सनातन धर्मात पूजेदरम्यान काही गोष्टी देवाला अर्पण केल्या जातात. त्यामध्ये श्रीफळाला एक विशेष महत्व आहे. काही विधिंमध्ये तर श्रीफळाशिवाय पूजा अपूर्ण राहिल्याचे मानले जाते. अशी मान्यता आहे की, श्रीफळाचा नैवेद्य देव ग्रहण करतात आणि प्रसन्न होऊन भक्तांना आशीर्वाद देतात. या व्यतिरिक्त कोणतेही नवं शुभ कामं करताना श्रीफळ फोडण्याची प्रथा आहे. मात्र धार्मिक कार्यांमध्ये श्रीफळालाच का ऐवढे महत्व दिले जाते? जाणून घेऊयात याचबद्दल आज अधिक.(Coconuts-Symbol of Indian rituals)
श्रीफळ अर्पण करण्यामागे विविध मान्यता आहेत. असे म्हटले जाते की, भगवान विष्णू जेव्हा पृथ्वीतलावर अवतरणार होते तेव्हा देवी लक्ष्मीसह श्रीफळाचे झाड आणि कामधेनु या दोघांना घेऊन आले होते. त्यामुळे ते भगवान विष्णूला अतिप्रिय आहे. या व्यतिरिक्त काही विद्वानांचे असे मत आहे की, श्रीफळ म्हणजेच नारळ असा कल्पवृक्ष आहे ज्याचा उल्लेख शास्रांमध्ये केलेला दिसतो. कल्पवृक्षात ब्रम्ह, विष्णू आणि महेश यांचा वास असतो. त्यामुळेच या वृक्षाचे फळ देवाला अतिप्रिय असते आणि ते अर्पण केल्याने देव प्रसन्न होतात. काही लोक नारळावर आलेल्या तीन डोळ्यांना शंकराचे तीन नेत्र मानतात. त्यामुळे नारळाचा संबंध हे देव-देवतांशी येतो असे दिसते. म्हणूनच त्याला पवित्र असल्याचे मानत देवाला अर्पण केला जातो.
नारळ फोडून केले जाते शुभं काम
हिंदू धर्मात विविध परंपरा पौराणिक काळापासून चालत आल्या आहेत. याच परंपरेमधील नरबळी ही सुद्धा एक परंपरा आहे. असे मानले जाते की, जुन्या काळात साधक आपली साधना पूर्ण करण्यासाठी आणि आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी नरबळी द्यायचे. त्यानंतर ही प्रथा बंद करण्यात आली आणि नरबळी ऐवजी नारळ दिला जाऊ लागला. कारण नारळाला नराचे प्रतिक मानले जाते. नारळाचा काथ्याच्या भागाला डोके आणि पाण्याला रक्ताची संज्ञा दिली जाते.(Coconuts-Symbol of Indian rituals)
हे देखील वाचा- श्री कृष्णाशी संबंधित आहे ‘या’ मंदिराचा इतिहास, जाणून घ्या अधिक
मानवाच्या रुपात विश्वामित्रने तयार केला होता नारळ
अशी सुद्धा मान्यता आहेकी, नारळ हा मानव रुपात विश्वमित्र याने तयार केला होता. एकदा ते इंद्र देवावर रागवले आणि दुसऱ्या स्वर्ग लोकाचा निर्माण करु लागले. त्यानंतर त्यांचे मन बदलले आणि ते दुसऱ्या सृष्टीचा निर्माण करु लागले. तेव्हा त्यांनी मानव रुपात नारळाची निर्मिती केली. त्यामुळे नारळाच्या शेंड्याला बाहेरुन दोन डोळे आणि तोंड असल्याची रचना दिसून येते.