्रांतीपूर्वी चरख्याचा वापर घरातील महिला कपडे तयार करण्यासाठी करायच्या. त्यानंतर जगातील बहुतांश देशांमध्ये त्याचा वापर होऊ लागला. बगदाद पासूनच चरखा भारत आणि चीनमध्ये पोहचला होता. तेथूनच तो वापरण्याची प्रथा सुरु झाली. चरख्याचे सर्वात प्रथम जे मॉडेल होते त्याला फ्लोर चरखा असे म्हटले जात होते. लाकडापासून तयार करण्यात आलेल्या त्या चरख्याला जमिनीवर ठेवले जात होते आणि त्याच्या मागे बसून व्यक्ती हाताने चालवत सूत काढायचा. त्यानंतर त्यामध्ये बदल झाले आणि तो नंतर पेटीच्या रुपात निर्माण झाला.

PM Modi in Ahmadabad
PM Modi in Ahmadabad

असे म्हटल जाते की, त्याला पेटीत रुपांतर करण्याचे श्रेय हे महात्मा गांधी यांना जाते. त्यांना चरख्याला एका बॉक्समध्ये ठेवण्याचा ट्रेंन्ड सुरु केला होता. जो अगदी सहजपणे कुठेपण घेऊन जाता येत होता. त्यांनी याची सुरुवात १९३० मध्ये पुण्यातील येरवडा तुरुंगात राहत असताना केली होती.

हे देखील वाचा- राजीव गांधी ….. पायलट ते पंतप्रधान

जेव्हा चरखा उद्योगाचे मशीनमध्ये रुपांतर झाले
१७ व्या शतकात चरखा औद्योगिक घराण्यांसाठी काम करणाऱ्या मशीन प्रमाणे झाला होता. त्याची गरज पाहता त्यांनी त्याला अधिक उत्तम बनवण्यासाठी काही बदल केले. सामान्य चरख्याचे मोडिफिकेशन सुद्धा करण्यात आले. ब्रिटिश सरकारला हे अजिबात आवडले नाही. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने भारताला आपले महागडे, औद्योगिक उत्पादनांच्या वस्रांसाठी एका बाजाराच्या रुपात वापर करण्यास सुरुवात केली. ते कमी किंमतीत कापूस खरेदी करत होते आणि त्याचा वापर आपल्या फायद्यासाठी करायचे. (PM Modi in Ahmadabad)

अशा पद्धतीने चरखा बनला देशातील आंदोलनाचे प्रतीक
इंग्रजांचे सरकार पाडण्यासाठी महात्मा गांधी यांनी स्वदेशी आंदोलन सुरु केले. विदेशी वस्तूंवर बहिष्कार टाकण्यास सुरुवात केली. या आंदोलनादरम्यान ब्रिटिश कपड्यांचा विरोध करत स्थानिक स्तरावर कपडे तयार करण्याची रणनीति तयार करण्यात आली. या दरम्यान, चरख्यापासून तयार करण्यात आलेले कपडे घालण्यास सुरुवात झाली. हे आंदोलन इंग्रजांसाठी एक मोठा झटका होता.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.