सध्याच्या बदलत्या शिक्षणपद्धतीमुळे आता विविध कोर्ससमध्ये करियर करण्याच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे जगभरातील विविध देशात वेगवेगळ्या प्रकारच्या कोर्सेसच्या संधीमुळे आता लोकांच्या ज्ञानात अधिकाधिक भर पडत चालली आहे. अशातच वास्तुशास्र, फेंगश्युई हे सर्व प्रकार आधीपासूनच आपल्याकडे होते. मात्र आता रेकी, ग्राफोलॉजी यासारख्या विविध क्षेत्रात ही आता लोक आपले करियर करताना प्रकर्षाने दिसून येत आहे. सध्या या क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या लोकांना सुद्धा खुप मान दिला जातो. अशातच ग्राफोलॉजी म्हणजे काय? त्या संदर्भातील तज्ञ नक्की काय काम करतात किंवा ग्राफोलॉजी एक्सपर्ट (Graphologist) कशा प्रकारे समोरच्या व्यक्तीला त्याच्या लिखाणावरुन ओळखू शकतो याबद्दलच आपण आज अधिक जाणून घेणार आहोत.
ग्राफोलॉजिस्ट कसे बनाल?
सर्वात प्रथम हे समजून घेणे फार महत्वाचे आहे की ग्राफोलॉजिस्ट कसे बनता येते. यासाठी कोणत्या प्रकारच्या शिक्षणाची आवश्यकता असते. यासाठी कोणते कोर्सेस आहेत की नाही. तसेच ग्राफोलॉजिस्ट बनण्यासाठी मनोवैज्ञानिक रुपात मजबूत व्हावे लागते.
कशा प्रकारे करतात काम?
ग्राफोलॉजी एक्सपर्ट एखाद्याचे हस्ताक्षर, लिहिण्याची पद्धत, शब्दांमधील अंतर किंवा वाकड्या-तिकड्या रेषांचा अभ्यास करतात. हे एक प्रकारचे एखाद्या व्यक्तीचे मनेवैज्ञानिक विश्लेषण असते. ऐवढेच नव्हे तर एखाद्याचे व्यक्तिमत्व बदलायचे असेल तर त्याच्या लिहिण्याची पद्धतीने सुद्धा तसे करता येऊ शकते. त्याचसोबत सध्याच्या बदलत्या लाईफस्टाइलमुळे प्रत्येकाला कोणते ना कोणते टेंन्शन असते. त्यामुळे ओव्हर स्ट्रेस येणे, झोप पूर्ण न होणे, आजार मागे लागणे अशा समस्या उद्भवतात. अशातच तुम्ही ग्राफालॉजी एक्सटपर्टच्या माध्यमातून तुमच्या या समस्यांवर तोडगा काढू शकता. मात्र लक्षात ठेवा ग्राफालॉजिस्ट हे कोणत्याही प्रकारचे डॉक्टर नव्हेत. ते तुमची लिखाणाची पद्धत पाहून तुमच्या व्यक्तीमत्वाबद्दल अधिक स्पष्ट सांगतात हे लक्षात असू द्या.
हे देखील वाचा- परदेशी भाषांमध्ये करियर करायचे असेल तर पुढील काही गोष्टी लक्षात ठेवा

कोर्सेस केल्यानंतर काय पर्याय आहेत?
-कॉर्पोरेट कंपन्या कंन्सल्टं सर्विसच्या रुपात ग्राफोलॉजिस्ट (Graphologist) यांना हायर करतात. त्यांच्या मदतीने ते टॅलेंटेड लोकांची ओळख करतात आणि आपल्या ठिकाणी नोकरीवर ठेवतात.
-फॉरेंसिक तपासाच्या क्षेत्रात ही ग्राफोलॉजिस्ट अत्यंत गरजेचे असतात. ग्राफोलॉजिस्ट क्रिमिनल केस सोडवण्यास मदत करतात. कोर्ट आणि पोलिसांच्या केसेस सुद्धा सोडवण्यासाठी सुद्धा त्यांची मदत घेतली जाते.
-या व्यतिरिक्त युनिव्हर्सिटी किंवा शाळांमध्ये ही शिक्षकांच्या आधारावर ग्राफोलॉजिस्ट यांच्यासाठी एक उत्तम ऑप्शन आहे.
कुठे करता येईल कोर्स?
-हँन्डराईटिंग अॅनालिस्ट ऑफ इंडिया, विशाखापट्टनम
-कोलकाता येथे ग्राफोलॉजी संस्था अॅन्ड एज्युकेशन व डेव्हलमेंट प्रोग्राम
-आंतरराष्ट्रीय ग्राफोलॉजी रिसर्च सेंटर, मुंबई
-ग्राफोलॉजी इंडिया डॉट कॉम, दिल्ली
-बंगळुरु मध्ये यासंदर्भातील बहुतांश महाविद्यालये आणि संस्था आहेत.