Pakistan president death mystery- जगभरातील अशी बहुतांश प्रसिद्ध व्यक्ती आहेत त्यांच्या मृत्यूचे कारण आज ही रहस्य आहे. त्यांच्या मृत्यूसंदर्भात बहुतांश रिपोर्ट्स सुद्धा आले आणि मृत्यूची विविध कारणं ही जाहीरपणे सांगितली गेली. मात्र सत्य कधीच समोर आलेले नाही. अशाच पाकिस्तानातील माजी राष्ट्रपती जिया उल हक यांचा सुद्धा समावेश आहे. त्यांचा मृत्यू वयाच्या ३४ व्या वर्षात झाला. पण त्यांच्या मृत्यूवरुन अजूनही संशय व्यक्त केला जातो. त्याचसोबत जिया यांच्या मृत्यूची काही कारणे सुद्धा सांगितली जातात. त्यांच्या मृत्यूसाठी अमेरिका ते भारताला सुद्धा जबाबदार मानण्यात आले आहे. मात्र सत्य जगासमोर आलेच नाही.
खरंतर १९८८ ची गोष्ट आहे, त्यावेळी १७ ऑगस्टच्या दिवशी जिया उल हक हे हरकुलीस सी-१३० विमानातून प्रवास करत होते. असे सांगितले जाते की, त्यावेळी त्यांच्यासोबत पाकिस्तान सैन्यातील मोठे अधिकारी सुद्धा होते. त्यामध्ये ज्वॉइंट चीफ्स ऑफ स्टाफ कमेटीचे चेअरमन जनरल अख्तर अब्दुल रहमान, जनरल अफजल,चीफ ऑफ जनरल स्टाफ जनरल अफजल, मेजर जनरल मुहम्मद हुसैन अवान होते.
कसा झाला होता मृत्यू?
बीबीसीच्या एका रिपोर्ट्सनुसार, बहावलपुराहून टॅक ऑफ केल्याच्या काही वेळानंतरच विमानाशी संपर्क तुटला होता. याच दरम्यान, एअरबेसच्या जवळ १८ किमी दूर दिसून आले की, पाक-१ ने आपले नियंत्रण गमावले आहे आणि त्याच्या काही वेळानंतर ते रेगिस्तानमध्ये पडले आणि त्याला आग लागली. अपघात झाला तेव्हा जिया यांच्यासोबत विमानात २९ जण होते. तर जिया यांच्या मृत्यूनंतर देशात शांतता पसरली आणि राजकरण तापू लागले होते. मात्र त्यांच्या मृत्यूसह विमानाचा अपघात नक्की कसा झाला हा मुद्दा अधिक जोर धरु लागला होता.
विमान अपघाताची काय होती कारणे?
जिया उल हक यांच्या मृत्यूनंतर प्रत्येकालाच त्यांच्या विमानाचा अपघात नक्की झाला कसा हे जाणून घ्यायचे होते. मात्र त्यांच्या मृत्यूबद्दल विविध कथा सांगितल्या गेल्या. एक एक करुन विविध लोकांवर आरोप लावण्यात आले. प्रथम टेक्निकल समस्या असे कारण सांगितले गेले होते. दुसऱ्या बाजूला पाकिस्तानाकडून करण्यात आलेल्या तपासात ही दुर्घटना षड्यंत्र रचल्यामुळे झाल्याचे म्हटले. विमानाच्या एलेवेटर बूस्टर पॅकेज सोबत छेडछाड केल्याचे पुरावे मिळाले.
या दरम्यान, प्रथम सीआयएवर संशय होता. मात्र तेव्हाच एक कथा अशी सुद्धा समोर आली की, जिया यांच्या मृत्यूमागे जनरल सुद्धा असू शकतात. या व्यतिरिक्त केजीबी आणि रॉ वर सुद्धा संशय व्यक्त करण्यात आला. त्याचसोबत भारतावर ही काही आरोप करण्यात आले.
आंब्यांच्या पेट्यांची कथा
त्या दरम्यान आणखी एक कथा सांगितली गेली. जिया यांच्या विमानात आंब्यांच्या पेट्या होत्या आणि त्यासोबत वी एक्स नर्व गॅस सुद्धा ठेवला होता. त्यामुळे पायलट बेशुद्ध झाला आणि त्याचे विमानावरील नियंत्रण सुटले. यासाठी असे ही म्हटले जाते की, हे आंबे जिया यांचे पर्सनल सेकेट्री महमूद दुर्रानी यांनी ठेवले होते. परंतु याला नंतर अफवा असल्याचे म्हटले गेले.
हे देखील वाचा- सलमान रश्दी: अयातुल्ला रुहोल्ला खोमेनी यांच्या फतव्यानंतर 6 महिन्यांत बदलली होती 56 घरे…
कटाचा पर्दाफाश झाला पण…
पाकिस्तानाचे प्रमुख राजनेता आणि बुद्धिजीवी मुशाहिद हुसैन सैयद यांनी आपल्या पुस्तकात ‘पाकिस्तान पॉलिटक्स- द जिया ईयर्स’ मध्ये त्या लोकांच्या क्लबद्दल लिहिले ज्यांना जिया यांनी आपले सहकारी मानले होते. यामध्ये मुख्यत्वे सहा सदस्य होते. ज्यांचा मार्शल लॉ लागू करण्यात प्रमुख भुमिका होती. जिया व्यतिरिक्त यामध्ये जनरल फैज अली चिश्ती, जनरल गुलाम जिलानी, जनरल इकबाल, जनरल सावर खान आणि जनरल जहांजीब अरबाब यांचा समावेश होता.
मुशाहिद हुसैन सैयद यांच्या मते, मेजर जनरल ताजमल हुसैन यांना जियाच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी अटक करण्यात आली होता. त्यांच्या दोन नातेवाईकांना सुद्धा ताब्यात घेण्यात आले होते. या अटकेनंतर जनरल फैज अली चिश्ती आणि जनरल गुलाम हुसैन हे निवृत्त झाले. जानेवारी १९८४ मध्ये एका दुसऱ्याच कटाचा पर्दाफाश झाला. जेव्हा सेनेतील काही अधिकाऱ्यांनी सरकारच्या विरोधात कट रचल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. यामध्ये भारतीय संबंध आणि मदतीसंदर्भात ही चर्चा झाली. पहिल्याप्रमाणेच आता ही जिया यांच्या दोन सहकारी जनरल इकबाल आणि जनरल सावर निवृत्त झाले आणि त्यांना घरी पाठवण्यात आले.(Pakistan president death mystery)
जिया उल हक यांच्या मृत्यूनंतर पाकिस्तानात निवडणूका झाल्या आणि सत्तेत आल्या बेनजीर भुट्टो. दरम्यान पाक-१ विमानासोबत नक्की काय झाले होते या प्रश्नावर कधीच उत्तर मिळाले नाही. नक्की त्यावेळी काय झाले होते हे सुद्धा सांगण्यात आले नाही. बेनजीर यांनी आपली आत्मकथा ‘द डॉक्टर ऑफ द ईस्ट’ मध्ये लिहिले की, जिया उल हक यांचा मृत्यू देवाचा कारनामा असल्याचे म्हटले होते.